आली गं आली होळीपुनवेची रंगपंचीम आली

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
11 Aug 2010 - 10:17 am

आली गं आली होळीपुनवेची रंगपंचीम आली

जास्वंदीचा रंग करा ग
सख्यांनो रंग खेळू चला ग
लाल रंग लावा गाली
त्या रंगाची चढली लाली
आली गं आली होळीपुनवेची रंगपंचीम आली ||धृ||

काढा ग काढा तिला घराबाहेरी
ओढा ग ओढा तिला करा बळजोरी
घ्या हाती रंग ओला
नेम धरूनी मारा पिचकारी
आली गं आली होळीपुनवेची रंगपंचीम आली ||१||

फेर धरूनी नाचू आता
हात हाती धरू चला
रंगाने माखू सार्‍या
आज अंगरंगांची ओळख झाली
आली गं आली होळीपुनवेची रंगपंचीम आली ||२||

राहू नका कोणी रंगांवीणा
भिजवा रंगात सार्‍यांना
आनंदाच्या सणात सारी
धरती भिजून गेली
आली गं आली होळीपुनवेची रंगपंचीम आली ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२२/०८/२०१०

कविता

प्रतिक्रिया

मीनल's picture

11 Aug 2010 - 6:58 pm | मीनल

काव्य प्रकाशन काळानुरूप असेल तर ते जास्त परिणामकारक होईल.
म्हणेज चतुर्थीच्या वेळी गणपतीचे तसेच होळीच्या वेळी होळीवरचे काव्य प्रकाशन असले तर बरे.

प्रशु's picture

11 Aug 2010 - 7:02 pm | प्रशु

वेळ काय काळ काय....

जाउदया पण छान कविता...

पाषाणभेद's picture

11 Aug 2010 - 8:37 pm | पाषाणभेद

तुम्हा दोघांचे म्हणणे खरे आहे. पण त्या त्या सणावाराच्या वेळी तसलीच कविता प्रसूत होईल हे कसे सांगावे? जेव्हा दिवस भरतात तेव्हाच प्रसूती होते. काळवेळ काय सांगून येत नाही.
बाकी होणार्‍या बाळाला (कवितेला) नावं-नाव ठेवण्याचा- बारशाचा (प्रतिसाद/ प्रतिक्रिया रूपी) समारंभ तुम्ही त्या बाळाचे नातेवाईक (वाचकरुपी) योग्य मुहूर्त पाहून (त्या त्या सणावाराच्या/ मुहूर्ताच्या वेळी) करू शकतात. हो की नाही?
अर्थात त्यासाठी तुम्हाला बाळांची पाळण्यातली नावे लक्षात (संकेतस्थळी खोदकाम रूपी) ठेवावी लागतील.
('कार्ट दुसर्‍याचं' असल्याने अन अशी कार्टी अनेक संख्येने असल्याने तुम्ही बाळांची पाळण्यातली नावे लक्षात कशाला ठेवतील म्हणा.) असो.
काही बाळे राजकुमार असतात की त्यांना सारे जग ओळखते अन काही बाळे काट्याकुट्यात, जंगलात जन्म घेतात जी जंगलालाच प्यारी असतात अन ती जंगलाची राजे असतात.

तुमचा सल्ला लक्षात घेवून 'नैसर्गीक प्रसूती' रोखून धरून योग्य सणावाराच्या/ मुहूर्ताच्या वेळी सिझेरीन करून प्रसूती करवून घेत जाईल. पण माझ्या 'खेपांची' संख्या जास्त असल्याने कधी कधी तसे होणारही नाही. म्हणून तुम्हाला योग्य वाटले तर बाळांना 'नावे' ठेवत चला.

मीनल's picture

11 Aug 2010 - 9:04 pm | मीनल

प्रसुती होऊ द्या हो नैसर्गिक रित्या .
पण ती जगापासून लपवून ठेवा आणि योग्य वेळ आली की जगाला दाखवा असे म्हणायचे आहे.
तेव्हाच बारसे होऊ द्या आणि आगमनाचा आनंद ही.

पाषाणभेद's picture

12 Aug 2010 - 8:45 am | पाषाणभेद

:-)

निरन्जन वहालेकर's picture

12 Aug 2010 - 8:09 am | निरन्जन वहालेकर

जाउ द्या हो ! कविता मात्र छान ! ! !