आमची प्रेरणा अनिरुद्ध अभ्यंकर यांची कविता मोजणी
हल्ली घरात कोणा वस्तीस नेत नाही
मी ही चुकून सुद्धा जोखीम घेत नाही
आश्वासने जरी ती देऊन काल गेली
मी खातरी तिची पण कोणास देत नाही
सारे तिचे पुरावे जाळून काल आलो
फसलो तरी कसा मी लक्षात येत नाही
'सत्कार' 'खास' अमुचा झाला कशा कशाने
मज मोजदाद त्याची अजिबात येत नाही
देहास पार अमुच्या सुजवून ठेवले की
ऐन्या पुढे स्वतःला इतक्यात नेत नाही
मी श्वास घेतला की मज वास येत नाही
माझा सुगंध आता इथल्या हवेत नाही
सांगून "केशवा"ला काहीच फायदा ना
शाबूत हाड कुठले ह्याच्या जिभेत नाही
प्रतिक्रिया
4 Apr 2008 - 10:32 am | धोंडोपंत
वा वा केशवसुमार,
तुम्ही लिहिते झालात ही आनंदाची बाब आहे. विडंबन आवडले.
पण मूळ रचनेचा दुवा उघडत नसल्यामुळे मूळ रचना डोक्यात ठेऊन विडंबन वाचण्याची तौलनिक मजा घेता आली नाही.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
आपला,
(चाहता) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
4 Apr 2008 - 11:09 am | विसोबा खेचर
सांगून "केशवा"ला काहीच फायदा ना
शाबूत हाड कुठले ह्याच्या जिभेत नाही
चालू द्या केशवशेठ! :)
तात्या.
4 Apr 2008 - 11:19 am | धमाल मुलगा
केशवसुमार हा मनुष्य अशक्य कोटीतला (की कोट्यातला म्हणाव॑?) आहे.
कशा-कशाच॑ कस॑-कस॑ विड॑बन करेल नेम नाही!
अरे! ह्या माणसाला काह्हीही द्या..कि॑वा कशाला देता, तो नाहीच काही मिळाल॑ तर स्वतःच काहीतरी लिहून त्याच॑ विड॑बन करु शकतो..
ज्याला दिली त्याला भरभरुन प्रतिभा आणि आमच्यासारख्याला 'ठेविले प्रतिक्रियेपुरते' देवी सरस्वती असा दुजाभाव का करते कळत नाही बॉ!
:-)))) मस्त...आम्ही जोरात सहमत! (न असुन सा॑गतो कोणाला..बोल हे अनुभवा॑चे !!!)
- (प्रतिक्रियेपुरता) ध मा ल.
4 Apr 2008 - 5:17 pm | केशवसुमार
कोट्याच्या ऐवजी कोठ्याचा वाचलन भै.
हा प्रतिसाद वाचून खुर्ची वर नाही हरभर्याच्या झाडावर बसल्यागत वाटतय..
लवकरच पार्श्व अमुचे शेकले जाणार असे वाटू लागले आहे..
केशवसुमार
4 Apr 2008 - 5:24 pm | धमाल मुलगा
कोठ्याचा?
अशक्य कोठ्याचा???
ह.ह.पु.वा.
देवा, देवा अजुन कशाकशाच॑ इड॑बन करणार आपण?
4 Apr 2008 - 11:24 pm | ऋषिकेश
सांगून "केशवा"ला काहीच फायदा ना
शाबूत हाड कुठले ह्याच्या जिभेत नाही
हे लई आवडले.. बाकी विडंबन पण झ्याक :)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
4 Apr 2008 - 11:32 pm | वरदा
कविता आणि स्वतःचच विडंबन ....मानलं तुम्हाला...ग्रेट आहात एकदम..
गजल आणि विडंबन दोन्ही मस्त!!!
4 Apr 2008 - 11:36 pm | चतुरंग
काय सांगू बाबा केशवा धन्य आहेस!
चतुरंग