मावळतीला रंग शोधणारा ढग मी...

फ्रॅक्चर बंड्या's picture
फ्रॅक्चर बंड्या in जे न देखे रवी...
5 Aug 2010 - 7:05 pm

पावसाळ्यात इंद्रधनुसवे रंगणारा पावसाचा थेंब मी
अन कधी कधी सात रंगाशी नाते जोडणारा इंद्रधनू मी

माझ्या पंखांसाठी फुलांचा रंग वेचणारे फुलपाखरू मी
अन कधी रंगासाठी आसुसलेला रंगपेटीतला कुंचला मी

तुझ्या डोळ्यात माझ्या स्वप्नांसाठी रंग शोधणारा वेडा मी
अन कधी उन्हाळ्यात उन्हासवेच रंगणारा प्रियकर गुलमोहर मी

कधी पहाटेला सूर्यासवे भगव्यात रंगणारा शुक्रतारा मी
अन कधी मावळतीला स्वत:साठी रंग शोधणारा ढग मी

कविता

प्रतिक्रिया

अवलिया's picture

5 Aug 2010 - 7:07 pm | अवलिया

सुरेख !!

नाना बेरके's picture

5 Aug 2010 - 7:11 pm | नाना बेरके

रंगरंगीली कविता. प्रत्येक ओळीत शब्दरंग (म्हणजे रंग हा शब्द ) भरलाय.
जबर्‍या रे, रंगराव.

जिप्सी's picture

5 Aug 2010 - 8:01 pm | जिप्सी

फ्रॅक्चर बंड्या नावाचा मनुष्य अत्यन्त कविमनाचा आहे. डेंजर काम्बिणेशण !

पण मस्त कविता.

अर्धवट's picture

5 Aug 2010 - 8:14 pm | अर्धवट

इष्टमनकलर कविता..

जमलिये

अनिल हटेला's picture

5 Aug 2010 - 8:56 pm | अनिल हटेला

कलरफूल कविता !!

आपला ,
ब्लॅक ओन्ली !! ;)

फ्रॅक्चर बंड्या's picture

9 Aug 2010 - 8:15 pm | फ्रॅक्चर बंड्या

कलरफुल धन्यवाद ...