१वाटी बासमती तांदूळ,१ मध्यम कांदा ,२ टेबल स्पून पिवळे मके,
मीठ चवीनुसार,१ हिरवी मिरची,१ टेबल स्पून तेल/साजूक तूप
+१ चहाचा चमचा साजूक तूप, १ टे. स्पून काजू तुकडे
भात मोकळा शिजवून घ्या.कांदा उभा चिरून घ्या. मिरची बारीक चिरा.ताजे मक्याच्या दाण्यातील मके असतील तर वाफवून घ्या,कॅन मधील मके वाफवून घ्यायची गरज नाही.
एका कढईत/नॉन स्टीक पॅन मध्ये तेल /तूप तापत ठेवा.त्यात जिरे घाला,मिरच्यांचे तुकडे घाला,कांदा घाला.कांदा गुलाबीसर परता,नंतर काजू तुकडे घालून परता, मके घाला,थोडे परता.भात घाला,मीठ घाला,हलक्या हाताने शीत न मोडेल अशा बेताने परता,साजूक तूप सोडा. झाकण ठेवून वाफ येऊ द्या.तेला ऐवजी तूप घेतले तर जास्त छान लागतो हा भात.
कोणत्याही spicy gravy बरोबर खा.
पेठकरांच्या प्रॉन्स बालचाव बरोबर मस्तच लागेल..(स्वगत)
प्रतिक्रिया
5 Apr 2008 - 8:41 pm | प्रभाकर पेठकर
मकई राईस मलाही आवडतो. मी त्यात थोडी काळी मिरी घालतो. (थोडीच, जास्त नाही).
प्रॉन्स बालचाव बरोबर निश्चित मस्स्स्स्त लागेल.
6 Apr 2008 - 12:30 pm | विसोबा खेचर
स्वाती,
एकदा करून पाहिला पाहिजे तुझा हा मकई राईस.. :)
आपला,
(मकाप्रेमी) तात्या.
9 Apr 2008 - 10:58 pm | वरदा
घरी कॅन आहे आणि आज पोळ्या करायचा कंटाळा आलाय आज करतेच...
स्वाती, पेठकरकाका कुणीतरी मला टॉमॅटो पुलाव सांगा ना कसा करु....