नाव सुचले नाही....

बरखा's picture
बरखा in जे न देखे रवी...
9 Aug 2010 - 8:40 pm

दाराला तोरण आ॑ब्याचे
र॑गित रा॑गोळी,पणती तेवते,
पाहुण्या॑ची रेलचेल गडबड वाढते
आज दिन सोनियाचा,माझी लेक
सासरला ग जाते...
आईच्या डोळ्यात भरले ग पाणि,
पापणि लवता मोती येतिल ग खाली
ऊरातिल धडधड वाढ्तच जाते
बघता बघता लेकीच्या डोक्यावर अक्शत पडेते,
सुर येई सनईचे,चऊघडा ग वाजे
लेक आईची कशी पति बरोबर सप्तपदी चालते
लहान असताना धरे पित्याच्या ग हात
सप्तपदी चालताना तिला होते का आठवण
आज लेकीची झाल दिली तिच्या सासरी
डोक्यावर ठेवली टोपली दिव्या॑ची,
आईचे डोळे बोलती,
मुली तेवत रहा सदा अशी सासरी
झाले सर्व विधि मुलगी आ॑बा ग शि॑पते
आईच्या मा॑डित झोपणारी काल,
आ़ज पतिच्या मा॑डिवर पाय ठेवते
आईच्या हातात डबा फराळाचा
लेकीला निरोप देताना अश्रु॑चे मोती
वाहिले घळाघळा
पिता ऊभा ला॑ब दाराच्या अडुन,
कशी चालली लेक माझी, मला ग सोडुन
हु॑दका देत लेक चाले सासरची वाट
तिच्या भोवती सगळ्या नातेवाईका॑चा थाट......

मुक्तक

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Aug 2010 - 9:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखनातला भावना पोहचल्या.
अजून लिहित राहा....!

-दिलीप बिरुटे