काही काळाच्या ओघात हरवलेले लेख/मुलाखती

प्रशांतकवळे's picture
प्रशांतकवळे in जनातलं, मनातलं
6 Apr 2008 - 6:40 pm

खुप वर्षापूर्वी कालनिर्णय मध्ये पु.ल.देशपांडेंनी एक पाककृती (विनोदी) लिहिली होती, त्यातले केवळ एक वाक्य मला आठवतेय "वाण्याकडून आणलेल्या गुळाची आख्खी पूडी पातेल्यात टाकावी... कागद व दोर्‍यासकट". कोणाकडे हा लेख (पाककृती) आहे का?

पुलंच्या काळात पण साहित्य, संगीत ह्यांची चोरी व्हायची, असाच एकदा हा विषय निघाला आणी पुलं नी हातात पेटी घेऊन असा काही नजराणा पेश केला की सगळे गार झाले, संपल्यावर पुलं म्हणाले "पाहू या ह्याची नक्कल कोणी करु शकतो का" ह्या घटनेबद्दल कोणाला जास्त माहित आहे का?

धन्यवाद

प्रशांत

साहित्यिक

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

6 Apr 2008 - 6:51 pm | प्रभाकर पेठकर

पावभाजीचा नुकताच जन्म झाला होता तेंव्हा (१९७२-७३) दिवाळीच्या एका विशेष कार्यक्रमात पुलंनी पावभाजीची एक पाककृती सांगितली होती. म्हणजे असेच, उरलेल्या भाज्या, देठ इत्यादी कचरा शिजवून भरपूर बटर घालून भाजी बनवायची आणि अशी ती भाजी पावाबरोबर खाल्ली असता 'मुंबईचा पाव रुचकर लागतो.'

"वाण्याकडून आणलेल्या गुळाची आख्खी पूडी पातेल्यात टाकावी... कागद व दोर्‍यासकट". कोणाकडे हा लेख (पाककृती) आहे का?
पुल देशपांडे...काही हरवलेले वास्.....पुस्तक "नस्ती उठाठेव"...इथे तुम्हाला ते वाचायला मिळेल

चतुरंग's picture

7 Apr 2008 - 8:07 pm | चतुरंग

पुलंच्या काळात पण साहित्य, संगीत ह्यांची चोरी व्हायची, असाच एकदा हा विषय निघाला आणी पुलं नी हातात पेटी घेऊन असा काही नजराणा पेश केला की सगळे गार झाले, संपल्यावर पुलं म्हणाले "पाहू या ह्याची नक्कल कोणी करु शकतो का" ह्या घटनेबद्दल कोणाला जास्त माहित आहे का?

हा प्रसंग सतीश आळेकरांनी त्यांच्या 'पु लं नावाचं गारुड' ह्या लेखनात दिला आहे. ह्याबद्दल इथे वाचता येईल.

(अवांतर - प्रशांत, आपला आय्.डी. मराठीतून असेल तर जास्त छान वाटेल;)

चतुरंग