उंचावल्या ना भुवया..! काही खास गोष्ट नाही सहजच ....मनात आलं ते छापते आहे..!
काल दोनचार मित्र-मैत्रिणी रात्री जेवायला आले होते. छोले+पुरी+श्रीखंड असा साधा बेत होता. मस्त जेवण झाले.आवराआवरी झाल्यावर सहज गप्पा टप्पा सुरु झाल्या. नेहमीचे विषय चघळता चघळता काही तरी फाटा फुटला आणि गाडी 'स्त्रिया आणि drinks' स्टेशनावर येउन पोचली......Belive me....त्यावर इतकी चावा चावी झाली ना कि बस्स....
सकाळी ५.३० वाजेपर्यंत दळण चालु होते..
मुलींनी drinks घेणे योग्य कि अयोग्य्...संस्कृती,समाज्,नीतीमत्ता,संस्कार इ.इ.
मग पुरुष पितात ते योग्य की अयोग्य...हे सगळं चावलं गेलं.
पाश्चात्य संस्कृतीचा पगडा...बदलती स्त्री ची मानसिकता..एक ना दोन..!
हे लिहिण्यामागचा उद्देश इतकाच आहे कि आपल्या मि.पा. करांची मते जाणुन घ्यायची आहेत.
आपल्या विभिन्न मते,वेगवेगळ्या मानसिकता,प्रगल्भ and truely practical वाचक यांचा अक्षरशः खजिना आहे.
मला खरंच जाणुन घ्यायला आवडेल कि हे योग्य कि अयोग्य.
मग यामध्ये पुरुषांना मुभा आहे असे का मानले जाते?
यामध्ये संस्कारांचा सहभाग कितपत आहे?
आपल्या मर्यादेत राहुन drinks घेतले तर योग्य आहे कि नाही? आणि असेल तर मग ही मर्यादा काय असेल आणि ती कोण ठरवणार? केवळ change म्हणुन किंवा विरंगुळा म्हणुन drinks घ्यावी कि नाही?
अजुनही अनेक पैलू असु शकतात..कि जे आत्ता सुचत नाहियेत पण चर्चेतुन समोर येत जातील!
so friends.... what all you've got to say about it??
Drinks ...मुली आणि मद्यपान!
गाभा:
प्रतिक्रिया
18 Aug 2010 - 10:44 pm | वेताळ
http://www.esakal.com/esakal/20100818/5041559892986008660.htm
त्याबरोबर खालच्या प्रतिक्रिया देखिल वाचा.
19 Aug 2010 - 12:33 am | चित्रा
"मी अशीच आहे" या तुमच्या सहीतच उत्तर आले ना.
आपण जसे असतो तसे आरामात सुखात असावे, उगाच दुसर्यासारखे वागायची गरज नाही. हवे तर प्यावे, नसले प्यायचे तर न प्यावे, आहे काय आणि नाही काय?
19 Aug 2010 - 11:47 am | भारतीय
प्रथमदर्शनी हा धागा दिक्षीतांचा असेल असे वाटले व आतापर्यंत धागा अप्रकाशित झाला असेल असा समज होता!
19 Aug 2010 - 12:54 pm | मी कोल्हपुरी......
जगा अणि जगु द्या........ याच प्रमाणे ''प्या आणि पिउ द्या''' अथवा ''प्या आणि पाजा'' हे धोरण अत्यन्त चन्गले आहे
19 Aug 2010 - 4:39 pm | मनीषा
इथे वर (म्हणजे याच धाग्यात ) खडूसपणा, कुजकटपणा, आणि निरागस इ, बाबीं बद्दल चर्चा चालू आहे ...
पुणेकर असल्याने खडूसपणा, कुजकटपणा म्हणजे काय याची कल्पना आहे ... पण निरागस म्हणजे काय ? कुठल्या जातीचे लोक असतात हे?
आणि मिपा वर आहेत का तसे कोणी ? (तसे = निरागस)
19 Aug 2010 - 4:42 pm | Nile
किती तो निरागसतेचा आव आणावा एखाद्याने. ;-)
19 Aug 2010 - 4:44 pm | llपुण्याचे पेशवेll
मनिषा आणि निळू दोघांशीही शमत.
19 Aug 2010 - 5:06 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
हिहहह
19 Aug 2010 - 5:08 pm | अर्धवट
कुणी हाक मारली रे मला
19 Aug 2010 - 5:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कान वाजले तुमचे! ;-)
19 Aug 2010 - 5:17 pm | अर्धवट
निरागस निरागस म्हणलं कुणीतरी म्हणुन आलो मी हिकडं.. ;)
19 Aug 2010 - 5:21 pm | परिकथेतील राजकुमार
मला वाटले प्रविनभप्करचे नाव ऐकु आले.
19 Aug 2010 - 5:23 pm | अर्धवट
पाठीवर मारा पण आयडीवर मारू नका... एकच हाय (म्हणजे खरा एकच हाय )
19 Aug 2010 - 5:23 pm | ज्ञानेश...
अवांतर प्रतिसादांबद्दलची पॉलिसी बदलली आहे का?
-ऑर्वेल.
19 Aug 2010 - 5:25 pm | परिकथेतील राजकुमार
-१
कृपया कौलात कौल काढु नये.