क्रांती ताई, माफी असावी
मूळ कविता : http://www.misalpav.com/node/13405
तुझा भात गं जळका
भाकरी ही ढाल जशी ,
तुला पाहताच मेली ,
अन्नपूर्णा पटदिशी.
बासुंदीत ही दोडके,
हे का नव्हते थोडके,
आमरसात बटाटे,
आली शिर्यात हाडके.
शिव्या तरी किती घालू ,
गेली विटाळून वाणी,
तुझ्या बापानं का कधी,
दिली चहाला फोडणी ?
यावे यमा रेड्यावरी,
आतड्याचे तुम्ही वाली
जळो , मरो ही शिदोरी,
नरकाची मेस बरी
प्रतिक्रिया
30 Jul 2010 - 2:47 am | केशवसुमार
अडगळशेठ,
हे विडंबन नसून एक उत्तम हास्य कविता आहे..
एकदम झकास.. चहा फोडणी, नरकाची मेस.. हा हा हा..
चालू दे..
(स्वयं स्वयंपाकी)केशवसुमार
30 Jul 2010 - 1:42 pm | श्रावण मोडक
हेच म्हणतो.
(फक्त कंसाचा अपवाद)
30 Jul 2010 - 2:50 am | राजेश घासकडवी
बासुंदीत ही दोडके,
हे का नव्हते थोडके,
आमरसात बटाटे,
आली शिर्यात हाडके
आमरसात बटाटे पर्यंत नुसतंच छान होतं, पण शिऱ्यातली हाडकं हे कहर...
30 Jul 2010 - 2:53 am | Nile
हा हा हा हा!
धमाल. अडगळपंत एकदम झ्याक झालीए शिदोरी. ह ह पु वा.
30 Jul 2010 - 3:10 am | क्रेमर
नवनवीन विषय हाताळून श्री अडगळ मराठी आंतरजालावरील विडंबनास वेगळी वाट दाखवत आहेत, असे वाटते.
30 Jul 2010 - 3:12 am | चतुरंग
एकदम जोरदार काव्य! ;)
शिव्या तरी किती घालू ,
गेली विटाळून वाणी,
तुझ्या बापानं का कधी,
दिली चहाला फोडणी ?
हे भलतंच आवडलं!! =)) =))
30 Jul 2010 - 3:13 am | धनंजय
उत्तम हास्यकविता. विडंबनाचे लोढणे नसते तर अधिकच खुलवू शकला असता.
30 Jul 2010 - 5:35 am | प्रभो
लै लै लै लै भारी!!!! ज्याम आवडली...
30 Jul 2010 - 7:14 am | स्पंदना
एकदम चमचमित!!
'तुझ्या बापानं का कधी,
दिली चहाला फोडणी ?' तर ढणटड्याण ..टड डड्याण..
30 Jul 2010 - 12:19 pm | नगरीनिरंजन
ह ह पु वा
30 Jul 2010 - 1:55 pm | मेघवेडा
=)) =))
हा हा हा..
30 Jul 2010 - 2:40 pm | दत्ता काळे
एक नंबर विडंबन.
30 Jul 2010 - 3:01 pm | बिपिन कार्यकर्ते
झकास!!!
30 Jul 2010 - 3:05 pm | भाऊ पाटील
उत्तम हास्यकविता.
(मूळ कविता वाचली नसल्यासही रसास्वादात काही फरक पडत नाही....त्यामुळे विडंबन म्हणत नाही.)
30 Jul 2010 - 4:06 pm | राघव
आरं तिच्या... कहर झालाय कि हो!
झक्कास जमलीये फोडणी!! ;)
31 Jul 2010 - 7:04 pm | क्रान्ति
शिदोरी असावी तर अशी!