गणित (पक्कं)

प्रा.विद्याधर घैसास's picture
प्रा.विद्याधर घैसास in जे न देखे रवी...
23 Aug 2010 - 11:40 am

गणित माझं पक्कं आहे.
देण्यातले भागाकार ,घेण्यातले गुणाकार
अधिक उण्यांचा हा व्यवहार ,
नित्य करतो निर्विकार.

बेरजेत मी तरबेज आहे
वजाबाकीत मी हात्चा आहे
अधिक उण्याच्याच्या या व्यवहारात ,
मी मोठा लुच्चा आहे .

गणिताकडून अगणिताकडे ,
जाण्याची मनी आस आहे
विश्वरुपी कोड्याच्या ,
उत्तराचा ध्यास आहे.

गणित जमलं उत्तर जमलं ,
ताळा काही जमेचना
व्यवहारातला हत्च्चा ,
या गणितात रमेचना.

ईश्वराच्या अस्तित्वाचं ,
गणित मग मांडून पाहीलं
गुणाकार भागाकार अन् घनमुळाने ,
त्याचं मूळ शोधू पाहिलं .

घननिळाचं घनफळ ,
गणितात त्या मावेचना
भक्तीनं भरलेलं माझं मन ,
मन गणितात रमेचना.

कविता

प्रतिक्रिया

धनंजय's picture

25 Aug 2010 - 5:24 am | धनंजय

कल्पक पण...