प्लस व्हॅलीमधे... धो-धो पावसात...

विमुक्त's picture
विमुक्त in कलादालन
2 Aug 2010 - 4:58 pm

प्लस व्हॅलीमधे उन्हाळ्यात गेलो होतो तेव्हाच ठरवलं होतं की आता पावसात इथे यायचं... एखादं चित्र काढताना चित्रकार आधी आराखडा तयार करतो आणि मग त्यात रंग भरतो... उन्हाळ्यातल्या प्लस व्हॅलीमधे आज एका महान कलाकाराने खूप सुंदर रंग भरले होते... धो-धो पाऊस होता... कड्यावरुन धबधबे सोडले होते... जागोजागी पाण्याचे ओढे खळाळत होते... दरीमधे धुकं अडकलं होतं... धरणीतून गवताचे कोवळे कोंब उगवले होते... जंगलातून सुभग पक्षी सुरात गात होते... सगळ्या सृष्टीत चैतन्य जाणवत होतं... तेरड्याच्या एखाद्याच फुलाला हे सगळं बघण्याची घाई झाली होती... कोवळ्या गवतातून मान वर करुन ते एकटचं हे सगळं अनुभवत होतं... आज ह्या सृष्टीचाच एक भाग होवून हे सगळं अनुभवण्याचं भाग्य आम्हाला लाभलं होतं...

साधारणश्या ओढ्यातूनच दरीत उतरावं लागतं... उतार तसा जरा जास्त आहे आणि जंगल एकदम दाट... मी आणि यशदीप असे आम्ही दोघेच होतो... साधारण एक तासात दरीत उतरलो... दरीतला नजारा बघून केवळ निशब्द झालो... जणू वेळ थांबलीच होती... ओढ्याकाठी बसून भान हरपून जे काही दिसतयं त्याचा आस्वाद घेतला...

कोसळत्या धबधब्याकडे टक लावून बघण्यात वेगळीच मजा असते... क्षणा-क्षणाला तो वेगळा भासतो... सगळं कसं क्षणभंगुर असल्या सारखं वाटतं... प्रत्येक क्षण वेगळा आणि त्यातली मजा वेगळी... आणि अश्या वेळी अश्या जागी असलं की प्रत्येक क्षण जगता देखील येतो...

टीपः भटकंतीचा खूप अनुभव नसेल तर शक्यतो पावसात प्लस व्हॅलीमधे उतरु नका...

विमुक्त
http://murkhanand.blogspot.com/

छायाचित्रण

प्रतिक्रिया

वाह!!! मस्तरे विमुक्ता.
पण या वेळी हात बराच आखडता घेतलास :(

मेघवेडा's picture

2 Aug 2010 - 5:17 pm | मेघवेडा

असेच म्हणतो.

स्वाती दिनेश's picture

2 Aug 2010 - 5:14 pm | स्वाती दिनेश

फोटो मस्तच.. पण गणपा म्हणतो तसे रेशनिंग का बरे ह्या वेळी?
स्वाती

mamuvinod's picture

2 Aug 2010 - 5:31 pm | mamuvinod

पण हि प्लस व्हॅली कुठे आहे

जरा सविस्तर लिहा कि राव

मामु

संजा's picture

2 Aug 2010 - 6:20 pm | संजा

>>>एखादं चित्र काढताना चित्रकार आधी आराखडा तयार करतो आणि मग त्यात रंग भरतो.

+१००

मस्तच

संजा

प्रभो's picture

2 Aug 2010 - 7:18 pm | प्रभो

झ का स!!

वाटाड्या...'s picture

2 Aug 2010 - 9:28 pm | वाटाड्या...

"पण हि प्लस व्हॅली कुठे आहे?" - असेच बोल्तो...

चित्रं मस्तच आहेत...

- वा

भिरभिरा's picture

2 Aug 2010 - 10:28 pm | भिरभिरा

गजब ...ठिकाण अजुन माणसाळलेले नाही त्यामुळे मस्तच फोटो..
पण ठिकाण कोणते...?

श्रावण मोडक's picture

2 Aug 2010 - 10:36 pm | श्रावण मोडक

कुठं आहे रे सायबा ही प्लस व्हॅली? पाऊस असो वा नसो गेलंच पाहिजे असं ठिकाण आहे सालं. फटू भारीच !

प्रचेतस's picture

3 Aug 2010 - 8:59 am | प्रचेतस

प्लस व्हॅलीत कुठून उतरलास रे??
ताम्हिनी घाटातल्या त्या वळणावरून का सिनेर खिंडीच्या मार्गाने?

रंगोजी's picture

5 Aug 2010 - 4:22 pm | रंगोजी

फोटो सुंदरच.. धन्यवाद!!

-रंगोजी

कुठं आहे रे सायबा ही प्लस व्हॅली? >>>

ताम्हीणीतुन पुढे !!

राजकुमार मोड >> विमुक्त,आपके हिम्मत की दाद देता हूं !! जहां लोग घुप मे अकेले जाने से कतराते है, वहाँ आप बरसात में चले गये !! बहोत खुब !! <<राजकुमार मोड संपला.

चित्रा's picture

6 Aug 2010 - 12:59 am | चित्रा

दुसरा फोटो विशेष आवडला.
विमुक्त यांच्या ब्लॉगवर प्लस व्हॅली कुठे आहे ते बहुदा कळेल.
http://murkhanand.blogspot.com/2010/02/blog-post_04.html

सहज's picture

6 Aug 2010 - 7:47 am | सहज

मिपावरचा अजुन एक हिरा!

बेसनलाडू's picture

6 Aug 2010 - 7:56 am | बेसनलाडू

(रत्नपारखी)बेसनलाडू

मदनबाण's picture

6 Aug 2010 - 8:05 am | मदनबाण

वा,सुंदरच !!! :)

मालोजीराव's picture

7 Aug 2010 - 8:46 pm | मालोजीराव

हि प्लस valy आहे झक्कास पण आहे कुठे ते तरी सांगा कि राव म्हणजे आम्ही पण जातो !