मी न माझा………
गुंतलो इतुका ईश्कांत तुझिया
राहिलो अता मी माझाच नाही.
आभासत नाही ज्या गंधात तू,
तो गंध मज मोहीत नाही.
जी वाट जात नाही तुज घरां,
वाटेवरून त्या मी जात नाही.
ज्या फुलांत ना कोमलता तुजसम,
ती फुले मी वेचीत नाही.
हृदय वेदना ज्यां नं जाणवती तुला,
वेदनाचे अशा मज दुखः नाही.
भेटली आताच पाहिले डोळे भरुनी,
विरहाचे आता मला दुखः नाही.
सामावली श्वासांत, रंध्रा रंध्रात तू,
अस्तित्व मजला तुजवीण नाही
निरंजन वहाळेकर