जीणं

अमोल मेंढे's picture
अमोल मेंढे in जे न देखे रवी...
10 Aug 2010 - 6:51 pm

कुणीही येतं आणी ...

भुकेलेल्याला अन्न मिळावं असं तुटुन पडतं...

कुस्करुन जातं... पन्नासची नोट अंगावर फेकुन...

त्याच्या प्रेमात मी पडले... अन् ...

पळुन आले त्याच्या बरोबर...

राजा राणीच्या सुखी संसाराच्या अपेक्षेत...

पण शेवटी राजानेच राणीचा घात केला...

आणी फक्त दहा हजारात माझा सौदा झाला...

सुरुवातीला वाटायचं ...

असल्या जीण्यापेक्षा.. आत्महत्याच करावी...

पण आता सवय झालीय...

अन् कालची सीता..

आजची सितारा म्हणुन बाजारात उभी राहलीय...

तेव्हापासुन गल्लीत उभं राहुन...

गिर्‍हाईकांची वाट पाहणं...

आणी स्वत:ला कुस्करुन घेऊन...

त्यांचं समाधान करणं...

हेच आमचं जीणं....

हेच आमचं जीणं...

करुणकविता

प्रतिक्रिया

क्रेमर's picture

10 Aug 2010 - 9:15 pm | क्रेमर

पुढील लेखनास शुभेच्छा.