नाव सुचत नाही.

स्पंदना's picture
स्पंदना in जे न देखे रवी...
15 Jul 2010 - 8:57 am

पसरुनी दो बाहु, फांद्यावरी,
अविरत वणवा साहिला,
शहारा पाठी सारीत; गात्री,
संतंत धार वर्षा झेलला ।

नजर न वळली कधी तुजवरुन,
कधी न श्वास तुजविण फुलला,
का न कळे या मनास माझ्या;
ध्यास तुझा असा जडला ।

फुलवेल मी...

फुलवेल मी; फूलणे न फुलणे,
माझ्या हाती नसे,
जरी मनास न भावले;
तरी मातीशी ईमान असे ।

उपटुनी जरी परत रोवीली
रुजणे माझा धर्म.
धन्यास परतुन ; ओंजळी भरुन,
स्वतःस लुटणे, हे कर्म!!

अपर्णाअक्षय.

कविता

प्रतिक्रिया

मनीषा's picture

15 Jul 2010 - 10:05 am | मनीषा

फुलवेल मी; फूलणे न फुलणे,
माझ्या हाती नसे,
जरी मनास न भावले;
तरी मातीशी ईमान असे

वा !!! सुरेख

निरन्जन वहालेकर's picture

15 Jul 2010 - 12:22 pm | निरन्जन वहालेकर

नाव काहिही असू देत. सुरेख कल्पना ! कविता आवडली !

आंबोळी's picture

15 Jul 2010 - 12:29 pm | आंबोळी

कविता आवडली... कल्पना छान आहे....
लवकरच विडंबने यायला हरकत नाही....

पहिल्या फटक्यात सुचलेल्या ओळी:

दाखऊनी तो फोटु*, फाट्यावरी,
अविरत मारत राहिला,

* : चपलांचा फोटो.

आंबोळी

जागु's picture

15 Jul 2010 - 12:35 pm | जागु

छान. आवडली.

पक्या's picture

15 Jul 2010 - 1:03 pm | पक्या

>>नाव सुचत नाही.
'कर्म' हे नाव मला योग्य वाटत आहे.

बाकी, कविता छानच.

जय महाराष्ट्र , जय मराठी !

स्पंदना's picture

15 Jul 2010 - 2:16 pm | स्पंदना

'कर्म'
नाही हो. हे शिर्षक मला ही सुचल होत, पण जो भाव कवितेते आहे तो दाखवणारा एक ही शब्द निदान मला तरी नाही सुचला.

मनिषा, जागु, निरन्जन, आणी शिर्षक सुचवल्या बद्दल पक्या तुम्हा सर्वांचे आभार!

आम्बोळी दोन ओळी छानच !

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते