((बट डोईवरि बट झुलते तरी))

मराठमोळा's picture
मराठमोळा in जे न देखे रवी...
28 Jul 2010 - 5:20 pm

कवितांचे विडंबन होतच असते, घासकडवी गुर्जींच्या विडंबनातुन मला सुचलेली ही कविता. :)

दर्यात लाटेवरी नाव झुलते तरी
तु वल्हवित जा मर्दा, नाविका रे!!!

खवळतो दर्या तुज रोखण्यासाठी
तरी पडावी न आठी तुझ्या ललाटी
कधी हटु नको तु मागे, नाविका रे!!!

आभाळ गर्जेल, वादळ येईल
वार्‍याची ताकद आव्हान तुज देईल
पहाडापरी हो सामोरा, नाविका रे!!!

किनार्‍यावर कोळीण वाट तुझी बघते
संध्याकाली दर्याला डोले लावुन ती बसते
फेक लवकरी जाळे, नाविका रे!!!

दर्याची करणी, मिळे खजिना जाळ्याला
बांगडा, पापलेट, सुरमई उद्या बाजारला
कसा चेहरा तुझा फुलला, नाविका रे!!!

येऊ पुन्हा उद्याला, आज पुरे एवढे
दर्याचे तुजवर उपकार हे केवढे
चल परतीच्या वाटेला, नाविका रे!!

आपला,
मराठमोळा

कविता

प्रतिक्रिया

वा. छान आहे कविता. हा उलटा प्रवास खूप आवडला. म्हणजे विडंबनातून सुचलेली कविता.

प्रकाश घाटपांडे's picture

29 Jul 2010 - 10:21 am | प्रकाश घाटपांडे

वा! विडंबनातुन चांगली कविता स्फुरली

स्पंदना's picture

29 Jul 2010 - 8:56 pm | स्पंदना

सेम म्हणायच आहे. ही उलटी गंगा फारच छान जमलीय भाइ!