जेजूरी गडावर नांदे मल्हारी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
7 Aug 2010 - 7:18 pm

देवा तुझी सोन्याची जेजूरी

जेजूरी गडावर नांदे मल्हारी
देवा तुझी सोन्याची जेजूरी ||धृ||

देव बसलाय उंच गडावर
चला जावू चढू पायर्‍या हजार
गडकोट बांधला करण्या संरक्षण
वेशीतून जावू घेवू देवाचं दर्शन
बेल भंडारा उधळूनी बोला
यळकोट यळकोट जय मल्हारी
देवा तुझी सोन्याची जेजूरी ||१||

देव हा खर्‍या शुरांचा
राजा शिवाजी, मल्हाररावांचा
पराक्रमी उमाजी नाईकांचा
गोरगरीब रयतेचा
मेंढरासंग धनगरांचा
अशा देवाची करू वारी
देवा तुझी सोन्याची जेजूरी ||२||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०७/०८/२०१०

वीररसकविता

प्रतिक्रिया

सागरलहरी's picture

10 Aug 2010 - 11:43 pm | सागरलहरी

खूपच छान