उपास

अवलिया's picture
अवलिया in जनातलं, मनातलं
21 Jul 2010 - 2:13 pm

आज आषाढी एकादशी.. !!

विठठल विठठल जै हरी विठ्ठल...

मी फक्त साबुदाणा खिचडी, वेफर्स, केळी खाल्ली... थोडं दुध पिलो/प्यालो

तुम्ही उपासाचे काय काय पदार्थ खाल्ले ? किंवा खाणार ?

* आम्ही कालिदास असलो तरी धोरणात बसत नसल्यास धागा उडवला तरी चालेल पण जो संपादक उडवेल त्याला विठ्ठल शिक्षा करेल, धन्यवाद.

मौजमजा

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

21 Jul 2010 - 2:15 pm | ब्रिटिश टिंग्या

नानुडी!

आमोद शिंदे's picture

22 Jul 2010 - 8:07 am | आमोद शिंदे

उपासावर एखादी सांगोपांग चर्चा पाहायला मिळेल म्हणून हा धागा उघडला..सगळे फूल्टू सुटलेले दिसतात. :-)

छोटा डॉन's picture

21 Jul 2010 - 2:18 pm | छोटा डॉन

सकाळपासुन २ फ्रुट-बाउल + ३ फ्रुट ज्युस ( १ कलिंगड + २ मुसुंबी ) ...

बास, तुर्तास एवढेच, इनफॅक्ट आमच्याकडे एवढेच मिळते.
आज वटवट केली तर 'उपासाला चालते' म्हणुन इडली खाऊ घालतात.

संध्याकाळी खिचडी / थालिपीठ + बटाट्याची भाजी + दुध घेऊ असे सांगतो.

------
छोटा डॉन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Jul 2010 - 2:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

संध्याकाळी खिचडी / थालिपीठ + बटाट्याची भाजी + दुध घेऊ असे सांगतो.

घेऊ म्हणजे विकत घेऊ का सेवन करू? सेवन करणार तर विकत घेऊन सेवन करणार का स्वतः बनवून?
स्वतः बनवणार असलात डान्राव, तर कृपया रेसिपीचा धागा काढू नका. तुमच्या रेसिप्या पाहून आमच्या स्वाती ताई आणि गणपा यांना फार दु:ख होतं, हल्ली केसुगुरूजीसुद्धा स्वयंपाकघरातून धागे टाकतात, त्यांनाही अंमळ त्रास होईल.

>> आज आषाढी एकादशी.. !! <<
व्वा, आम्हाला माहितच नव्हतं!

>> मी फक्त साबुदाणा खिचडी, वेफर्स, केळी खाल्ली... थोडं दुध पिलो/प्यालो <<
मग??

>> तुम्ही उपासाचे काय काय पदार्थ खाल्ले ? किंवा खाणार ? <<
सर्कारी जेवण, सौताच्या पैशांनी!

>> आम्ही कालिदास असलो तरी धोरणात बसत नसल्यास धागा उडवला तरी चालेल <<
खुलाशाबद्दल धन्यवाद!

>> पण जो संपादक उडवेल त्याला विठ्ठल शिक्षा करेल, धन्यवाद. <<
एका संपादकांचेच नाव विठ्ठल आहे अशी बातमी कानावर आली आहे. त्यांनी धागा उडवला तर काय ते स्वतःलाच शिक्षा करणार असं तुम्हाला वाटलं काय?

अदिती

अवलिया's picture

21 Jul 2010 - 2:52 pm | अवलिया

रोचक बातमी.
विठ्ठला ... कोणता धागा लिहु आता?

--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Jul 2010 - 2:55 pm | llपुण्याचे पेशवेll

घेऊ म्हणजे विकत घेऊ का सेवन करू? सेवन करणार तर विकत घेऊन सेवन करणार का स्वतः बनवून?
स्वतः बनवणार असलात डान्राव, तर कृपया रेसिपीचा धागा काढू नका

डाण्राव सोता दूधही तय्यार करतात का ? आय मीन ते दूध उत्पादक आहेत क?
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

अवलिया's picture

21 Jul 2010 - 2:59 pm | अवलिया

बाब्बो... घरची डेअरी ! मज्जा आहे ब्वा !!

--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Jul 2010 - 3:02 pm | llपुण्याचे पेशवेll

नान्या इतके हलके प्रतिसाद देऊ नको रे.... पटकन उडून जातील. थोडं वजन लाव त्याना (प्रतिसादाना)
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

अवलिया's picture

21 Jul 2010 - 3:04 pm | अवलिया

ऑ ! काय चुकले?

--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

छोटा डॉन's picture

21 Jul 2010 - 5:36 pm | छोटा डॉन

>>घेऊ म्हणजे विकत घेऊ का सेवन करू?
(दुसर्‍याच्या पैशाने ) विकत घेऊन आणि मग त्याचे (स्वतः) सेवन करुन.
काय म्हणणे आहे ?

>>सेवन करणार तर विकत घेऊन सेवन करणार का स्वतः बनवून?
वर उत्तर दिले आहे.

>>स्वतः बनवणार असलात डान्राव,
हं, काय म्हणता ?

>>तर कृपया रेसिपीचा धागा काढू नका.
हा सल्ला देणार्‍या तुम्ही कोण ? एकादशीच्या मुहुर्तावर स्वतःला काय बबनदादा पाचपुते समजता काय ?
जोवर मिपाच्या धोरणात बसते तोवर आम्हाला धागे काढण्यापासुन कोणीच रोखु शकत नाही, वाटले तर आपण काही दिवस सन्यास घेऊन हरीनामाच्या जपात आपला वेळ घालवा

>>तुमच्या रेसिप्या पाहून आमच्या स्वाती ताई आणि गणपा यांना फार दु:ख होतं,
अरेरे, त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. :(

>>हल्ली केसुगुरूजीसुद्धा स्वयंपाकघरातून धागे टाकतात,
माझा त्यांच्याशी ह्या विषयावर काहीच संवाद झाला नाही, नुसत्या ऐकिव माहितीवर मी एकादशीच्या दिवशी विश्वास ठेऊ शकत नाही.
हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा !

>>त्यांनाही अंमळ त्रास होईल.
अरेरे, पांडुरंग आहे पाठीशी म्हणावं.

>>व्वा, आम्हाला माहितच नव्हतं!
चालायचेच, तसेही आंतरजालावर प्रत्येकालाच प्रत्येकच गोष्ट माहित असावी असा आमचा कधीच आग्रह नसतो ;)

>>सर्कारी जेवण, सौताच्या पैशांनी!
टॅक्स भरुन टॅक्स रिटर्न्स फाईल केलेत का ?

>>खुलाशाबद्दल धन्यवाद!
+१, असेच म्हणतो.
हरी धागा उडाल्याचे दु:ख सोसण्याची ताकद संबंधितांना (व्यनीतुन) देईल असा विश्वास आहे.

>>एका संपादकांचेच नाव विठ्ठल आहे अशी बातमी कानावर आली आहे.
तुमचा गैरसमज आहे एवढेच सांगतो, बाकी अन्य माहितीसाठी कुठे संपर्क साधायचा हे तुम्हाला माहित आहेच.

>>त्यांनी धागा उडवला तर काय ते स्वतःलाच शिक्षा करणार असं तुम्हाला वाटलं काय?
तुम्हाला त्याच्या कशाला चौकशा ?

------
( सात्विक संतापी ) छोटा डॉन

मिसळभोक्ता's picture

21 Jul 2010 - 10:10 pm | मिसळभोक्ता

(दुसर्‍याच्या पैशाने ) विकत घेऊन आणि मग त्याचे (स्वतः) सेवन करुन.

डॉन्रावांनी सेवन केले. आय एट.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

Nile's picture

21 Jul 2010 - 10:23 pm | Nile

आजच्या शुभमुहुर्तावर आम्ही एक कोंबडी अर्पण करावी म्हणतो. मस्त चिकन सुप वगैरे खाउन रातच्याला बिअर ढोसावी काय असा विचार करत आहे. ;)

-Nile

महेश हतोळकर's picture

22 Jul 2010 - 9:22 am | महेश हतोळकर

आम्ही एक कोंबडी अर्पण करावी म्हणतो.
ब्राह्मण तयार आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jul 2010 - 2:19 pm | परिकथेतील राजकुमार

प्रभु गुर्जी कालच म्हणत होते की नाना आजकाल फार दुध पियाला लागलाय.

असो.. लग्न ठरल्याच्या हार्दिक शुभेच्छा.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

गणपा's picture

21 Jul 2010 - 3:01 pm | गणपा

=)) =)) =)) =)) =))
हा परा एकदम हलकट आहे.
टार्‍यचा ही अन हि धर्म पुढे चालवतोय ;)
(टार्‍या मिसींग यु )

Nile's picture

21 Jul 2010 - 10:24 pm | Nile

गणपा भाउंनी पराला पण उडवा असा आतुन दिलेला संदेश आवडला नाही. निषेध करतो. ;)

-Nile

यशोधरा's picture

21 Jul 2010 - 2:20 pm | यशोधरा

मी उपवास केलेला नाही, त्यामुळे मॅगी आणि शेंगदाणे.

मराठमोळा's picture

21 Jul 2010 - 2:32 pm | मराठमोळा

>>मी उपवास केलेला नाही, त्यामुळे मॅगी आणि शेंगदाणे.
हममम.
म्हणजे यशोतैनी "फास्ट"च्या दिवशी "फास्ट फुड" खाल्ले आहे तर. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

यशोधरा's picture

21 Jul 2010 - 2:36 pm | यशोधरा

ममो, तु हुश्शारेस! :)

अवलिया's picture

21 Jul 2010 - 2:43 pm | अवलिया

>>>>मी उपवास केलेला नाही

म्हाता-या माणसांनी उपास करुच नाही.

--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

यशोधरा's picture

21 Jul 2010 - 2:50 pm | यशोधरा

तुम्ही नै करायचा ना मग, केलात की काय?

अवलिया's picture

21 Jul 2010 - 2:52 pm | अवलिया

धागा नीट वाचा.

--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

यशोधरा's picture

21 Jul 2010 - 2:57 pm | यशोधरा

तुम्ही एवढे सगळे खाल्ले हे समजले (खादाडखाऊ दिसता! असो. :D)
पण उप् + वास ह्या बद्दल काही लिहिलेले दिसले तरी नाही! कुठे पहायचे? :P

अवलिया's picture

21 Jul 2010 - 2:59 pm | अवलिया

अता तुमचा प्रश्न बघा... उत्तर मिळाले का ? मिळावे.

--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

यशोधरा's picture

21 Jul 2010 - 3:03 pm | यशोधरा

माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला समजेलसे प्रवचन करा नानाजीमहाराजजी! :)

अवलिया's picture

21 Jul 2010 - 3:05 pm | अवलिया

मी प्रवचन करत आहे असा आपला ग्रह कसा काय झाला?

--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jul 2010 - 3:11 pm | परिकथेतील राजकुमार

स्वतःच्या धाग्याचा केलेला खरडफळा बघुन आम्हाला आमच्या एका सुहॄदाची सय आली.

आणि हो लवकरच आपल्या ह्या कार्याबद्दल आपणास अनावृत्त पत्र लिहिण्याचा मानस आहे.

असो बदलणार नाही.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

यशोधरा's picture

21 Jul 2010 - 3:11 pm | यशोधरा

साध्या शब्दांत उत्तरे ने देता आपण प्रश्नांची प्रश्नात्मक उत्तरे देत आहात, त्यावरुन.

गणपा's picture

21 Jul 2010 - 3:13 pm | गणपा

इतरांच्या प्रतिसादांना नान्याने प्रति-प्रश्नांनी दिलेली उत्तर पाहुन वपुंच्या (भाडण फेम)जोशींची आठवण झाली.
=)) =)) =)) =))

निशिगंध's picture

21 Jul 2010 - 5:51 pm | निशिगंध

असेच म्हणतो...
"तुमचा काय अंदाज आहे"

____ नि शि गं ध ____

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Jul 2010 - 2:59 pm | llपुण्याचे पेशवेll

तुझे आहे तुझपाशी परी तू धागा चुकलासी.
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

जागु's picture

21 Jul 2010 - 2:21 pm | जागु

जो संपादक उडवेल त्याला विठ्ठल शिक्षा करेल, :$
ब्लॅकमिलिंग.
अळकुड्या आणि बटाटा भाजी.

विजुभाऊ's picture

21 Jul 2010 - 3:05 pm | विजुभाऊ

ब्लॅकमिलिंग.

हा कोणता पदार्थ आहे? कृ. खुलासा करवा

चालून चालून ३.१४१५९२६५३५८९७९३२३८४६२६४३३८३२७९५०२८८४१९७१६९३९९३७५१० दुखतात

संजा's picture

21 Jul 2010 - 3:06 pm | संजा

उपास म्हणजे काय ? तो का करतात ?
आषाढी एकादशीला केलेला उपास व ईतर दिवशी केलेला उपास यात फरक काय?
ऊपास कोणी करावा ? कोणी करु नये ?

संजा

अवलिया's picture

21 Jul 2010 - 3:08 pm | अवलिया

हे प्रश्न बच्चु गुरुजींना विचारा.
व्हेरी एक्स्पर्ट .. यु नो.. !

--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

संजा's picture

21 Jul 2010 - 3:15 pm | संजा

वैयक्तीक विचारायचे असते तर खव मध्ये लीहले असते.
ईथे चर्चा झाली तर बरे होईल
संजा

अवलिया's picture

21 Jul 2010 - 3:26 pm | अवलिया

>>>उपास म्हणजे काय ? तो का करतात ?
उपास ह्या शब्दाचा अर्थ बज्जु गुरुजींनी सांगितला आहे

>>>आषाढी एकादशीला केलेला उपास व ईतर दिवशी केलेला उपास यात फरक काय?
आषाढी एकादशीला आषाढी एकादशी असते आणि इतर दिवशी आषाढी एकादशी नसते हा अतिशय महत्वाचा फरक आहे

>>>ऊपास कोणी करावा ? कोणी करु नये ?
ज्याला करावासा वाटतो त्याने करावा
ज्याला करावासा वाटत नाही त्याने करु नये

--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

संजा's picture

21 Jul 2010 - 3:38 pm | संजा

प्रश्न विचारण्याचा उद्देश माहीती मिळवणे हा होता. आपल्यासारख्या जुन्या सदस्याने दिलेली हीणकस ऊत्तरे पाहुन मन व्यथित झाले.
असो.

संजा

अवलिया's picture

21 Jul 2010 - 4:49 pm | अवलिया

आपल्या अपेक्षा पूर्ण करु शकलो नाही याबद्दल खेद आहे.

--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

संजा's picture

21 Jul 2010 - 6:35 pm | संजा

>>>>आपल्या अपेक्षा पूर्ण करु शकलो नाही याबद्दल खेद आहे

नंतर खेद करणे (असल्याचे दाखवणे) हे 'दुसर्‍याच कार्ट' असण्याचच लक्षण नव्हे काय ?
संजा

अवलिया's picture

21 Jul 2010 - 6:37 pm | अवलिया

नाही. हे आपला तो बाब्याच असल्याचे लक्षण आहे. :)

अवांतर खरडीतुन बोलु या का? नाहक अख्खा धागाच धारातीर्थी पडायचा

--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

संजा's picture

21 Jul 2010 - 6:46 pm | संजा

>>>नाही. हे आपला तो बाब्याच असल्याचे लक्षण आहे.

ज्याची त्याची समज, जाण ई.ई.
असो. बेसिक मध्येच फरक असल्याने विषय संपला.
संजा

अवलिया's picture

21 Jul 2010 - 6:48 pm | अवलिया

येवढी नका मनावर घेवु.. चालायचच. असो.

--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

Dhananjay Borgaonkar's picture

21 Jul 2010 - 3:14 pm | Dhananjay Borgaonkar

आमचा नेहमी प्रमाणे लंगडा उपास.
सकाळी गरम गरम साबुदाणा वडे.
दुपारी सिमला मिर्चीची भाजी, पोळी
आणि रात्री उपासाच्या भाजणीच थालपीट खाणार :D

---------------
धनंजय बोरगांवकर

स्वछंदी-पाखरु's picture

21 Jul 2010 - 3:28 pm | स्वछंदी-पाखरु

सकाळ पासुन पाऊण लीटर स्ट्रॉबेरी मिल्क, तीन राजगिर्‍याचे लाडू, एक फ्रुट चाट, साबुदाणा खिचडी, बटाट्याचा शिरा व येवढे करुन पण जरा अशक्त पणा वाटला म्हणून आता लाल बैल पीत आहे.....

आज का डोळ्यात माझ्या, पाणी पुन्हा दाटले
होते...
कासाविस या व्याकुळ आत्म्यात, आभाळ भरून साठले होते...

पण... पंख पिंजर्यातच अडकलेले होते..........

नावातकायआहे's picture

21 Jul 2010 - 3:30 pm | नावातकायआहे

आज्च्या उपासाला फकसत ताडि आनि चकन्याला बटाटा चिवडा...

विजुभाऊ's picture

21 Jul 2010 - 3:37 pm | विजुभाऊ

आषाढी एकादशीला आषाढी एकादशी असते आणि इतर दिवशी आषाढी एकादशी नसते हा अतिशय महत्वाचा फरक आहे

वावावा.... आज ज्ञानात महत्वाची भर पडली.
सेक्सपियर उपास का करायचा नाही ते आज कळाले. तो म्हणायचा नावात्काय आहे. आषाढी एकादशी ला अमावस्या म्हणाले म्हणून काही फरक पडत नाही

Dhananjay Borgaonkar's picture

21 Jul 2010 - 3:55 pm | Dhananjay Borgaonkar

विजुभाऊ..सेक्स्पिपियर नव्हे..शेक्सपियर :P

---------------
धनंजय बोरगांवकर

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Jul 2010 - 3:56 pm | llपुण्याचे पेशवेll
  1. हा हा हा =))

पुण्याचे पेशवे
येथे प्रतिसादांना पंख लावून मिळतील

धमाल मुलगा's picture

21 Jul 2010 - 4:23 pm | धमाल मुलगा

सक्काळच्या पारी गिल्लासभर दुध आणि खजुर शेवन करुन दुपारच्याला येक सफरचंद खाऊन आमी इट्टलाच्या नामस्मरनात गुंग हौत!

बाकी, इठुरायाच्या आषाढीनिमित्यानं गटारी करु बघनार्‍यांला इठुमाऊली चार-चार आने अक्कल द्येवो आशी आमी प्रार्थना करतु.

- (इठोबाचा वारकरी, शिवबाचा धारकरी) ध.

लय भारी हे भो....

अवलिया's picture

21 Jul 2010 - 4:42 pm | अवलिया

आमीबी प्रार्थना करतो...

--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

सन्दीप's picture

21 Jul 2010 - 4:33 pm | सन्दीप

एकादशी आणि दूप्पट खाशी.

सन्दीप

दुपारी पुर्ण जेवण घेतले. जेवण करताना आयबीएन लोकमत वरचा भजन आणि अभंगाचा कार्यक्रम पाहिला.आता संध्याकाळी नामस्मरण करत जेवायचे.
वर लोकाचे खाण्या पिण्याचे आज किती वांदे होतात हे वाचुन डोळे पाणावले.

वेताळ

निशिगंध's picture

21 Jul 2010 - 5:57 pm | निशिगंध

आमच्या मेसकाकुनी चुकुन दोन डबे दिले एक हापिसात अन एक घरी...

त्यामुळे
"एकादशी अन दुप्पट खाशी" आम्ही खरे करुन दावणार

____ नि शि गं ध ____

दिनेश's picture

21 Jul 2010 - 6:03 pm | दिनेश

अधिक...

+ सर्वात शेवटी...

रात्रीचा फराळ उद्या कळवण्यात येइल... गैरसमज नको...

स्वछंदी-पाखरु's picture

21 Jul 2010 - 6:17 pm | स्वछंदी-पाखरु

माझा उपास मोडलास की रे ......!!!!!!!!!!!!!!!!

चतुरंग's picture

21 Jul 2010 - 6:22 pm | चतुरंग

इट्टलाऽऽऽऽकोणती डीश घेउ हाती? :T

तिरामिसुरंग

दिनेश's picture

21 Jul 2010 - 6:40 pm | दिनेश

हवी ती घ्या...तिकडे आषाढी असते का हो ? माझ्या माहीतीवरुन फक्त भारतातच असते...शंका आली म्हणून तुम्हाला विचारतो...

अदितीबै दुर्बीटणें ना पण विचारुन पाहवे म्हणतो...

दिनेश

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Jul 2010 - 10:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =))

रंगराव, राकलेट घ्या हातात ...! पिझ्झा आणि तिरामिसु जातील कुठल्याकुठे ... शिवाय फ्राफुला रहाण्या, खाण्याची आणि वेगवेगळ्या स्वादांच्या कॉफ्यांचीही चांगली सोय आहे! ;-)

अदिती

अवांतरः कृपया भारताबाहेर आषाढी असते का असले ढ प्रश्न मला विचारू नयेत. अधिक माहितीसाठी संपादक मंडळास व्यनी करावा!

खरतर उपवासाला पिझ्झा खाता आला असता तर उपवास करायला मज्जा आली असती.
माझे एक स्नेही शाबुदाण्याच्या फॅक्टरीतुन आल्यापासुन उपवासाला शाबुदाणा खायचे विसरुनच गेले.कारण विचारले असते ते म्हणाले शाबुदाणा बनवायची फॅक्टरी बघितली तर तुम्ही उपवास करणेच सोडुन द्याल. :D
वेताळ

रेवती's picture

21 Jul 2010 - 9:03 pm | रेवती

हो, मीही ऐकले आहे त्याबद्दल. बैलाची चरबी कि काहीतरी वापरतात म्हणे......! जास्त जाणून घ्यायला आवडणार नाही कारण आवडती साबूदाण्याची खिचडी खाणे बंद करावे लागेल! ;)

रेवती

विनायक प्रभू's picture

21 Jul 2010 - 10:18 pm | विनायक प्रभू

झालेला उपास एका दशीला सोडला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jul 2010 - 7:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुपारपर्यंत कडक एकादशी होती. दुपारनंतर दौलताबाद किल्ल्यावर गेलो. मित्राचा वाढदिवस होता. धाब्यावर एक चिकन कंटकी, दाल तडका, मलाईकोप्ता, काजू करी, पनीर टिक्का आणि तंदूर रोटी आणि समारोपाला आईसक्रिम.

उपवास मोडला. हे विठ्ठला क्षमा कर...!

-दिलीप बिरुटे

अर्धवट's picture

22 Jul 2010 - 8:48 am | अर्धवट

हे विठ्ठला.. हे काय खाताहेत यांना कळत नाही यांना क्षमा कर..

=)) =)) =)) =))

तिमा's picture

22 Jul 2010 - 7:54 pm | तिमा

खाल्लं तेच नेहेमीचं.
पण आमची एक अशी इच्छा आहे की साबुदाण्याच्या खिचडीत थोडे प्रॉन्स् घातले तर कित्ती छान लागतील?
रताळ्याच्या किसात थोडे बीफ घातले तर मजा येईल का ?
साबुदाणावडे करताना थोडी अंडी मिसळली तर वेगळीच लज्जत येईल.
वर्‍याच्या तांदुळाबरोबर दाण्याची आमटी कशाला, फिश करी कित्ती छान लागेल!
पण असे पदार्थ करायला आमचे कुटुंब तयार नाही.
तिरशिंगराव रुढीतोडणे

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|