✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अंडाहार - शाकाहारी की मांसाहारी?

स
सुनील यांनी
Sat, 08/21/2010 - 19:49  ·  लेख
लेख
आधी कोंबडी की आधी अंडे, हा प्रश्न तूर्तास बाजूस ठेऊ. तसे आम्हाला दोन्ही आवडतात! प्ररंतु, सध्या आम्ही ग्रासलो आहोत तो एका वेगळ्याच प्रश्नाने. तो प्रश्न असा की, अंडाहाराची गणना शाकाहारात करावी की मांसाहारात? आम्ही आमच्या एका प्रिय मित्राचा सल्ला घेतला. तो म्हणाला, "मांसाहारी". म्हटले, "का?" "हे बघ, अंडे येते कोंबडीच्या शरीरातून. कोंबडी तर मांसाहारी. सबब, अंडेदेखिल मांसाहारी", बिनतोड युक्तिवाद! पण तसे आम्ही मूळचेच शंकेखोर. त्याला विचारले, "ते बरोबर. पण मग दूधसुद्धा गायी-म्हशीच्या शरीरात्रूनच येते. मग ते शाकाहारी कसे?" तो क्षणभर विचारात पडला आणि मग घड्याळ्याकडे पाहात चटकन म्हणाला, "अरे, माझी आता दुध पिण्याची वेळ झाली. आपण नंतर बोलू!" झालं! मग आम्ही गाठला दुसरा मित्र. त्यालाही तोच प्रश्न टाकला! "हे बघ, दुकानात जी अंडी मिळतात ना, त्यात अजिबात जीव नसतो. कारण ती मुळी कोंबडा-कोंबडीच्या समागमाने निर्माण झालेलीच नसतात! तेव्हा ती शाकाहारीच!" मी म्हटले, "जरा स्पष्टीकरण दे" तर तो म्हणाला , "हे बघ, कोंबडी नैसर्गिकरीत्या दिवसाला एखादेच अंडे देऊ शकते. आता अशा फक्त एकांडी कोंबड्या पाळणे पोल्ट्री फार्मला परवडणार काय? नैसर्गिक अंडी उपजवायची तर त्याला कोंबडे किती लागतील? असे एकास एक बफर रिसोर्सेस ठेवले तर तो गेलाच की बाराच्या भावात! तेव्हा त्याला अनैसर्गिक उपाययोजना करून, एका कोंबडीला अनेक अंडी घालणे भाग पाडावे लागते. त्यात जीव असा नसतोच!" तरीही आमच्या मनात शंका आलीच, "पण शेवटी येते तर्, कोंबडीच्या शरीरातूनच ना!" तर मंडळी, मला आता तुमचा सल्ला पाहिजे आहे. सांगा, अंडाहार हा शाकाहारी की मांसाहारी?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21214 वाचन

💬 प्रतिसाद (64)

प्रतिक्रिया

व्हेज अंडाकरी

सुहास
गुरुवार, 04/04/2013 - 23:41 नवीन
पुणे-सोलापूर रस्त्याला असलेल्या एका प्युअर व्हेज हॉटेलात मेनू कार्डवर "व्हेज अंडाकरी" पहायला मिळाली..! Image removed.
  • Log in or register to post comments

कोणते हॉटेल "कांचन" का?

श्रिया
Fri, 04/05/2013 - 13:13 नवीन
कोणते हॉटेल "कांचन" का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास

कांचनची मिसळ

तुषार काळभोर
Fri, 04/05/2013 - 13:31 नवीन
कांचनची मिसळ लई भारी असती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रिया

हो, मिसळ छान असते आणि

श्रिया
Fri, 04/05/2013 - 14:01 नवीन
हो, मिसळ छान असते आणि मातीच्या भांड्यात सर्व करतात ते. व्हेज अंडे बहुतेक पनीर आणि बटाट्याचे बनवलेले असते तिथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

@ व्हेज अंडे बहुतेक पनीर आणि

अत्रुप्त आत्मा
Fri, 04/05/2013 - 14:11 नवीन
@ व्हेज अंडे बहुतेक पनीर आणि बटाट्याचे बनवलेले असते तिथे.>>> येस...येस...अफलातुन प्रकार आहे.त्या डिशचं मेनुकार्डातलं नाव शाम/सवेरे असं आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रिया

णाविलाज को क्या विलाज?

पिवळा डांबिस
Fri, 04/05/2013 - 03:07 नवीन
आमच्याकडे मटण-माशे काहीच शिजवायला आणलेले नसले तर नाईलाजाने अंडं तरी करतात. त्यामुळे अंडं हे बहुदा शाकाहारी असावं....
  • Log in or register to post comments

विवादास्पद मुद्दा

सुबोध खरे
Fri, 04/05/2013 - 12:14 नवीन
विवादास्पद आणी विचारास्पद विधान "प्राणी रुचकर लागतात म्हणून ते खाणे" हे "मजा येते म्हणून बलात्कार करतो असे बलात्कार्याने म्हणण्यासारखे आहे."माझ्या एका जैन मित्राचे म्हणणे आहे
  • Log in or register to post comments

वनस्पती रुचकर लागतात म्हणून

बॅटमॅन
Fri, 04/05/2013 - 12:23 नवीन
वनस्पती रुचकर लागतात म्हणून खाणे हेही तसेच आहे असे सांगून तं बघा त्याला. असले नग लै डॉक्शात जातेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बॅटमॅन

सुबोध खरे
Fri, 04/05/2013 - 12:49 नवीन
वा बॅटमॅन आता आम्हाला बटाटा भजी, कोठीम्बीर वडी आणी चिकन तंदुरी निर्विघ्नपणे खाता येईल(उगाच तो बरोबर का चूक चा किडा वळवळणार नाही
  • Log in or register to post comments

रोचक चर्चा.

सूड
Fri, 04/05/2013 - 16:46 नवीन
रोचक चर्चा. बाटगा जास्त जोरात बांग देतो या म्हणीचा प्रत्यय देणारा धागा. =))
  • Log in or register to post comments

आय मीन...

सूड
Fri, 04/05/2013 - 16:47 नवीन
धाग्यावरचे प्रतिसाद !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मी ते वर लाल अक्षरात आय मीना

५० फक्त
Fri, 04/05/2013 - 17:25 नवीन
मी ते वर लाल अक्षरात आय मीना वाचलं....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आय मीना...

सूड
Fri, 04/05/2013 - 17:54 नवीन
आक्षी कंन्फ्युजन !! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

अंडे जे आपल्यला मिळते ते फलित

प्रशांत हेबारे
Mon, 04/08/2013 - 12:51 नवीन
अंडे जे आपल्यला मिळते ते फलित न झालेला म्हणजे तेच्य्पासून दुसरा जीव होत नाही. And it is treated as a food. दुसरे असे कि दुधा मध्ये सुधा पेशी असतात. भ्याजामध्ये सुधा जीव असतो
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा