आई समीप येता

अजय जोशी's picture
अजय जोशी in जे न देखे रवी...
5 Apr 2008 - 9:28 pm

आई समीप येता
पुत्रांस शोक झाला |
न जाणता तुला गे
किती काळ व्यर्थ गेला ||
पुत्रांस आई वाटे
देवापुढील ज्ञान |
आईस पुत्र वाटे
हृदयामधील प्राण ||
जगतात राम नाही
आईशिवाय काही |
सौंदर्य सृष्टी जगती
आईमुळेच पाही ||
आईपुढेच नम्र
आईपुढे कृतज्ञ |
नमतो इथेच तोही
सर्वांहुनि सर्वज्ञ ||

कविता

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Apr 2008 - 9:56 pm | llपुण्याचे पेशवेll

आईमुळेच पाही ||
आईपुढेच नम्र
आईपुढे कृतज्ञ |
नमतो इथेच तोही
सर्वांहुनि सर्वज्ञ ||
या ओळी तर एकदम उत्तम आहेत बघ. छान कविता आहे. अशाच अजून येऊद्या.
पुण्याचे पेशवे

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Apr 2008 - 9:56 pm | llपुण्याचे पेशवेll

आईमुळेच पाही ||
आईपुढेच नम्र
आईपुढे कृतज्ञ |
नमतो इथेच तोही
सर्वांहुनि सर्वज्ञ ||
या ओळी तर एकदम उत्तम आहेत बघ. छान कविता आहे. अशाच अजून येऊद्या.
पुण्याचे पेशवे

प्रभाकर पेठकर's picture

5 Apr 2008 - 11:07 pm | प्रभाकर पेठकर

श्री. अजय जोशी,
फार सुंदर कविता लिहीली आहे तुम्ही. अभिनंदन.
त्या माऊलीस जरूर दाखवा.

इनोबा म्हणे's picture

5 Apr 2008 - 11:21 pm | इनोबा म्हणे

अजयराव अप्रतिम कविता. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

जगतात राम नाही
आईशिवाय काही |
सौंदर्य सृष्टी जगती
आईमुळेच पाही ||
आईपुढेच नम्र
आईपुढे कृतज्ञ |
नमतो इथेच तोही
सर्वांहुनि सर्वज्ञ ||

खरं आहे

|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे

फटू's picture

6 Apr 2008 - 12:15 am | फटू

जगतात राम नाही
आईशिवाय काही |
सौंदर्य सृष्टी जगती
आईमुळेच पाही ||

छान आहे कविता....

विसोबा खेचर's picture

6 Apr 2008 - 12:17 am | विसोबा खेचर

कविता ठीक वाटली! त्यात ममत्वापेक्षा, आपुलकीपेक्षा छापिलपणा जास्त वाटला..

फक्त,

नमतो इथेच तोही
सर्वांहुनि सर्वज्ञ ||

या ओळी जरा बर्‍या वाटल्या, वेगळ्या वाटल्या!

आपला,
(मातृभक्त) तात्या.

मदनबाण's picture

6 Apr 2008 - 4:40 am | मदनबाण

आईस पुत्र वाटे
हृदयामधील प्राण ||
जगतात राम नाही
आईशिवाय काही |

कविता आवडली.

मदनबाण

चतुरंग's picture

6 Apr 2008 - 6:55 am | चतुरंग

प्रासादिक रचना!

चतुरंग

मीनल's picture

6 Apr 2008 - 5:05 pm | मीनल

लहान शब्द समुहातली उत्कट विचारांची कविती आहे .

मला वाटते आई हीच निस्वःर्थी प्रेम करू शकते. पत्नी नाही.निदान प्रत्येक वेळी तरी नाही.

मीनल.

धनश्रीदिनेश's picture

10 Apr 2008 - 8:44 pm | धनश्रीदिनेश

अतिशय सुन्दर ,

अजय जोशी's picture

20 Apr 2008 - 9:47 am | अजय जोशी

प्रतिक्रिया देणा-या सर्वांना मनापासून धन्यवाद.
(आपला पुणेरी)
अ. अ. जोशी