वाटते बोलायचे राहून गेले
तेच रडगाणे पुन्हा गाऊन गेले
भेटले जे,ते मला फसवून गेले
हे फुकट आहे कळाले त्यांस जेव्हा,
पोट भरलेले,तरी खावून गेले
मतलबी झालो इथे मी, काल जेव्हा
आप्त माझे पाठ मज दावून गेले
माफ केले पाप ते सारे तुझे मी
आसवांसमवेत जे वाहून गेले
पक्ष कसले?काय्?हे कळते न ज्यांना,
आपला झेंडा इथे लावून गेले
जाहले '' कैलास '' सारे सांगुनी पण,
वाटते,'' बोलायचे राहून गेले ''
डॉ.कैलास गायकवाड
प्रतिक्रिया
7 Aug 2010 - 6:36 pm | पाषाणभेद
रसिक डॉक्टर