विलास तो गेला, गेला, तिला भेटण्याला

केसुरंगा's picture
केसुरंगा in जे न देखे रवी...
29 Jul 2010 - 9:53 pm

राजेशशेठचे बट डोईवरी वाचले आणि आम्हाला पी‌. सावळारामांची आठवण आली त्यांची एकसे एक सुमधुर गाणी ऐकत असतानाच विलासरावांची परदेशवारी आमच्या वाचनात आली आणि आम्ही गाऊ लागलो

विलास तो गेला, गेला, तिला भेटण्याला
तिला भेटण्याला गेला, तिला भेटण्याला

वेबकॅमी लावुनि डोळा अधी त्याने कुटले टाळ
परदेशी नाही गेला कधी ही तो एक वेळ
गावा कडे धंदा त्याचा भाऊ करे प्रतिपाळ
चरणांची त्यांच्या धूळ लागली हो ब्राझीलाला

सत्य वाचा त्याची कथा वाटली का तुम्हा खोटी
फुकटचे चार टीन झोप लागे भली मोठी
बियरच जन्माची ती शेजार्‍यास उठवू किती
संपवून प्रवासास येई प्लेन जमिनीला

-केसुरंगा

क्रमशः

विडंबन

प्रतिक्रिया

रेवती's picture

29 Jul 2010 - 10:17 pm | रेवती

काव्य ठिक ठाक झाले आहे.
त्यांचा लेख क्रमश: म्हणून तुमची कविताही क्रमश: आहे का?

शिल्पा ब's picture

29 Jul 2010 - 11:21 pm | शिल्पा ब

काही खास नाही..

केशवसुमार's picture

30 Jul 2010 - 12:17 am | केशवसुमार

नेहमीसारखा तर्रीचा झटका नाय आला..
बाकी चालू दे..
(वाचक)केशवसुमार

ब्रिटिश टिंग्या's picture

30 Jul 2010 - 2:13 pm | ब्रिटिश टिंग्या

केसुगुरुजी,

स्वाक्षरीत थोडी सुधारणा सुचवु इच्छितो! न आवडल्यास आमचा आयडी उडवु नये ही विनंती!

(वाचक)केशवसुमार च्या ऐवजी (ब्राझीलीयन) केशवसुमार कसे वाटते?

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Jul 2010 - 2:27 pm | llपुण्याचे पेशवेll

टिंग्या,
(बर्मुड्यातला) केशवसुमार असे नाही का रे चालणार?