बुद्धीबळाचे नियम (मराठीत) ...

बद्दु's picture
बद्दु in जनातलं, मनातलं
14 Jul 2010 - 5:54 pm

बुद्धीबळाचे नियम (मराठीत) ...आहे का कोणाकडे?

क्रुपया लिन्क द्या..आम्च्या मन्डळाच्या बुद्धीबळ स्पर्धेसाठी हवे आहेत..

धन्यवाद.

क्रीडामाहिती

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

14 Jul 2010 - 6:11 pm | यशोधरा

चतुरंग, तुम्ही लिहा बरं एक लेख ह्या नियमांवर.

शनआत्तार's picture

14 Jul 2010 - 7:02 pm | शनआत्तार

:''(

ह्यांनी बनवलेली नियमावली इथे बघता येईल -
http://www.fide.com/component/handbook/?id=124&view=article
बरीच मोठी असल्याने ह्याचे भाषांतर करण्याइतका वेळ माझ्यापाशी नाही. सोबर आकृत्या दिल्याने नियमावली समजायला तशी सोपी आहे. तुम्हालाही भाषांतरित करुन घेता यावी.
तुमच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा! :)

चतुरंग

चतुरंग's picture

14 Jul 2010 - 8:14 pm | चतुरंग

ह्या धाग्यावरुन एक कल्पना सुचली आहे.

मराठीत बुद्धीबळाचे नियम मला आंतरजालावर मिळाले नाहीत. एकट्याने भाषांतर करणे वेळखाऊ आहे. परंतु मिसळपावावरील बुद्धीबळप्रेमींनी त्यांचा थोडा थोडा वेळ देऊ केला तर हा भाषांतराचा उपक्रम आपण मिळून करु शकू.

वरती फिडेच्या नियमावलीचा जो दुवा मी दिला आहे तिथे जाऊन जर त्यातला एकेक मुद्दा (किंवा उपलब्ध वेळानुसार अधिक मुद्दे) भाषांतरित करायचे ठरवले तर आठदहा मिपाकरांना हे सहज शक्य व्हावे.
ज्यांना ह्यात सहभागी व्हायची इच्छा आहे त्यांनी ह्या धाग्यावरती ते कोणते मुद्दे भाषांतरासाठी घेऊ शकतात ह्याचे क्रमांक द्यावेत म्हणजे पुढच्या लोकांना त्यांनी कोणते मुद्दे घ्यावेत हे समजायला सोयीचे जाईल.

सगळे भाषांतरित नियम माझ्याकडे व्यक्तिगत निरोपाने ३१ जुलै पर्यंत पाठवावेत. नियमातले तांत्रिक शब्द तसेच ठेवले तरी चालतील. त्यावर मी संस्करण करेन.

मी स्वतः सगळे संकलन करुन एक पुस्तिकाच पीडीएफ प्रकारात मिसळपावावर प्रसिद्ध करायची जबाबदारी घेतो.

चतुरंग

बद्दु's picture

15 Jul 2010 - 10:21 am | बद्दु

धन्यवाद

श्रावण मोडक's picture

14 Jul 2010 - 8:29 pm | श्रावण मोडक

प्रास्ताविक/प्रस्तावना
बुद्धीबळाच्या या नियमांमध्ये / विधींमध्ये एखाद्या सामन्यात निर्माण होणारी प्रत्येक संभाव्य परिस्थितीवरचा तोडगा निघेलच असे नाही तसेच सर्वच्या सर्व प्रशासकीय मुद्यांचाही त्यातून निवाडा होईल असेही नाही. एखाद्या परिस्थितीचे पूर्वानुभावनुसार नियमन होत नसल्यास या नियमावलीमध्ये / विधींमध्ये तिच्याशी साधर्म्य असणाऱ्या ज्या परिस्थितीचा विमर्ष झालेला आहे तिचा अभ्यास करून उचित निर्णय घेता येऊ शकतो. निवाडा करणाऱ्या पंचांमध्ये आवश्यक सक्षमता, विवेकी निर्णयक्षमता आणि निखळ निरपेक्षता असेल हे या नियमावलीसाठी / विधींसाठी गृहीत धरण्यात आले आहे. एखादा नियम अवास्तव तपशीलवार असेल तर त्यामुळे निवाडा करणाऱ्या पंचाच्या निर्णयस्वातंत्र्याचाच संकोच होऊ शकतो आणि त्यामुळे न्याय्यबुद्धी, तर्ककठोरता आणि विशेष घटकांच्या आधारे एखाद्या प्रश्नावर तोडगा काढण्यास प्रतिबंध होऊ शकतो.
या दृष्टिकोणाचा (की दृष्टिकोनाचा?) सर्व खेळाडू आणि महासंघानी स्वीकार करावा, असे फिडे आवाहन करीत आहे.
एखादा सदस्य महासंघ अधिक तपशीलवार नियम / विधी लागू करू शकतो, जर ते नियम / विधी :
१. अधिकृत फिडे लॉज ऑफ चेसमधील तरतुदींना बाधा आणत नसतील / तरतुदींच्या विरोधात जात नसतील,
२. त्या-त्या संबंधित महासंघाच्या प्रदेशापुरते मर्यादित असतील, आणि
३. फिडेच्या कोणत्याही सामना, अजिंक्यपद स्पर्धा किंवा पात्रता स्पर्धा, किंवा फिडेचा कोणताही किताब किंवा मानांकन स्पर्धा यासाठी लागू नसतील.

हे इथं एवढंच देतो. बाकी पुढच्या खेळाडूंनी जबाबदारी घ्यावी.
(किती भारी प्रस्तावना आहे ही. कुठंही, अगदी इथंही, लागू होऊ शकते.)

चतुरंग's picture

14 Jul 2010 - 8:36 pm | चतुरंग

तातडीच्या कृतीसाठी श्रामोंचे अभिनंदन! :)

इथे प्रतिसाद येतील की नाही ह्या शंकेतून मी एक स्वतंत्र धागा सुरु केला आहे पुढचे प्रतिसाद तिथे दिले तरी चालेल.

चतुरंग