शून्य
शून्य गाव शून्य वस्ती
शून्य झाडे शून्य घरटी
शून्य खिडक्या शून्य दारे
शून्य भिंती शून्य वारे
शून्य दिवा शून्य वाती
शून्य पणती शून्य ज्योती
शून्य शब्द शून्य अर्थ
शून्य ओळी शून्य पानी
शून्य डोळे शून्य आसू
शून्य गाली शून्य हासू
शून्य अधिक शून्य वजा
शून्य हाती शून्य बाकी
शून्य जगतो शून्य आम्ही
शून्य सारे शून्य मीही
सुरेश नायर
http://sites.google.com/site/surmalhar/
प्रतिक्रिया
15 Jul 2010 - 7:30 am | Manoj Katwe
शून्य भारत, शून्य महासत्ता
शून्य जनता, शून्य राजकारणी
शून्य कायदे, शून्य कर्ते
शून्य घोडेबाजार, शून्य लोकशाही
शून्य महागाई, शून्य समृद्धी
जिकडे तिकडे चोहीकडे शून्य शून्य शून्य शून्य
आकाशात, पाताळात शून्य शून्य शून्य शून्य
धरतीवर, समुद्रात शून्य शून्य शून्य शून्य
आत, बाहेर शून्य शून्य शून्य शून्य
शहाणे, वेडे शून्य शून्य शून्य शून्य
मी शून्य शून्य शून्य शून्य
तुम्ही सगळे शून्य शून्य शून्य शून्य
(कृ. हलके घेणे )
सर्वांत लहान शून्य शून्य शून्य शून्य
अनंतालाही लाजवेल शून्य शून्य शून्य शून्य
शून्य + शून्य = शून्य
शून्य - शून्य = शून्य
शून्य X शून्य = शून्य
शून्य / शून्य = शून्य
शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य
शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य
शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य
शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य शून्य
हा प्रतिसाद लिहिताना माझ्या मनात आलेले विचार शून्य शून्य शून्य शून्य
ह्यावर तुम्ही मला जे फेकून माराल ते पण शून्य शून्य शून्य शून्य
.........................
हि कविता काय संपणारच नाय असे दिसते राव
मी लिहिलेल्या ह्या कवितेत एक फार मोठी गंभीर चूक आहे, ती ओळखा पाहू
ओळखणार्यास मोठे शून्य बक्षीस
---------------------------------------------
अवांतर : मला एकदा शून्य भेटला होता, एकदम हताश दिसत होता तो,
मी विचारले काय झाले म्हणून,
त्याने सांगितले कि त्याचा जन्म इथलाच, भारतातला (आता महाराष्ट्र का कर्नाटक कि बिहार, ते विचारू नका )
त्याला जरा जग हिंडून यायचे आहे .
मी म्हणालो, जा कि मग , बघू ये जरा बाहेरचे जग,
यावर तो म्हणाला कि त्याला इथल्या राजकारण्यांच्या संवेदनशील मनाने इतके जखडून ठेवले आहे कि पुढील अनंत काळापर्यंत शून्यचा आणि राजकारण्यांच्या संवेदनशील मनाचा संबंध कधी तुटणार नाही असे दिसत आहे.
मी आपली गाडीला किक मारली आणि त्याला कधीतरी थोडे स्वातंत्र्य मिळावे असा विचार करून निघालो
15 Jul 2010 - 7:37 am | शरद
नेति नेति
"ब्रह्मा" च्या संदर्भात पूर्वासुरींनी न इति, न इति असे हताशपणे म्हटले आहे. कारण कोणतेही विशेषण त्याला लावता येत नाही. ते आदिही नाही, त्याला अंतही नाही, इत्यदि. या कवितेत कवीला आजूबाजूला दिसणारे सर्वच शून्यवत वाटत आहे.आजूबाजूलाच कशाला, स्वत:कडे बघतांनाही हीच भावना प्रबळ झालेली आहे. ईशावास्योपनिषदांमधील "पूर्णमद: पूर्णमिदं .. " ची छायाही दिसून येते. "शून्यवाद" हे दर्शन आपण
विचारात नाही घेतले तरी चालेल. कारण त्याचा अभ्यास हल्ली होत नाही. असो. या व अशा कवितांबाबत दोन गोष्टी विचारात घ्यावयास पाहिजेत.
पहिली म्हणजे जीवन खरेच इतके शून्यवत आहे का ? चित्विलासवाद म्हणतो "नाही". पण ज्ञानेश्वरच कशाला, आजचे बोरकर, पाडगांवकर यांनाही जीवनात आनंद दिसून येतोच की ! अर्धा कप रिकामा हे खरेच, पण अर्धा भरलेला आहे त्याकडेही बघता येतेच की. अर्थात कवीने काय बघावे हे आपण कोण सांगणार ?
दुसरी गोष्ट म्हणजे ह्या प्रकारच्या कविता ह्या वाण्याच्या याद्या होवू शकतात. कोणतेही नाम घ्या, त्याला तेच विशेषण जोडा. या चक्रात आरती प्रभूंसारखे कवीही अडकलेले दिसते. कोठे थांबावयाचे याचे भान राखणेही महत्वाचे. इथे कवीने कविता लांबविली नाही हे योग्यच. स्वताला
अंतर्मुख करावयास लावणारी एक छान कविता.
शरद
15 Jul 2010 - 11:43 pm | sur_nair
सविस्तर व उत्तम प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. फक्त एक सांगावेसे वाटते कि एखाद्या कवितेतून वा इतर कालाविष्कारातून कवी /कलाकाराबद्दल तर्क लावणे योग्य नव्हे. "कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कोण मेले कुणासाठी रक्त ओकून", आणि "समयीच्या शुभ्र कळ्या"/ "नाही कशी म्हणू तुला" लिहिणारे आरती प्रभू काय किंवा इतर कवी/ कलाकार असो , ही सर्व एक मनाची अवस्था असते. संत ज्ञानेश्वर यांनी लिहिले आहे " दीपकी दीपक लावियल्या ज्योती, घरभरी वाती शून्य झाल्या ".
ह्या कवितेचा संदर्भाच द्यायचा तर माझ्या मनात कुठेतरी "One Flew Over The Cuckoo's Nest" हा चित्रपट होता.
15 Jul 2010 - 9:59 pm | १.५ शहाणा
शून्य / शून्य = शून्य
हिच मोठि चुक आहे
15 Jul 2010 - 10:01 pm | १.५ शहाणा
मि बराबर वळ्खिले
द्या मला शुन्य
15 Jul 2010 - 11:44 pm | चतुरंग
(पूज्य)चतुरंग