अक्षय धन
होतो आजवर रंक मी,
प्रित तुजवर जाहली,
अक्षयदौलत विरह वेदनांचि
ईश्कांत मजला लाभली.
राव सारे विश्वातले,
गेले निष्कांचन मरणासवे,
साथ नुरली संपन्नतेचि,
रंक सगळे मृत्युसवे.
ह्यापरी सामान्य आम्ही नव्हे
अभिमान हा अंतरी
दौलत अन्तिहि मजसवे
धनवान मी सरणावरी
निरंजन वहाळेकर
प्रतिक्रिया
11 Aug 2010 - 2:12 pm | गंगाधर मुटे
ह्यापरी सामान्य आम्ही नव्हे
अभिमान हा अंतरी
दौलत अन्तिहि मजसवे
धनवान मी सरणावरी
सुंदर कविता.