आधी कोंबडी की आधी अंडे, हा प्रश्न तूर्तास बाजूस ठेऊ. तसे आम्हाला दोन्ही आवडतात! प्ररंतु, सध्या आम्ही ग्रासलो आहोत तो एका वेगळ्याच प्रश्नाने. तो प्रश्न असा की, अंडाहाराची गणना शाकाहारात करावी की मांसाहारात?
आम्ही आमच्या एका प्रिय मित्राचा सल्ला घेतला. तो म्हणाला, "मांसाहारी".
म्हटले, "का?"
"हे बघ, अंडे येते कोंबडीच्या शरीरातून. कोंबडी तर मांसाहारी. सबब, अंडेदेखिल मांसाहारी", बिनतोड युक्तिवाद!
पण तसे आम्ही मूळचेच शंकेखोर.
त्याला विचारले, "ते बरोबर. पण मग दूधसुद्धा गायी-म्हशीच्या शरीरात्रूनच येते. मग ते शाकाहारी कसे?"
तो क्षणभर विचारात पडला आणि मग घड्याळ्याकडे पाहात चटकन म्हणाला, "अरे, माझी आता दुध पिण्याची वेळ झाली. आपण नंतर बोलू!"
झालं!
मग आम्ही गाठला दुसरा मित्र. त्यालाही तोच प्रश्न टाकला!
"हे बघ, दुकानात जी अंडी मिळतात ना, त्यात अजिबात जीव नसतो. कारण ती मुळी कोंबडा-कोंबडीच्या समागमाने निर्माण झालेलीच नसतात! तेव्हा ती शाकाहारीच!"
मी म्हटले, "जरा स्पष्टीकरण दे"
तर तो म्हणाला , "हे बघ, कोंबडी नैसर्गिकरीत्या दिवसाला एखादेच अंडे देऊ शकते. आता अशा फक्त एकांडी कोंबड्या पाळणे पोल्ट्री फार्मला परवडणार काय? नैसर्गिक अंडी उपजवायची तर त्याला कोंबडे किती लागतील? असे एकास एक बफर रिसोर्सेस ठेवले तर तो गेलाच की बाराच्या भावात! तेव्हा त्याला अनैसर्गिक उपाययोजना करून, एका कोंबडीला अनेक अंडी घालणे भाग पाडावे लागते. त्यात जीव असा नसतोच!"
तरीही आमच्या मनात शंका आलीच, "पण शेवटी येते तर्, कोंबडीच्या शरीरातूनच ना!"
तर मंडळी, मला आता तुमचा सल्ला पाहिजे आहे. सांगा, अंडाहार हा शाकाहारी की मांसाहारी?
प्रतिक्रिया
21 Aug 2010 - 7:58 pm | हुप्प्या
पेशी (सेल) हा जीवाचा सगळ्यात मूलभूत कण समजला जातो. अंडे हे एक सेल आहे. त्यातून नवा जीव बनो वा न बनो. तो एक सेल आहे हे नक्की.
दूध हे प्राण्याच्या शरीरातून निघाले असले तरी त्यात सेल्स नसतात असे मला वाटते. चुभुद्याघ्या.
पिलाच्या पोषणाकरता हे द्रव्य बनते. त्यामुळे ते एक जैविक रसायन मिश्रण आहे.
ह्या दृष्टीने अंडे मांसाहाराच्या जास्त जवळचे आहे.
21 Aug 2010 - 8:16 pm | अनाम
अस असेल तर मग अंड्यातला बलक काढुन टाकला आणि नुसता पांढरा भाग खाल्ला तर ते शाकाहारात गणले जाईल काहो हुप्प्या भाव?
जल्ला फैले जे वेटर आनुन दिल ते. ;)
तुम्हा झंटलमन लोकांना येवड बी कलु ने?
आवांतर : बाकी आता इथे पण बहुतेक गाडी अंडाहारावरुन शाकाहारी वि. मांसाहारी अशी घसरणार.
आताशी शंका यायला लागली आहे की साला हा सगळा पॉपकॉर्न फॅकटरीवाल्यांचा डाव तर नाय ना ?
21 Aug 2010 - 11:36 pm | माझीही शॅम्पेन
थोड थांबा
फक्त शाकाहारी (वेजिटेरिअन) आणि मांसाहारी (नॉन-वेजिटेरिअन) असे दोनच विभाग का ? आणि कशासाठी ? गर्व से कहो
हम एगिटेरिअन (अन्डाहारी) आहोत :)
21 Aug 2010 - 8:00 pm | नितिन थत्ते
दूध व मध शाकाहारी की मांसाहारी?
21 Aug 2010 - 8:03 pm | वेताळ
फलित न होणारे अंडे देखिल मग जैविक रसायनच आहे . आता धान्यापासुन देखिल नवे पीक आपण घेतो. त्यात देखिल जीव आला कि. मग ते शाकाहारी का?त्याचे उत्तर सांगा.
21 Aug 2010 - 8:22 pm | हुप्प्या
प्रत्येक जीव हा रसायनांचे मिश्रण आहेच. पण सेल हा प्राण्याचा सगळ्यात छोटा अंश समजला जातो (व्हायरस वगैरे अपवाद वगळता). निव्वळ रसायन वा रसायनाचे मिश्रण यापेक्षा सेल ही जास्त क्लिष्ट पण शिस्तबद्ध रचना आहे. मीठ सोडल्यास माणसाचा आहार हा दुसर्या जीवापासूनच बनतो. माणूस काही वनस्पतींप्रमाणे आपले अन्न सूर्यप्रकाश, पाणी वगैरे वापरुन बनवू शकत नाही. त्यामुळे शाकाहार करतानाही कुठलातरी जीव नष्ट होतोच. फारतर फळे खाल्ल्यावर होत नसेल.
अंडे हे प्राणीज आहे हे नक्की. अणि सेलचे विविध भाग असतात ते अंड्यात दिसतात. सायटोप्लाझम, न्युक्लियस वगैरे. अंडे बनवण्याचा मुख्य उद्देश हा नवा जीव जन्माला घालणे हा आहे. अनफर्टिलाईझ्ड अंडी हा अपवाद आहे नियम नाही.
ऑमलेट बनवणे हा नाही. दूध निर्माण करण्याचा उद्देश पिल्लाचे पोषण हा आहे. दूध स्वतः दुसरा जीव बनू शकत नाही. त्यामुळे तुलना करायचीच असली तर अंडे हे जीव ह्या कल्पनेच्या जास्त जवळचे आहे. निदान दुधापेक्षा तरी.
21 Aug 2010 - 8:11 pm | प्रशान्त पुरकर
मासाहार...... असा आहार ज्यात मास आहे. अण्डे, दुध, मध यात मास कुठे आहे म्हणुन मासाहारि नाहि.... :)
21 Aug 2010 - 8:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रक्रिया करुन कारखान्यात हव्या त्या आकाराची अंडी बनविता येतात असे म्हणतात. खरे खोटे काही माहिती नाही. त्यामुळे शाकाहारी लोकांसाठी शाकाहारी अंडी आणि मांसाहारी लोकांसाठी मांसाहारी अंडी अशी मागणी नोंदवता येईल. फक्त बातमी खरी का खोटी यावर काही माहिती मिळाली तर बरे होईल ?
-दिलीप बिरुटे
21 Aug 2010 - 8:23 pm | ऋषिकेश
अंड्यात "मांस" नसल्याने त्याला मांसाहारी म्हणवत नाहि. तरी त्याला (व दूध, मधालादेखील) "शाकाहारी" (माझ्यामते शाक म्हणजे हिरव्या वनस्पती व शाकाहार म्हणजे वनस्पती अथवा वनस्पतीजन्य पदार्थ) म्हणता येणार नाही.
अवांतरः काय फरक पडतो.. अंड्याचे पदार्थ लागतात मात्र रुचकर! :)
22 Aug 2010 - 7:32 am | सहज
मुळात सामान्य लोक शाकाहार व मांसाहार ही तुलना बरेचदा कुठल्या प्राण्याची हत्या न करणे / भूतदया / अहिंसा इ इ भुमीकेतुन करतात.
जर गाई/म्हशी/शेळीने दूध देउन व ते आपण पिउन 'मांसाहार' होत नसेल तर कोंबडीला हानी न पोहोचता, जीव नसलेले तिचे अंडे खाण्यात, झाड न तोडता झाडावरचे पिकलेले फळ खाण्यात त्या दृष्टीने शाकाहारच वाटतो.
बालुत नावाचा एक फिलिपाइन्स मधील खाद्यप्रकार उर्फ मांसाहारी अंडे इथे पहा. हा दुवा फक्त मांसाहारी लोकांनीच पहावा. शाकाहारी लोकांनी पाहील्यास त्यांना "मांसाहाराचे पाप" लागणार निश्चित|. नंतर तक्रार चालणार नाही.
22 Aug 2010 - 7:44 am | सुनील
बालुत खाण्यासाठी का होईना पण फिलिपाईन्सला भेट द्यावी असे वाटू लागले आहे!
22 Aug 2010 - 7:47 am | गांधीवादी
अंड्यात जीव नसतो हे पहिल्यन्दाच ऐकत आहे,
ह्या नियमाप्रमाणे कोणत्याच गर्भात जीव नसला पाहिजे,
अवांतर, मग (मुलींचे) गर्भपात वगेरे सगळे मान्य का ?
22 Aug 2010 - 8:27 am | नितिन थत्ते
सगळी कहाणी ऐकून झाल्यावर (की न ऐकताच?) "रामाची सीता कोण?"
22 Aug 2010 - 10:30 am | सहज
पोल्ट्री फार्ममधील कोंबडी १८ ते २० आठवड्याची (चू भू दे घे) झाली की अंडे देउ लागते. त्याकरता "कोंबड्याची" गरज नसते. कोंबड्याशिवाय दिलेल्या अंड्यातुन पिल्लु येत नाही. हीच अंडी बाजारात विकायला असतात. म्हणुन मी जीव नसलेले अंडे म्हणालो.
22 Aug 2010 - 10:41 am | भारतीय
मी शुद्ध शाकाहारी आहे, म्हणून मी अंडे व वांगे खात नाही..
22 Aug 2010 - 11:10 am | प्रशान्त पुरकर
????
22 Aug 2010 - 3:46 pm | सुनील
म्हणून मी अंडे व वांगे खात नाही
अमेरिकेत असाल तर, वांगे खाऊ नका कारण अमेरिकेत त्याला eggplant म्हणतात.
पण भारतात जिथे त्याला वांगे/बैंगन्/ब्रिंजल्/इ.) म्हणतात तिथे खायला हरकत नसावी!
तसं इंग्लंडातही हरकत नसावी कारण तिथे त्याला aubergine म्हणतात!
बाकी वांगे आमचे आवडते. भरीत म्हणा, भरली म्हणा, काप म्हणा वा नुसती भाजी, वांग्याला तोड नाही!
23 Aug 2010 - 9:58 am | अशक्त
वांगे आवडते तर बाबा गणुश नक्कि खावुन बघा
http://en.wikipedia.org/wiki/Baba_ghanoush
22 Aug 2010 - 12:16 pm | वेताळ
नाहीतर वांदे व्हायचे.
बालुत आवडले नाही.......
22 Aug 2010 - 7:26 pm | पैसा
हा निबंध अर्थातच माझा नाही. फेसबुक वर एक अनामिक खाते आहे "या फोटोंना आवरा" म्हणून. तिथून साभार.
23 Aug 2010 - 12:31 pm | चिगो
अंडे शाकाहारी कि मांसाहारी हे कोंबडीच्या आहारावरुन ठरते. तिने जर किडे खाल्ले तर अंडे मासाहारी, दाणे टिपले तर शाकाहारी... म्हणून कोंबडी कडे लक्ष द्या...
25 Aug 2010 - 7:16 pm | विसोबा खेचर
तूर्तास तू गरमागरम भूर्जीपाव खा रे.. आपण नंतर चर्चा करू.. :)
तात्या.
8 Sep 2010 - 6:01 pm | असुर
तात्या, मी पण येतो भूर्जीपावाच्या प्यार्टीला! कधी, कुठे, कसं जमवायचं ते कळवा!
भरल्या पोटी चर्चेचं दळण दळायला बरं पडतं ना!
--असुर
8 Sep 2010 - 6:16 pm | सुनील
मी पण येतो भूर्जीपावाच्या प्यार्टीला! कधी, कुठे, कसं जमवायचं ते कळवा
ठाण्याच्या मॉडेला चेकनाक्यावर (रात्री बारानंतर) जो भूर्जीपाव मिळतो, त्याला जगात तोड नाही!
काय करायचं, (तात्याच्या) उमा पॅलेसमध्ये जायचं. तिथे एक बियर तीनशे रुपयाला मिळते (म्हणजे मिळायची, सध्याचा रेट माहित नाही). साहजिकच बाहेर पडल्यावर आपण मुळातच कफल्लक झालेलो असतो (थोडक्यात, भूर्जीपावाशियाय दुसरे काही परवडण्यासारखे नसतेच!). तिथून रिक्षाने ५ मिनिटात चेक नाका. मस्तपैकी भूर्जीपावावर ताव मारायचा! कसे?
(असो, सद्या तिथून दहा हजार मैल लांब आहे, तोवर तुम्ही जाऊन या!)
8 Sep 2010 - 6:20 pm | मेघवेडा
अंधेरी स्टेशनबाहेर सुद्धा. पश्चिमेला, रेल्वे कँटिनसमोर. (रात्री बारानंतरच)! त्याच्याकडचा तवा पुलाव पण लै ब्येश!
8 Sep 2010 - 6:56 pm | असुर
तात्या,
बघा! तुम्ही प्यार्टी देणार म्हटल्यावर लगेच अजून दोनजण वाढले. त्यामूळे प्यार्टीचं काय ते पटकन उरकून टाकू, लोक वाढायच्या आत! कसे?
-असुर
8 Sep 2010 - 5:29 pm | Arun Powar
अंडे शाकाहारी कि मांसाहारी??
मांसाहारी लोकांना काही हरकत नसावी..
उरला प्रश्न शाकाहारी लोकांचा, तर अंडे चविष्ट लागते, पौष्टीक असते म्हणून शाकाहारी पदार्थामधे त्याची रितसर वर्णी लागावी म्हणून अंडे शाकाहारी कि मांसाहारी हा वाद शाकाहारी लोकांनीच निर्माण केला असावा असे वाटते..
मी बरेच लोक असेही पाहिले आहेत, जे मासे, झिंगे सारखे समुद्री जीव खातात आणि शाकाहारी म्हणून मिरवतात.. एका भल्या शाकाहारी माणसाला मासे खाताना रंगेहाथ पकडल्यावर, "अरे मासे, झिंग्यांमध्ये चिकन मटण सारखे कुठे मांस असते, म्हणून मी शाकाहारीच!" असे उत्तर मिळाले. आता बोला..
अंडे खाणारे "शाकाहारी" लोक मंदिरात जाताना किंवा एखाद्या दिवशी घरी व्रत, पूजापाठ असताना त्यादिवशी अंडी का बरे खात नाहीत?? सकाळी नाश्ता करताना "आज अंडी नको, माझा आज अमुक अमुक वार आहे" किंवा "आज देवळात जाणार आहे" असे आवर्जून सांगतात. अंडे शाकाहारी म्हणता तर मग नेमके ह्याच वेळी त्याला मांसाहारी का ठरवता?
कोणते पदार्थ शाकाहारी आणि कोणते पदार्थ मांसाहारी, ह्याचा शोध लावून त्याची यादी बनवा.
8 Sep 2010 - 6:21 pm | विनायक प्रभू
अंडाहार शब्द वाचुन डावे वेंट्रीक्युलर गदगदले.
8 Sep 2010 - 8:34 pm | प्रकाश घाटपांडे
ज्या अंड्यातुन जीव बाहेर पडतो असे अंडे खाल्ले तर ते मांसाहारी असे म्हणणारे जे आहेत त्यांना मी एक प्रश्न विचारीत असे.
आपण एक चपाती / भाकरी खातो त्यासाठी किती गव्हाचे/बाजरीचे/ज्वारीचे दाणे लागतात किमान शंभर तरी लागतात. आता एक गव्हाचा दाणा हे गव्हाचे अंडेच आहे. ते जमीनीत पेरले तर वनस्पती उगवते. गहु ही वनस्पती म्हणजे सजीव आहे. वनस्पतीला भावना आहेत. म्हणजे एका चपाती साठी तुम्ही शंभर जीव मारता मग त्यापेक्षा तो मांसाहारी बरा एकच बोकड कापतो वा एकच कोंबडि मारतो.
जीवोजीवस्य जीवनम हे निसर्गाचे चक्रच आहे.
अवांतर- एका मित्राला बाटवण्यासाठी मी हळूच शिर्यात अंड्याचा बलक टाकला होता. त्याला खाताना वेगळाच वास आल्याने अर्थात आमच्यावर संशय आला व शिव्या खाल्ल्या.
9 Sep 2010 - 12:48 am | विश्वनाथ मेहेंदळे
>>अवांतर- एका मित्राला बाटवण्यासाठी मी हळूच शिर्यात अंड्याचा बलक टाकला होता. त्याला खाताना वेगळाच वास आल्याने अर्थात आमच्यावर संशय आला व शिव्या खाल्ल्या.
अवांतर :- एखाद्याला बाटवून लोकांना काय आनंद मिळतो हे मला आजवर न सुटलेले कोडे आहे. तुम्ही हे केले असल्याने तुम्हाला याचे उत्तर माहित असेलच. मला सांगितलेत तर माझ्या riddles च्या यादीतून एक कमी तरी होईल.
अतिअवांतर :- शिर्यात अंड्याचा बलक ??? आपण वेगवेगळ्या पदार्थांना शिरा म्हणतो आहोत का ?
9 Sep 2010 - 9:56 am | प्रकाश घाटपांडे
शिर्यात अंड टाकल्याने त्या मित्राला खरोखरच समजते का? याचे उत्तर शोधण्याचा तो एक प्रयत्न होता.त्याचे नाक तीक्ष्ण आहे असे त्याचे म्हणणे होते. त्याचे दुसरे उत्तर 'मद' अथवा माज असे देखील आहे. आपण ( कधी विचारांच्या तर कधी वयाच्या ) एका टप्प्यावर आल्यावर असे माज कळत नकळत घडत असतात.
अजुन एक उत्तर असे आहे कि अंड्याविषयी असलेले पुर्वग्रह सोडुन देण्यासाठी एक मित्रत्वाच्या हक्काने केलेली नकळत सक्ती. ती योग्य अयोग्य या बाबत मतभेद असु शकतात.
मला एका मित्राच्या घरी त्याने मला एक पदार्थ खायला दिला होता. छान तुकडे करुन डिश मधे दिला. मी तो खाल्ला. मला आवडल्याचेही मी सांगितले.मी मांस मच्छी खात नाही हे त्याला माहीत होते. खाल्यानंतर एकदा त्याने तो पदार्थ सुरमाई होता असे सांगितले. त्याने अगोदर सांगितले असते तर मी तो पदार्थ खाल्ला नसता. पण यातुन माझी सुरमाईविषयीची किळस संपुष्टात आली.
आयुष्याच्या सर्व टप्प्यात आपली कृती ही दरवेळी विचारपुर्वक विवेकी असतेच असे नाही. मिपावर आपण अनेक प्रतिसाद वाचतो ते प्रतिसादकर्त्याने विचारपुर्वकच दिलेले असतात असे नाही.
9 Sep 2010 - 12:51 am | सुनील
पारशी लोकांत असा एक पदार्थ करतात असे पूर्वी उपक्रमावरील एका चर्चेत समजले होते. अद्याप करून बघितले नाही!
9 Sep 2010 - 1:21 am | प्रियाली
उपक्रमावर माझ्याकडून कळले असावे. पारशांमध्ये शिर्यात अंडे घालतात आणि आपल्यात पिठाच्या मुटक्यांनी ओवाळतात त्याप्रमाणे अंड्यांनी ओवाळतात.
9 Sep 2010 - 1:45 am | सुनील
तुमच्याकडूनच!
4 Apr 2013 - 4:30 pm | बॅटमॅन
अंड्याचा फंडा कळावा म्हणून हा धागा परत वर काढत आहे. ह्या धाग्यावर इतकेसेच प्रतिसाद कसे आले ते समजले नाही. ज्वलंत विषयावर जास्त चर्चा झाली पाहिजे. यापुढे "बाजरीवरील कीड" आणि "दुसर्या बाजीरावसाहेबांचे हस्ताक्षर" हे दोन्ही धागेही यथावकाश वर काढल्या जातील.
4 Apr 2013 - 4:35 pm | यशोधरा
संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे!
4 Apr 2013 - 5:14 pm | तुषार काळभोर
पुन्यात अॅग्री कॉलेजाजवळ मिळणारी बुर्जी...
5 Apr 2013 - 9:16 am | मोदक
बोला.. कधी जमायचे..?
4 Apr 2013 - 5:22 pm | अत्रुप्त आत्मा
4 Apr 2013 - 5:25 pm | मन१
"शाकाहार" आणी मांसाहार असे शब्द मानण्यातून वादाची सुरुवात होते.
दूध काय अंडी काय प्राण्यापासून निघालेली "प्राणिज" अन्ने आहेत हे एकदा मान्य केले की गोष्टी सोप्या व्हाव्यात.
अधिक उहापोह http://www.misalpav.com/node/1740 (शाकाहार :- काही नवीन पैलु) ह्या माझ्याच शतकी धाग्यात मिळेल.
4 Apr 2013 - 5:35 pm | रमेश आठवले
अमेरिकेत वेगन नावाचा एक संप्रदाय आहे. ही मंडळी दूध आणि त्यापासून निर्माण होणारे सर्व पदार्थ प्राणिजन्य असल्याने वर्ज्य समजतात. अंड्याचा तर प्रश्नच नाही.
आपल्याकडे जैन लोक कंदमुळे, ती जमिनीच्या आत तयार होत असल्याने, वर्ज्य समजतात. का कोण जाणे पण जैन लोक वांगेही निषिद्ध मानतात.
4 Apr 2013 - 6:12 pm | मालोजीराव
सध्याच्या काळात पोल्ट्री आणि शेळी-मेंढी पालन हा उद्योग फक्त मांस विकण्यासाठी होतो … त्यामुळे प्राणीदया वगैरेला धप्पा !
4 Apr 2013 - 6:51 pm | पिशी अबोली
कुणाला काय खायचंय ते खा.. चर्चा कशाला त्या?
4 Apr 2013 - 7:01 pm | प्यारे१
असं कसं असं कसं???
- प्रशांत आवले. (हे माझंच नाव आहे.)
4 Apr 2013 - 7:55 pm | पिशी अबोली
ते तसं ते तसं..
5 Apr 2013 - 12:54 am | प्यारे१
ते प्रशांत दामले ह्या मराठी अभिनेत्याच्या अनुकरणशैलीबद्दल लिहीलेलं.
असो.
शेवटी अंडं शाकाहारी का मांसाहारी? काय ठरलं?
5 Apr 2013 - 1:15 am | पिशी अबोली
हे आम्हाला काय माहिती?मराठी अभिनेत्यांच्या शैल्या वगैरे..
अंडं शाकाहारी की काय ते काही कळलं नाही ब्वा..ज्याला जे वाटेल ते त्याने खावं हे आमचं मत कायम आहे.
5 Apr 2013 - 3:22 pm | प्रसाद१९७१
विचारतय कोण तुमच्या मराठी अभिनेत्यांना (?)
5 Apr 2013 - 1:21 pm | श्रिया
बरोबर आहे.
अंडे खायची ईच्छा आहे तर बिनधास्त खावं. त्यासाठी अंडं शाकाहारी आहे असा "ट्रस्ट स्टँम्प" मिळविण्याचा अट्टाहास कशाला?
4 Apr 2013 - 11:34 pm | सुहास
पुणे-सोलापूर रस्त्याला असलेल्या एका प्युअर व्हेज हॉटेलात मेनू कार्डवर "व्हेज अंडाकरी" पहायला मिळाली..!
4 Apr 2013 - 11:41 pm | सुहास
पुणे-सोलापूर रस्त्याला असलेल्या एका प्युअर व्हेज हॉटेलात मेनू कार्डवर "व्हेज अंडाकरी" पहायला मिळाली..!
5 Apr 2013 - 1:13 pm | श्रिया
कोणते हॉटेल "कांचन" का?
5 Apr 2013 - 1:31 pm | तुषार काळभोर
कांचनची मिसळ लई भारी असती
5 Apr 2013 - 2:01 pm | श्रिया
हो, मिसळ छान असते आणि मातीच्या भांड्यात सर्व करतात ते. व्हेज अंडे बहुतेक पनीर आणि बटाट्याचे बनवलेले असते तिथे.
5 Apr 2013 - 2:11 pm | अत्रुप्त आत्मा
@ व्हेज अंडे बहुतेक पनीर आणि बटाट्याचे बनवलेले असते तिथे.>>> येस...येस...अफलातुन प्रकार आहे.त्या डिशचं मेनुकार्डातलं नाव शाम/सवेरे असं आहे. :)
5 Apr 2013 - 3:07 am | पिवळा डांबिस
आमच्याकडे मटण-माशे काहीच शिजवायला आणलेले नसले तर नाईलाजाने अंडं तरी करतात.
त्यामुळे अंडं हे बहुदा शाकाहारी असावं....
5 Apr 2013 - 12:14 pm | सुबोध खरे
विवादास्पद आणी विचारास्पद विधान "प्राणी रुचकर लागतात म्हणून ते खाणे" हे "मजा येते म्हणून बलात्कार करतो असे बलात्कार्याने म्हणण्यासारखे आहे."माझ्या एका जैन मित्राचे म्हणणे आहे
5 Apr 2013 - 12:23 pm | बॅटमॅन
वनस्पती रुचकर लागतात म्हणून खाणे हेही तसेच आहे असे सांगून तं बघा त्याला. असले नग लै डॉक्शात जातेत.
5 Apr 2013 - 12:49 pm | सुबोध खरे
वा बॅटमॅन
आता आम्हाला बटाटा भजी, कोठीम्बीर वडी आणी चिकन तंदुरी निर्विघ्नपणे खाता येईल(उगाच तो बरोबर का चूक चा किडा वळवळणार नाही
5 Apr 2013 - 4:46 pm | सूड
रोचक चर्चा. बाटगा जास्त जोरात बांग देतो या म्हणीचा प्रत्यय देणारा धागा. =))
5 Apr 2013 - 4:47 pm | सूड
धाग्यावरचे प्रतिसाद !!
5 Apr 2013 - 5:25 pm | ५० फक्त
मी ते वर लाल अक्षरात आय मीना वाचलं....
5 Apr 2013 - 5:54 pm | सूड
आक्षी कंन्फ्युजन !! =))
8 Apr 2013 - 12:51 pm | प्रशांत हेबारे
अंडे जे आपल्यला मिळते ते फलित न झालेला म्हणजे तेच्य्पासून दुसरा जीव होत नाही. And it is treated as a food. दुसरे असे कि दुधा मध्ये सुधा पेशी असतात. भ्याजामध्ये सुधा जीव असतो