लपंडाव

kalyani B's picture
kalyani B in जे न देखे रवी...
22 Aug 2010 - 7:16 pm

देवा.....
जिथ जाईल तिथ तुझ अस्तित्व आहे.
तुला चुकवून लपाव ही माझी वेडी आशा आहे.
म्हणूनच देवा तस करण्यासाठी मी गोठ्यात जाऊन लपलो,
तर ३३ कोटी देव घेऊन गाय मला बघत होती...
घरात जाऊन लपलो तर ,
माझी माय मला बघत होती...
जिथ जिथ गेलो तिथ तिथ तुझ अस्तित्व होत...
जिथ जिथ गेलो तिथ तिथ तुझ रुप मला हसत होत...
म्हणूनच देवा मी हा लपंडाव सोडला आहे.
तुझ अस्तित्व माझ्यासाठी प्रेमाचा आधार आहे...

कविता