चॉकलेट मूस....very easy and extremely sinful!

जाई अस्सल कोल्हापुरी's picture
जाई अस्सल कोल्हापुरी in पाककृती
10 Aug 2010 - 12:04 am

साहित्य :

१) कुकिंग चॉकलेट - १५० ग्रॅम्स
२) साखर - पाउण कप
३) अंडी - ४ योक आणि व्हाईट वेगळे करून (ते कसे करायचे ते फोटोसहीत दिले आहे)
४) बटर - १ टेबल स्पून
५) व्हॅनीला इसेन्स : १ टेबल स्पून
६) कॉफी : १ T स्पून
७) whipped cream spray for decoration/ नाही मिळाले तर फ्रेश क्रीम पण चालेल.

अंडे फोडुन असे सेपरेट करा.

एका मोठ्या पण मध्ये पाणी उकळत ठेवा. त्यामध्ये दुसरे पातेले किंवा बाउल ठेवा. त्यामध्ये चॉकलेट वितळवायला घ्या.चॉकलेट जर डायरेक्ट फ्लेम वर ठेवले तर करपते.म्हणून आपल्याला फक्त उष्णतेवर वितळवून घ्यायचे आहे.(डबल बॉईल) सतत हलवत रहा.

पूर्ण पातळ झाल्यावर त्यामध्ये २ चमचे पाणी घालून हलवा.त्यानंतर बटर आणि व्हॅनीला घाला.असं मस्त क्रीमी होईपर्यंत मिक्स करा.

असा चॉकलेट चा मस्त वास घरभर दरवळू लागेल. आता तो बाउल बाहेर काढून घ्या .त्यात एकेक एग योक घाला आणि मिक्स करून घ्या.
एग व्हाइट + साखर ब्लेंडर / हँड मिक्सी मध्ये घ्या. ते पांढरे शुभ्र दाट होइपर्यंत blend करा.असं मस्त क्रीमी...सॉसी दिसतं ते. आता हे एग व्हाईट आपल्या चॉकलेट मिक्स मध्ये हळू हळू घाला. आणि अगदी छान ..स्मूथली मिक्स करा.

हलक्या हाताने छान सगळे एकजीव करून घ्या. आता तुम्हाला ज्या बाउल मध्ये / ग्लास मध्ये सर्व्ह करायचे आहे त्यात घाला..
हे shot glasses मध्ये जास्त छान दिसते.

फ्रीज मध्ये ठेवा. सेट व्हायला साधारण दोन तास लागतील..तोपर्यंत कसातरी कुठतरी वेळकाढूपणा करा.(कारण ते सेट होईपर्यंत मला तरी धीर धरणं मुश्कील असत!)


२ तासानंतर बाहेर काढा.ते सेट झालेलं असेल.आता त्यावर whipped cream spray नी असा rosette द्या ...किंवा fresh क्रीम असेल थोडे फेटून त्यावर घाला .

.....आणि तुमच्या आवडत्या कोपऱ्यात जा. (Do Not Disturb चा एक बोर्ड लावा... ;))
आणि अगदी हलक्या हाताने चमच्यात घ्या. तो नाकाजवळ घेऊन त्याचा मस्त अरोमा घाला......आणि मग आस्वाद घ्या ......wallah!
(and miss me everytime you create this extacy..!) ;)

प्रतिक्रिया

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

10 Aug 2010 - 12:25 am | जाई अस्सल कोल्हापुरी

चुकुन छापताना अरोमा घ्या च्या ऐवजी घाला असे झाले आहे.
नाहीतर नाकाजवळ चमचा नेऊन अरोमा कुठे घालयचा हा यक्षप्रश्न नको..... :)
घ्या...अरोमा घ्या...

कुंदन's picture

10 Aug 2010 - 1:36 am | कुंदन

कधी येउ आस्वाद घ्यायला?
यंखाद्या इफ्तारला द्या आमंत्रण.

सहज's picture

10 Aug 2010 - 6:54 am | सहज

मस्तच!

पण ते शॉट ग्लासेसपेक्षा किमान स्कॉचग्लास वापरतो हो :-)

कार्तिका's picture

10 Aug 2010 - 9:54 am | कार्तिका

फोटो पाहुन तोंडाला पाणी सुटले
सर्व्हींच्या वेळी यामधे रासबेरीचे पातळ काप घालुन खायला अजुन मजा येते.
(चॉकलेट वेडी)
आपली कार्तिका,

शरयुप्रितम२०१०'s picture

10 Aug 2010 - 10:11 am | शरयुप्रितम२०१०

आईशप्पथ चॉकलेट मूस!!!!
chocklate हा माझा weak point आणि त्यात मूस म्हणजे विचारायलाच नको.
खूप मस्त मस्त मस्त मस्त....

स्वाती दिनेश's picture

10 Aug 2010 - 11:00 am | स्वाती दिनेश

मस्त दिसते आहे मूस!
(मी कुकिंग चॉकलेट न घेता येथे मूससाठीचा म्हणून जो चॉकलेट बार मिळतो त्याचे मूस करते,त्यातही कापुचिनो, एस्प्रेसो असे वेगवेगळे फ्लेवर घेतले तर क्या केहेने!)
स्वाती

मी ऋचा's picture

10 Aug 2010 - 2:27 pm | मी ऋचा

प्रिण्ट काढुन घेत्ले आहेत...घरी गेल्यावर नक्कि करणार...

प्रियाली's picture

10 Aug 2010 - 4:33 pm | प्रियाली

मस्तच दिसते आहे.

गणपा's picture

10 Aug 2010 - 4:42 pm | गणपा

एकदम फंडु पाकृ. :)

जागु's picture

10 Aug 2010 - 4:58 pm | जागु

एकदम भारी.

चित्रा's picture

10 Aug 2010 - 6:33 pm | चित्रा

पाककृती छान.
हे असे चॉकलेट (किंवा स्ट्रॉबेरी) मूस कधी करून पाहिले नाही, पण भयंकर आवडते.. :)

प्रींट काढले आहेत.. आणि तेच चाटत आहे.

स्वाती२'s picture

10 Aug 2010 - 7:41 pm | स्वाती२

मस्त!

इंटरनेटस्नेही's picture

11 Aug 2010 - 4:33 am | इंटरनेटस्नेही

टोन्डा ला पाणी सुट्ले!*

*आभार: वैदर्भिय!

नगरीनिरंजन's picture

12 Aug 2010 - 8:21 am | नगरीनिरंजन

कॉफी कधी घालयची? ग्लासमध्ये सेट करायला ठेवल्यावर का?
फार छान फोटो आणि सोपी रेसिपी सांगितलीत. नक्की करुन पाहणार.
धन्यवाद!

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

12 Aug 2010 - 8:38 am | जाई अस्सल कोल्हापुरी

कॉफी + व्हॅनिला+बटर एका वेळी घातले तर चालेल.
कॉफी नी एक मस्त deeep flavour येतो.
नाही घातली तरिही चालते.