इच्छा

चिंगुसविकॄतजोशी's picture
चिंगुसविकॄतजोशी in कलादालन
22 Aug 2010 - 7:22 pm

स्वप्नांची सोनेरी किरणे
कष्टांच्या दवबिंदूवर पडू दे.
त्यातून उज्ज्वल यशाचे
इंद्रधनु दिसू दे.

कल्पनांच्या सागरी लाटावर
स्वैरपणे स्वार होवू दे.
त्यातून निसर्गाचे अनेक
पैलू उलगडू दे.

जिज्ञासेच्या पावसात नेहमीचं
चिंब भिजून जाऊ दे.
मनाच्या उत्तुंग भरारीला
अगदी आकाशही कमी पडू दे.

असेच काही माझ्या हातून
घडुन जाऊ दे.
त्या यशाने मायबापांच्या
कष्टाचे पांग फेडू दे.

अंतर्मनातील सुगंध गुलाबपरी
सार्‍या आसमंतात दरवळू दे.
ज्योतीप्रमाणे अखंड कार्य
करण्याची सुबुद्धी लाभू दे.

प्रेमाच्या व माणूसकीच्या प्रकाशाने
सारे जग दिपून जाऊ दे.
काय मागू तुजजवळ देवा...
जे आहे त्यातचं समाधानी असू दे.

कविता

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

22 Aug 2010 - 10:22 pm | शिल्पा ब

छान आहे...पण तुम्ही हे असलं विकृत नाव का घेतलंय ? बदला ते..

चिंगुसविकॄतजोशी's picture

23 Aug 2010 - 11:45 am | चिंगुसविकॄतजोशी

माझं नाव प्रियंका देशमुख आहे. मी बारावीत शिकते. माझे आवडते लेखक चिंतामण विनायक जोशी हे आहेत. म्हणून त्यांच्या नावाची आद्याक्षरे घेऊन हे नाव तयार झाले. मी चिंगुस आहे, पण मी विकॄत नक्कीचं नाही.

सांगायचा मुद्दा ऐवढाचं की 'नावात काय आहे' आणि असलचं तर ते हटके नको का????

अर्धवट's picture

23 Aug 2010 - 1:57 pm | अर्धवट

पोरी.. मस्त आहे गं कविता.

बोरकरांच्या ह्या ओळींची आठवण झाली..

जाउ दे कार्पण्य 'मी'चे, दे धरू सर्वांस पोटीं
भावनेला येउ दे गा, शास्त्रकाट्याची कसोटी
लोभ जींव्हेचा जळूं दे, दे जळू विद्वेष सारा.
द्रौपदीचे सत्व माझ्या लाभू दे भाषा-शरीरा.
धैंर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जें जें पहाणें
वाकुं दे बुद्धींस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे