सद्गुरू माउली

सागरलहरी's picture
सागरलहरी in जे न देखे रवी...
11 Jul 2010 - 1:57 pm

अजपाचे संगती | एकारली वृत्ती |
ठाके सीता-पती | सन्निधानी ||

स्व-स्थ राहोनी | राम नाम ध्यानी |
लाभे पुण्य खाणी | आत्म वृत्ती ||

आत्मवृत्तीची कळा | प्रेमे पाही सकळा |
दिसे सर्वत्र सावळा | चरा- चरी ||

नाम जप गोडी | जरी लाभे थोडी |
साधने तोकडी | बाकी होती ||

याजन याजन | दान तीर्थाटन |
सद्गुरुवाचोन | शून्य होय ||

सद्गुरू माउली | देई नाम साउली |
तेणे लोभावली | जिव्हा माझी ||
सागर लहरी - ११.७.२०१०

कविता

प्रतिक्रिया

राघव's picture

12 Jul 2010 - 1:55 pm | राघव

रचना आवडली. चांगली आहे. थोडी भाषा आणिक सोपी केली तर गोडी वाढेल! :)

काही सांगावेसे वाटले -

अजपाचे संगती | एकारली वृत्ती |
ठाके सीता-पती | सन्निधानी ||

अजपाजप हा आपोआप व्हायचा असतो. करायचा नसतो.
त्यामुळे अजपाच्या संगती असे म्हणणे योग्य होणार नाही असे वाटते. चुभुद्याघ्या.

स्व-स्थ राहोनी | राम नाम ध्यानी |
लाभे पुण्य खाणी | आत्म वृत्ती ||

"स्व-स्थ" शब्दाचा छान वापर. विशेष आवडला. :)

आत्मवृत्तीची कळा | प्रेमे पाही सकळा |
दिसे सर्वत्र सावळा | चरा- चरी ||

"आत्मवृत्तीची कळा" हा शब्दप्रयोग नाही समजला.

नाम जप गोडी | जरी लाभे थोडी |
साधने तोकडी | बाकी होती ||

बाकीची साधने "तोकडी" होत नाहीत. त्यांच्याकडे मन लागत नाही कारण ते नामजपाकडे लागलेले आहे अशी ती अवस्था आहे. शब्दप्रयोग चुकलासा वाटतो. चुभुद्याघ्या.

याजन याजन | दान तीर्थाटन |
सद्गुरुवाचोन | शून्य होय ||

खूप सुंदर ओवी. अतिशय आवडली.

एक रचना माझ्याकडूनही तयार झालेली आहे - आवाहन. कदाचित तुम्हालाही आवडेल! :)

राघव

मी ऋचा's picture

12 Jul 2010 - 3:05 pm | मी ऋचा

सागरलहरी आणि राघव दोघांच्याही रचना अप्रतिम !! =D> =D>

मी ॠचा

र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

स्पंदना's picture

12 Jul 2010 - 7:22 pm | स्पंदना

__/\__

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

विसोबा खेचर's picture

12 Jul 2010 - 10:18 pm | विसोबा खेचर

वा !

सागरलहरी's picture

12 Jul 2010 - 10:22 pm | सागरलहरी

आपण लक्षपूर्वक कविता वाचून केलेल्या कौतुका साठी आणि सूचनांसाठी मनापासून धन्यवाद .. फक्त मला लिहिताना काय अभिप्रेत होते ते मांडतो.. कदाचित तुम्ही म्हणता तसे शब्दांकन होताना चुकले असेलही..

>>अजपाचे संगती | एकारली वृत्ती |
>> ठाके सीता-पती | सन्निधानी ||

>>अजपाजप हा आपोआप व्हायचा असतो. करायचा नसतो.
>>त्यामुळे अजपाच्या संगती असे म्हणणे योग्य होणार नाही असे वाटते. >>चुभुद्याघ्या.

अजपाजप होतोच आहे... त्याची फक्त संगत करुन म्हणजे "अनुसंधान" ठेवुन वृत्ती एकाकार (पक्षी उपास्याशी तदाकार) झाली.. यात जप करणे अभिप्रेत नव्हते.

>>> स्व-स्थ राहोनी | राम नाम ध्यानी |
>>> लाभे पुण्य खाणी | आत्म वृत्ती ||

>>> आत्मवृत्तीची कळा | प्रेमे पाही सकळा |
>>>> दिसे सर्वत्र सावळा | चरा- चरी ||

>>>> "आत्मवृत्तीची कळा" हा शब्दप्रयोग नाही समजला.

आधीच्या ओवीतील " स्व-स्थ " अजपाजपाच्या अनुसंधानात प्राप्त झाली की इंद्रियांची बाहेरील धाव कमी होउन ती आत रमतात आणि ही अवस्था मुरली की आत्मवृत्ती ची अवस्था (आत्मस्थिती त रमण्याची.. रंगुन जाण्याची स्वाभाविक प्रवृत्ती ) येते.
या " आत्मवृत्तीची कळा " म्हणजे अशा वर वर्णन केलेल्या भावस्थिती ची अवस्था किंवा वैशिष्ट्य असे होते की सर्व चित्तवृत्ती निरभ्र होउन अ-द्वैताची व सर्व चराचरात "तो" च आहे ही अनुभूती येते व त्यातून येणारा शुद्ध प्रेम भाव बाळगला जातो.

>>>> नाम जप गोडी | जरी लाभे थोडी |
>>> साधने तोकडी | बाकी होती ||

>> बाकीची साधने "तोकडी" होत नाहीत. त्यांच्याकडे मन लागत नाही कारण >>> ते नामजपाकडे लागलेले आहे अशी ती अवस्था आहे. शब्दप्रयोग >>>> चुकलासा वाटतो. चुभुद्याघ्या.

यात असे म्हणायचे होते की एकदा नाम जपा तून मिळणारी गोडी चाखायला मिळाली की बाकी ची साधने त्यापुढे तोकडी वाटू लागतात ( म्हणजे नामाच्या गोडीतून मिळणा-या आनंदावस्थे प्रत ती इतर साधने नेतील का ? त्या पेक्षा आपले नामच छान आहे असे वाटू लागते )

आपली रचना वाचली अतिशय छान आहे.
आपण माझी रचना Appreciate केलीत त्या बद्दल धन्यवाद.
-- सागरलहरी

राघव's picture

13 Jul 2010 - 12:47 am | राघव

खव मधे लिहिलेय :)

राघव