चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही !

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
5 Aug 2010 - 5:17 am

आमची प्रेरणा गेले १-२ दिवसातले सैपाकाचे धागे आणि संदिप खरे यांची अप्रतिम कविता चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !

जरा चुकीचे, जरा बरोबर खर्डू काही !
चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही !

नव्या-नव्यां ह्या किती आयडी बघ धाग्यातुन -
आजच आहे आला म्हणतो खर्डू काही
चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही !

हवेहवेसे 'शतक' तुला जर हवेच आहे
नकोनकोते हलके चावट खर्डू काही
चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही !

उगाच वळसे प्रतिसादांचे देत रहा तू
उडले नाहीत धागे तोवर खर्डू काही
चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही !

तुफान पाहुन धाग्यावर कडकडल्या थोड्या
लाज निघू दे त्याची ऐसे खर्डू काही
चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही !

शब्द असू दे हातामध्ये शस्त्र म्हणुनी
आज "केशवा" थोडे परखड खर्डू काही
चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही !

विडंबन

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

5 Aug 2010 - 5:18 am | शिल्पा ब

छान..

निरन्जन वहालेकर's picture

5 Aug 2010 - 7:27 am | निरन्जन वहालेकर

सुन्दर ! !
आणि समयोचित पण ! ! !

आमोद शिंदे's picture

5 Aug 2010 - 7:28 am | आमोद शिंदे

क्या बात है!!

चतुरंग's picture

5 Aug 2010 - 7:32 am | चतुरंग

गुर्जी, एकदम क आणि ड आणि क!! :)

(खर्डेघाशा)चतुरंग

अगदी असेच म्हणतो..

मी ह्यांना ओळखत असल्याने चांगला प्रतिसाद दिला आहे..

बाकी गुर्जी, तुम्ही प्रतिसादांतुन योग्य तो बोध घ्यालच, आणि तुमची भरकटलेली जिवननौका योग्य मार्गदर्शनाने नीट प्रवाहाला लागो ही सद्दिच्छा..

विद्याधर३१'s picture

5 Aug 2010 - 7:56 am | विद्याधर३१

गुरुजी तुमचीच कमी होती.
आता येऊ दे बाकीच्यांना मैदानात

प्रकाश घाटपांडे's picture

5 Aug 2010 - 7:59 am | प्रकाश घाटपांडे

नकोनकोसे 'शतक' तुला जरी नकोच आहे
हवेहवेसे हलके चावट खर्डू काही

आजानुकर्ण's picture

5 Aug 2010 - 9:18 am | आजानुकर्ण

केशवराव,

विडंबन आवडले.

मूळ कवितेपेक्षा सरस.

ऋषिकेश's picture

5 Aug 2010 - 9:26 am | ऋषिकेश

हॅ हॅ हॅ.. शेवटी केसुगुर्जींनाही सैपाकघर सोडवले नाहि तर :-)
विडंबन मस्त!

बेसनलाडू's picture

5 Aug 2010 - 10:00 am | बेसनलाडू

(आयुष्यमान)बेसनलाडू

नाना बेरके's picture

5 Aug 2010 - 1:06 pm | नाना बेरके

ते "चा पु सा के" म्हनजे चाटुन पुसुन साफ केले.
भारी. मी पण आत्तापासूनच केसु चा फ्यान झालो.

परिकथेतील राजकुमार's picture

5 Aug 2010 - 1:09 pm | परिकथेतील राजकुमार

छान छान विडंबन एकदम . खर्डेशाही एकदम मंजूर ;)

तुम्हाला ओळखतो म्हनुन मुद्दाम वा वा चान चान करत आहे असे सम्जु नये.

मस्त कलंदर's picture

5 Aug 2010 - 2:06 pm | मस्त कलंदर

छान छान विडंबन एकदम . खर्डेशाही एकदम मंजूर :)

तुम्हाला ओळखते, तुमचे नामव ऐकुन आहे म्हनुन मुद्दाम वा वा चान चान करत आहे असे सम्जु नये.

आंबोळी's picture

5 Aug 2010 - 4:25 pm | आंबोळी

केसुगुर्जीना मी ओळखत असल्याने उगाच वा वा चान चान करणार नाही.
फक्त विडंबन आवडले येवढेच म्हणतो..
बाकी नान्याशी कट टु कट सहमत...

प्रियाली's picture

5 Aug 2010 - 6:40 pm | प्रियाली

:) मस्त!

तिमा's picture

5 Aug 2010 - 7:32 pm | तिमा

सध्या मिपावर 'अवतारी' सदस्य एकाएकी प्रकटले आहेत. तरी त्यांनाच गुरु मानून ते सांगतील तो मार्ग स्वीकारावा. जसे, शहेनशहा ने एका रात्रीत एका नामचीन गुंडाला दुधवाला बनवले होते.
तुम्हाला व्यक्तिशः ओळखत नाही. तरी वर जे काही लिहिले आहे ते चान, चान!!!

अनिल हटेला's picture

5 Aug 2010 - 9:00 pm | अनिल हटेला

चान चान !!

(अवांतरः आम्ही ही केसु गुर्जींना अजीबात ओळखत नाही!)

केशवसुमार's picture

6 Aug 2010 - 12:31 am | केशवसुमार

आम्हाला ओळखणार्‍या आणि आम्हाला न ओळखणार्‍या सर्व वाचकांचे मनापासून आभार!
(आभारी)केशवसुमार

पारुबाई's picture

6 Aug 2010 - 1:26 am | पारुबाई

सही रे सही

अमोल केळकर's picture

6 Aug 2010 - 9:50 am | अमोल केळकर

पुन्हा एकदा सही रे सही

अवलिया's picture

1 Feb 2011 - 11:21 am | अवलिया

फारच छान !!
नुकतीच आमच्या टारुची एक भन्नाट पाककृती उडाली. हा धागा पाहिला आणि डोळे पाणावले.

टारझन's picture

1 Feb 2011 - 5:07 pm | टारझन

बहुतेकी ती चिडक्याना पचली नसावी. .. सोसली नव्हती म्हणे .. मिर्‍या जास्त झाल्या असाव्यात =))

अवांतर : विडंबण छाण आहे . जियो ... वृत्त वगैरे परफेक्ट जमली नाहीयेत , पण जमेल सरावाने. :)

-( रडक्या मडक्यांचा कर्दनकाळ ) टारझन

डावखुरा's picture

1 Feb 2011 - 5:13 pm | डावखुरा

मी मुकलो ह्या पाकृला...