तू गं उभी अंगणात
माफी मागताना मला
एका हातामधी झाडू
एक कानापाशी गेला
आधी पुंजा गोळा केला
पुन्हा पांगून टाकला
तुझं अंगण झाडणं
असं उन्हाच्या वेळेला
हसू फुटलं तरीही
हसू दाबलं ओठात
गेलो उठून घरात
खोट्या रागाच्या भरात
दार लावून घेतलं डोळा फटीशी लावला
जीव तुझा कासावीस मी गं होताना पाहिला...
- वैभव देशमुख
प्रतिक्रिया
5 Aug 2010 - 6:45 pm | नाना बेरके
दार लावून घेतलं डोळा फटीशी लावला
जीव तुझा कासावीस मी गं होताना पाहिला...
.. वा, काय कल्पना आहे. आवडली.
5 Aug 2010 - 8:23 pm | शुचि
डाऊन टू अर्थ कविता.
5 Aug 2010 - 8:29 pm | अडगळ
सुंदर लय असते राजे तुमच्या कवितांना.
5 Aug 2010 - 8:29 pm | अर्धवट
आवडली.
6 Aug 2010 - 8:44 am | राजेश घासकडवी
आवडली
6 Aug 2010 - 8:51 am | llपुण्याचे पेशवेll
मस्तं कविता आहे आवडली.
बाकी पुंजा म्हणजे काय?
बाकी फटीशी डोळा लावल्यावर कासवीस होताना पाहणं स्वाभाविक आहे.
कविता छान.
6 Aug 2010 - 9:14 am | दीपक साकुरे
आवडली..
6 Aug 2010 - 10:15 am | निरन्जन वहालेकर
दार लावून घेतलं डोळा फटीशी लावला
जीव तुझा कासावीस मी गं होताना पाहिला
मनात चलबिचल झाली ! भन्नाट ! ! लय भारी ! ! !
6 Aug 2010 - 12:11 pm | वैभव देशमुख
सर्वांचे मनपासून धन्यवाद...