मागच्या आठवड्यात घनगडला गेलो होतो . तिथे घेतलेली काही छायाचित्रे इथे देत आहे.
ताम्हिनी लोनावळा रस्ता -
घनगडचा एक अवघड पॅच .. एवढाच एक अवघड भाग आहे जिथे चढताना फार काळजी घ्यावी लागते ...
अजुन एक अवघड पॅच...
घनगड - पायथ्यापासुन ..
आणि हा अजुन एक फोटो पॉइंट..
घनगड - पुण्यापासुन अंदाजे - ८० किमी.
रस्ता - पुणे- मुळशी - ताम्हिणी - लोणावळा रस्ता- भाबुर्डे - घनगड.
धुके नसेल तर गडावरुन सुधागड , तैलबैला दिसतात ...
प्रतिक्रिया
21 Jul 2010 - 4:00 pm | अस्मी
मस्त :)
- अस्मिता
21 Jul 2010 - 4:06 pm | यशोधरा
पहिले २ फोटो एकदम झक्कास!
21 Jul 2010 - 4:06 pm | जागु
मस्तच.
21 Jul 2010 - 4:13 pm | गणपा
मस्त रे बंड्या
21 Jul 2010 - 4:31 pm | जे.पी.मॉर्गन
मस्त रे बंड्या ! येक नंबर!!
जे पी
21 Jul 2010 - 6:47 pm | प्रभो
जहबहरा!!!
21 Jul 2010 - 7:03 pm | धमाल मुलगा
_/\_
खल्लास! संपलो आपण!!
च्यायला...पब्लिक नुसतं पायाला भिंगरी बांधल्यासारखं हिंडायला लागलंय आणि आम्ही अजुन बसलोय घरातच. :(
21 Jul 2010 - 10:05 pm | अरुंधती
अ फ ला तू न!
तो जलबिंदुंचा मौक्तिक सर अप्रतिम!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
21 Jul 2010 - 10:54 pm | मेघवेडा
दुसरा फोटो एकदम जबर्या! मस्तच!
22 Jul 2010 - 8:43 am | प्रचेतस
हा ताम्हिनी -भांबर्डे रस्ता नितांत सुंदर आहे. सदाहरीत जंगलपट्ट्यातून जाता जाता मधेच बाहेर पडून तो अनेक जलप्रपातांचे दर्शन देत असतो. मध्ये मध्ये छोट्या छोट्या वस्त्या लागतात. पण एकदम निर्जन आणि व्हर्जिन निसर्गाची सुखद अनुभूती देणारा हा रस्ता आहे. सालटर खिंडीच्या अलीकडे, पलीकडे तर अतिशय घनदाट झाडीचा मस्त पट्टा आहे. या सबंध रस्त्याने लोहगड, विसापूर, कोरीगडाचे एका अनोख्या कोनातून दर्शन होते व मुळशी धरणाचे बॅकवॉटर संपताच पवनेचे सुरु झालेले दिसते.
22 Jul 2010 - 10:19 am | विमुक्त
पहिले २ फोटो मस्त... पुर्वी त्या अवघड पॅचवर शिडी नव्हती, येवढ्यात बसवली वाटतं...
22 Jul 2010 - 10:56 am | फ्रॅक्चर बंड्या
हो एवढ्यातच बसवली आहे ...
म्हणुनच वरती जायचे धाडस केले ...
binarybandya™
22 Jul 2010 - 10:38 am | श्रीराजे
झकास रे....!
मस्त फोटो आलेत. धम्याशी सहमत...! :)
22 Jul 2010 - 6:02 pm | शुचि
अप्रतिम फोटो !!
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
27 Jul 2010 - 12:24 pm | स्वतन्त्र
गडावर आणि गडापर्यंत कसा जायचा कळू शकेल काय ?
27 Jul 2010 - 12:27 pm | नंदन
सगळेच फोटो मस्त!
27 Jul 2010 - 12:47 pm | विजुभाऊ
घनगड. काही छायाचित्रे
हे मी " भानगड . काही छायाचित्रे " असे वाचले
पण हा धनगड ची ही भानगड एकदा जाऊन पहायलाच पाहिजे