माझा ठाण्यातलाच मित्र देवेंद्र गंद्रे मेरु ट्रेक्स आणि टुर्स नावाने व्यवसाय करतो. १८ जुलै २०१० ला सांदणव्हॅलीला २९ जणांचा ग्रुप घेउन मी जाणार आहे तु येणार का? अशी विचारणा होताच आम्ही लगेच सहकुटुंब होकार कळवला. पहाटे ५ वाजताच ठाण्यातुन प्रवास सुरु झाला. तुफान पावसामुळे आम्चा वेग तसा मर्यादीतच होता. कसारा घाटातच जबरदस्त धुक्याने आमचे स्वागत केले. पुढचे काहे दिसेना म्हणुन मग घाटन देवीच्या देवळातच चहा + नाष्टा करुन पुढचा प्रवास चालु केला. दर्म्यान धुके व पाउस दोन्ही कमी झाले होते. प्रवासा दर्म्यान चालत्या गाडीतुनच शुटींग चालु केले.
येवढ्यात माझा मुलागा ओरडला बाबा! बाबा! ती बघा, ती बघा ,सुनामी......... ढगांची सुनामी लाट.
सुनामीतुन जरा सावरुन पुढे आल्यावर हा नजरा दिसला.
हे नागफणीच फुल
भंडारद-याच्या धरणातील पाणी अजुन भरले नसल्याने व धरणाचे दरवाजे उघडले नसल्याने आम्ही आमचा मोर्चा सांदणव्हॅलीच्या वरच्या भागाकडे वळवला. ही सांदणव्हॅली भंडारद-या पासुन साधारण २५/२६ कि.मी. वर आसुन वरच्या गावा पर्यंत आम्ची मीनी बस गेली होती.
कोणी तरी नात्यातल वारलं अस्ल्याने मुंडण कराव लागल पण जवळ पैका नसल्याने बायकोनेच नव-याची केली
असंख्य टेकुच्या आधारावर हा (मोडका) संसार टेकलेला.
(चौकट मोडुन) उंबरठा ओलांडायच्या तयारीत
बशीतुन उतरुन सहप्रवाश्यांबरोबर दरी कडे वाटचाल
आम्च्या बरोबर असलेल्या लोकल गाईडने सर्वांना एकत्र राहण्याची सक्त ताकीद दिली होती. त्याच्या म्हणण्यानुसार ईथे कधीही अचानक धुक/ढग दाटुन येतात आणि मग आवघ ४/५ फुटांच्या पलिकडल पण दिसण अशक्य होत आणि चुकामुक होऊन घोळ वाढु शकतो. पाय घसरुन अपघात घडु शकतो. (शेकडो फुट खोल दरीत पाय घसरुन/ पडुन काही जणांनी अश्या धुक्यात आपला जिव गमावला असल्याचे देखिल नंतर काही मित्रांकडुन कळले.)
हा गीरना धबधबा
करा मजा ,चिंब भिजा
हीच ती सांदणदरी दोन्ही बाजुला उंचताशीव (भिंती सारखे) कडे आणि मधुन हा ओढा. कसा-यापासुन खालुन वर चढता अथवा वरुन खाली कस-यापर्यंत या दरीतुन उतरता येत. श्रावण संपला की हा ट्रेक करण्याच ठरल आहे.
साधारण २.३०/३ पर्यंत दंगा मस्ती करुन गावात माघारी फिरताना हा ओढा टिपला ईथुन खरच माझा पाय निघत नव्ह्ता हो मंडळी पण....... :(
साध गावराण पद्धतीच जेवण होत ज्वारी भाकरी ,वांग्याचा रस्सा, बटाटा सुकी भाजी ,वरण भात, कांदा, ठेचा आणि भाजलेले पापड सगळ जेवण चुलीवरच बर का? जेवण ब-यापैकी ठसकेबाजच होत पण मंडळी भिजुन भुक्यावली होती तवा सम्द्यांनी उभा आडवा हात मारला. त्यांच आटपे पर्यंत मी गावात फेरफटाका मारुन आलो.
याला बघुन माझ्या बालपणीची आठवण झाली फरक होता त्यो फक्स्त गाड्या मधी
हे सुतार आजोबा नांगर तयार करत होते माझ्या मुलाने पण त्यांच्या बरोबर जरा रंधा मारायचा अयशस्वी प्रयत्न केला.
नेहमी प्रमाणे हे माझे किडे (आवडल्यास जरुर कळवा)
कॅमेरा निकॉन डी९०
लेन्स निकॉन १८-५५ आणि १०५
प्रतिक्रिया
12 Aug 2010 - 12:04 am | jaypal
एफ११ दाबुन फोटोंचा अजुन चांगला आनंद घ्या :-)
12 Aug 2010 - 12:10 am | बेसनलाडू
फार आवडले.
(पर्यटक)बेसनलाडू
12 Aug 2010 - 4:57 am | मदनबाण
सर्वच फोटो मस्त आहेत...ढग तर फारच सुंदर दिसत आहेत. :)
12 Aug 2010 - 5:02 am | Nile
मस्त!!! शेवटच्या फोटोत टोळ रंग बदलतो आहे हे तर बेस्टच
12 Aug 2010 - 9:24 am | jaypal
ते दोन वेगवेगळे नाकतोडे आहेत.
12 Aug 2010 - 9:30 am | Nile
ते दोन वेगवेगळे आहेत यात शंका नव्हती,पण टोळ म्हणालो चुकुन.
(पण तो रंग बदलतो आहे हे बरोबर आहे ना?)
12 Aug 2010 - 9:36 am | jaypal
ते रंग बदलत नसुन दोन वेगवेगळ्या प्रजातीचे ते स्वतंत्र प्रतीनीधी आहेत :-)
त्यांच्या कवचा वरुन पण हे लक्षात येऊ शकत
12 Aug 2010 - 8:28 am | येडाखुळा
आ हा हा....
अप्रतिम्...मी वाटच पहात होतो की जयपाल दादांचे पावसाळी फोटो अजून कसे नाही आले?
जबराट...
(अशा जागांची माहिती मिळते हे चांगलंच आहे...पण चंगळवादी पर्यटक तिकडे गेले नाहीत म्हणजे मिळवली..नाहीतर थोड्या दिवसांनी तिथेही प्लास्टिकच्या पिशव्या , बाटल्या सापडायच्या..)
12 Aug 2010 - 8:44 am | अप्पा जोगळेकर
फोटो छानच. हा ट्रेक उन्हाळा किंवा हिवाळ्यात करावा असे माझे वैयक्तिक मत. कारण इथून बर्यापैकी व्ह्ञू आहे जो पावसाळ्यात धुक्यामुळे मिळत नसणार . जसे, रतनगड, बाण सुळका, शिपनरचा डोंगराजोबाचा डोंगर इत्यादी. आणि भंडरदर्याला पूर्ण वळसा घातला तर घनचक्कर सुद्धा. असो. सुंदर फोटो.
12 Aug 2010 - 9:31 am | jaypal
म्हणता ते "इथून बर्यापैकी व्ह्ञू आहे जो पावसाळ्यात धुक्यामुळे मिळत नसणार "खरच तस आहे हो. म्हणुनच श्रावणानंतर परत एकदा जायच आहे.
टिप धुक्या मधे शक्यतो कॅमेरा वापरु नये एस.एल.आर तर टाळावाच कॅमे-याच्या / + (लेन्स बॅरल्च्या) पोकळ्यात जर हे धुक गेल तर छायाचित्रात कायम स्वरुपी धुसरता येउ शकते. (उशीराने का होईना पण आलेल शाहणपण :-()
12 Aug 2010 - 10:28 pm | मृत्युन्जय
टिप खुपच मोलाची आणि फोटो खुपच सुंदर.
12 Aug 2010 - 9:04 am | प्रचेतस
जयपालभाउ, तुम्ही आमची सांदण दरीची कधीही पुसली न गेलेली आठवण जागवलीत.
सांदण दरीच्या अधिक माहितीसाठी येथे पहा.
12 Aug 2010 - 9:13 am | शानबा५१२
एकदम आरपरटीम!!!!
मनुष्य प्राणी असलेले फोटो सोडुन दुसरे सर्व फोटो मनापासुन आवडले,अगदी वॉलपपेपर ठेवण्यासाठी जसं एखादी ईमेज आवडावी लागते तेवढे आवडले.
मस्तच रे,तुला हवं तेव्हा हव तिथे जायला मिळतं हे पाहुन मला तुझा हेवा वाटला.
12 Aug 2010 - 9:38 am | सहज
बसल्या बसल्या आमची फार मस्त भटकंती करवलीत. बाकी तो भोजनाचा एक फोटू पण टाकायला पाहीजे होता :-)
(खादाड) सहज
12 Aug 2010 - 9:43 am | jaypal
आहो ओलेत्याचा अंगात गारवा, सडकुन लागलेली भुक आणि कहर म्हणजे चुलीवरच्या रांधणाचा खमंग घमघमाट. खरच विसरुन गेलो हो. ( देहभान आणि फोटो काढण सुध्दा)
12 Aug 2010 - 10:43 am | स्वानंद मारुलकर
इथे बरेच दिवसांपासून जायचे आहे.
पुढच्या वेळी नक्की सांगा. :)
12 Aug 2010 - 10:56 am | नगरीनिरंजन
ढगांची त्सुनामी फार आवडली. नुसते फोटो पाहूनच एवढं गार गार वाटतं तर तिथे किती छान वाटलं असेल!
हे फोटो टाकून तुम्ही एक फार मोठं समजकार्य केलंत. धन्यवाद!
12 Aug 2010 - 11:32 am | जागु
मस्त फोटो.
13 Aug 2010 - 12:50 am | पुष्करिणी
मस्तच फोटो आलेत सगळे..ट्रेकचं नविन ठिकाण कळलं तुमच्यामुळे
13 Aug 2010 - 1:02 pm | रामदास
नेहेमीप्रमाणे अप्रतीम आहेत .
13 Aug 2010 - 1:19 pm | शरभ
छान फोटो. एक विनन्ति. गुगलच्या मदतीने जरा नकशा पण देत जा. म्हणजे मग आम्हाला पण प्लान करता येईल.
13 Aug 2010 - 3:11 pm | स्पंदना
नुसते छाया चित्रकार नाही आहात, त्या बरोबर कथा ही सांगता तुम्ही!
मिश्किल पणा सुद्धा डोकावतो त्यातुन. बायको अन नवरा, गाडा. ( मॉडर्न आहे कनी? टायरी आहेत त्याला)
बाय द वे हे सारे लोक तिथे कड्यावर उभे कसे राहु शकले? खालुन तुफ्फान वारा भणाणत येतो म्हणुन आम्ही त्य कड्यावर पोटावर पडुन खाली बघत होतो.
बाकि राहिली प्रतिक्रिया:- __/\__ ही घ्या!