काही दिवसांपुर्वी सहज म्हणून घराजवळच्याच एका पार्कमधे गेलो होतो. तेव्हा काढलेले काही फोटो..
शुभ्र पांढरी कमळं...
मला सुचलेलं नाव.. हिरण्यगर्भ
मस्त भलं मोठं पान
करकोचा (सॅन्डहील क्रेन)
ह्यांची घरटी अगदी झाडाच्या टोकाच्या फांदीवर असतात..
बदकं / गीस..
आणि हंस..
बुलबुल सारखा दिसणारा हा पक्षी.. फक्त बुलबुलसारखा शेपटीखाली लाल डाग नव्हता.. त्या ऐवजी दोन्ही पंखांखाली लाल डाग होते..
इथली करवंद?? अशा लाल, काळ्या, निळ्या बेरींची झाडं खूप होती
ही कसली फुलं आहेत माहित नाही पण त्यांच्या जवळून गेलं की त्याच्या सुवासाच्या घमघमाटानं मस्त फ्रेश वाटत होतं.
इथल्या भाषेत ह्या फुलाला "निअरली वाईल्ड रोज" म्हणतात.. जवळजवळ गावठी गुलाब.. ऐकायला मजेशीर वाटतं..
आणखी थोडी रानटी/गावठी(?) फुलं
मोठं ऐट्बाज फुल.. गावठी वाटत नाही.
चतुर... (असे फोटो काढताना कॅमेराचं आणि माझं फोटोग्राफिचं ज्ञान यातला तोकडेपणा जाणवतो..)
इथे त्या फुलांच्यावर असलेल्या कोळ्याचा फोटो काढायचा होता... पण साध्या कॅमेराने काढताना झूम/फोकस गंडलं.. फोटो काढता येइना लेन्स वाकडं.. हेच खरं.
एक गमतीशीर पाटी..
अशी मस्त संध्याकाळ असावी, जवळ तुमची आवडती माणसं असावी.. मग आणखी काय हवं??
प्रतिक्रिया
24 Jul 2010 - 11:13 pm | पुष्करिणी
छानच आलेत फोटो, करकोच्यांचे विशेष आवडले.
कुठला पार्क आहे हा?
पुष्करिणी
24 Jul 2010 - 11:15 pm | रेवती
छान फोटू!
पहिले तीन आहेत ते (हिरण्यगर्भ) पांढर्या कमळांचे आहेत ना?
नंतरचे गोल पान हे कमळाचे वाटते आहे. बाकिचे फोटूही छान!
मी नुकतेच चक्क गावठी गुलाबाचे मोठे झुडुप पाहिले. वासही आपल्याकडे असणार्या गावठी गुलाबासारखाच येत होता. मला वाटते याच गुलाबाच्या पाकळ्या गुलकंद करण्यासाठी वापरतात.
रेवती
24 Jul 2010 - 11:43 pm | मराठमोळा
मस्तच आलेत फोटो.
भारतातले तर नक्कीच नाहीत. कुठले आहेत सांगितले तर छानच! :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
25 Jul 2010 - 12:16 am | मराठे
मी मिशिगन मधे (डेट्रोइट) मधे राहतो. हे फोटो, आमच्या घराजवळच्या एका पार्क (केन्सिन्ग्टन मेट्रोपार्क) मधले आहेत. फार काही प्रसिद्ध असा नाहिये हा पार्क पण बराच मोठा आहे. हे फोटो त्या पार्कमधल्या एका ट्रेल वर फिरायला गेलो असताना काढलेले आहेत. अशा बर्याच ट्रेल्स आहेत तिथे.. आणखी दोन -तीन तलाव आहेत. विशेष म्हणजे हे तलाव कृत्रिम आहेत... फार खोलही नाहीत. काही भाग फिशिंगसाठि उपलब्ध आहेत. काही ठिकाणी बोटिंगची सोय आहे. बरेच लोक स्वतःची बोट घेउन पण येतात... काही ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी बीच बनवलेले आहेत.
25 Jul 2010 - 12:25 am | दिपाली पाटिल
सगळेच फोटोज अप्रतिम आहेत...
दिपाली :)
25 Jul 2010 - 12:39 am | बिपिन कार्यकर्ते
छानच आहेत छायाचित्रं.
बिपिन कार्यकर्ते
25 Jul 2010 - 12:48 am | श्रावण मोडक
बुलबुलसदृष्य एकलकोंड्या पक्ष्याचा मनात भरला.
25 Jul 2010 - 12:59 am | डावखुरा
छानच...
आवड्या
{प्रतिक्रिया देण्याऐवजी तो वेळ आस्वादात खर्च केला}
----------------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
25 Jul 2010 - 1:32 am | मीनल
हिरण्यगर्भ सुरेख आहेत.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
25 Jul 2010 - 8:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहाहा........... काय भारी फोटो आहेत...!
-दिलीप बिरुटे
25 Jul 2010 - 12:55 pm | स्मिता चावरे
करकोचा ... अप्रतिम! फुले तर फारच छान..... आवडले फोटो..
25 Jul 2010 - 12:59 pm | यशोधरा
छान प्रकाशचित्रे!
25 Jul 2010 - 1:17 pm | jaypal
कस बागेतुन फेरफटका मारुन आल्या सारख फ्रेश वाटतय फोटो बघुन. शेवटचा फोटो बघुन तो तलाव कृत्रीम असेल अस अजिबात वाटत नाही हो. (तुम्ही ज्यांना चतुर म्हणताय त्यांना आम्ही टाचण्या म्हणतो. चतुर अजुन मोठे असतात पन बहुतेक जात कुळी/ फॅमेली एकच असवी)
"अशी मस्त संध्याकाळ असावी, जवळ तुमची आवडती माणसं असावी.. मग आणखी काय हवं??" १०१% पटल बघा :X
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/