एका स्थळात लिहिली, जी धोरणे अनेक

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
15 Jul 2010 - 10:49 pm

केसुरंगाशेठांचे विडंबन झळकले तेव्हा आम्ही चौपाटीवर भेळ खाण्यास गेलो होतो.. तिथे काही जालकंटकांची एक टोळि ही आली होती.. त्याच्या म्होरक्या मोठमोठ्याने जे काही बडबड होता, ते तुमच्या कानावर घालावे असे वाटले म्हणून हा धागाप्रपंच..

एका स्थळात लिहिली, जी धोरणे अनेक
शंका विचारणारे , नतद्रष्ट आम्ही लोक

आधी विचारलेले, अपुल्या मतास सांगा
चर्चेस लोक तुम्ही म्हणता कशास दंगा?
अन पाहुनि अम्हाला, चेकाळती अनेक
शंका विचारणारे , नतद्रष्ट आम्ही लोक

पाध्यास खाज भारी, नडतो सदा अम्हासी
पंचास काय बोलू, बोलू अता कुणाशी ?
चौपाटीच्या वरी हा , दावी उगाच धाक
शंका विचारणारे , नतद्रष्ट आम्ही लोक

पंचास काय ऐसे एके दिनी कळाले ?
शंका विचारणारे, फटक्यामधे उडाले !!
प्रतिसाद आणि धागे त्या चौकशा अनेक
होते खरे तरी ते टिकले इथे क्षणैक

-केशवसुमार

विडंबन

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

16 Jul 2010 - 12:24 am | राजेश घासकडवी

संपादकच दोन्ही बाजूंनी लिहायला लागले (आणि त्यांनी विडंबन, पाककृती याही काबीज केल्या) तर सामान्य जालकंटकाने जावे कुठे म्हणतो मी...

बाकी विविडंबन छान.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Jul 2010 - 12:31 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

एग्ग-जॅक्टली ... आमच्यासारख्यांनी करायचं काय? आणि रंगराव, तुम्ही कुरूप वेडे कधीपासून? तो मान आम्हां जालकंटकांचा!!

विडंबन एकदम केशवसुमार-स्टाईल! झ्याक!!

अदिती

Nile's picture

16 Jul 2010 - 12:36 am | Nile

हेच म्हणतो. बाकी दोन्ही बाजुने काड्या टाकायची कल्पना भारी की नाही? इथुन नाहीतर तिथुन पेटेल. मग पाध्यांची खाज पण भागेल का?

बाकी विविडंबन ठीक.

-Nile

केशवसुमार's picture

16 Jul 2010 - 12:48 am | केशवसुमार

मी नव्हेच म्हणायचा पण कंटाळा आलाय..
बाकी तुमचा गैरसमज... चालू देत..
(तोमीन)केशवसुमार
बाकी विविडंबन छान..
धधन्यवाद!
(आभारी)केशवसुमार

चतुरंग's picture

16 Jul 2010 - 12:25 am | चतुरंग

काल काथ्याकूट, आज विडंबनांचा पाऊस!!

केसुशेठ, तुमच्या विडंबनावर पाध्यांची टाच येईल हां सावध रहा! ;)
बाकी विडंबन लै भारी!!

(कुरूप वेडा)चतुरंग

श्रावण मोडक's picture

16 Jul 2010 - 12:53 am | श्रावण मोडक

बर्र...!

केसुरंगा's picture

16 Jul 2010 - 12:55 am | केसुरंगा

आमचीच कविता घेतली आणि तरिही आमच्याच विरुद्ध फस्क्लास विडंबन, तेही आमच्याच पाठोपाठ?
ये ब्बात!! =D>

प्रियाली's picture

16 Jul 2010 - 12:57 am | प्रियाली

:-)

क्रेमर's picture

16 Jul 2010 - 1:15 am | क्रेमर

चैपाटीच्या वरी हा , दावी उगाच धाक

चै चा चौ करा.

_________________
बाकी चालू द्या.