दयाळू

सौरभ परांजपे's picture
सौरभ परांजपे in जे न देखे रवी...
2 Aug 2010 - 5:40 pm

माझ्या मनाला कसा उमजून टाळू?
मोग-याचा गजरा कोणत्या केसात माळू?

कोणत्या युगात जन्म घेतला मी
येथला हर एक पापी कनवाळू

माझ्या पवित्रतेचे का मांगता पुरावे?
सीतेला तुम्हीच दिलेत चितेत जळू

मला भोगणारा, माझाच सखा होता
कोणत्या खांद्यावर विसावून अश्रू गाळू

माझ्या सहिष्णूतेला त्यांचा आक्षॆप होता
त्यांतला कोणीच नव्हता इतका दयाळू

गझल

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

2 Aug 2010 - 6:22 pm | चतुरंग

अळू, गळू, पळू, साळू अशी अजून काही यमके राहिली आहेत! ;)

परिकथेतील राजकुमार's picture

2 Aug 2010 - 6:31 pm | परिकथेतील राजकुमार

जर्दाळु विसरलात का ?

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Aug 2010 - 6:36 pm | llपुण्याचे पेशवेll

कविता छान आहे. पण वृत्तात मार खाते आहे.