पाऊस माझ्यासाठी काय आहे?

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जे न देखे रवी...
1 Apr 2008 - 3:50 pm

तिच्या मोकळ्या केसांत अलगद झिरपतो
माझी इच्छा कशी तो आपसुक पुरवतो?
तिच्या ओठांवर थांबलेला त्याचा एक थेंब
पाऊस.....प्रेमाचं दव नाही तर काय आहे?

हिरव्यागार पनांवर टपोरं मोगर्‍याचं फूल
फुलत असतं घेवून तिच्याच वेणीची चाहूल
अड्खळतं अवचित माझं प्रत्येक पाऊल
पाऊस्.....तारुण्य आणि रसिकतेची माय आहे !

कोसळणार्‍या सरी तिला चिंब भिजवतात
अबोली साडीला अंगाशी घट्ट सजवतात
मनात आपसुक प्रेमाचे अंकूर रुजवतात
पाऊस....हुरहुरणार्‍या मनावरची साय आहे !

चहाचा शेवटचा कप शिल्लक आहे
थरथरणार्‍या तिला पण तो हवा आहे
अर्धा घेवून ती उष्टावलेला अर्धा मला देते
हा असा "अमृताचा" क्षण प्रत्येकाला हवा आहे !

पावसामुळेच तर हे सगळं शक्य आहे
पाऊस माझ्या मरगळलेल्या शब्दांचा पाय आहे
पंचेंद्रियांना तृप्त करतो काही क्षणांत
पाऊस नसेल.....तर माझ्या जीवनात काय आहे?

कविता

प्रतिक्रिया

मीनल's picture

1 Apr 2008 - 5:14 pm | मीनल

मातीचा तो गंध पाऊस आणतो
विजलेल्या देहाला तो धुंद करतो
ती ही मग हळ्ळूच गालात हसते.
पाऊस-- हाच तिचा होकार आहे.

मदनबाण's picture

1 Apr 2008 - 5:31 pm | मदनबाण

हा असा "अमृताचा" क्षण प्रत्येकाला हवा आहे !
खरच !!!!!
कोसळणार्‍या सरी तिला चिंब भिजवतात
अबोली साडीला अंगाशी घट्ट सजवतात

क्लासच !!!!!

(पावसाची वाट पाहणारा चातक)
मदनबाण

प्राजु's picture

2 Apr 2008 - 6:38 am | प्राजु

तरूवेलीं ल्यायल्या हिरवा शृंगार
गवताच्या गालिच्यावर फुलांचा बहार
रानामध्ये घुमली शीळ हिरवीगार..
पाऊस... चराचराची माय आहे!

कविता खूप आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

उदय सप्रे's picture

2 Apr 2008 - 9:27 am | उदय सप्रे

तुमचा "ब्लॉग" आवडला , पण सगळ्याच कविता वाचायला वेळ नव्हता, सावकाश वाचून अभिप्राय नक्की कळवीन, मला "ओरबाडल्यासाखे" वाचायला - विशेषतः - कविता - नाही आवडत.
तुम्ही लिहिलेल्या
तरूवेलीं ल्यायल्या हिरवा शृंगार
गवताच्या गालिच्यावर फुलांचा बहार
रानामध्ये घुमली शीळ हिरवीगार..
पाऊस... चराचराची माय आहे!

या ओळी पण तितक्याच समर्पक वाटल्या ! खरच छान !
स्वतःचा "ब्लॉग" कसा बनवायचा असतो?खर्च किती येतो वगैरे मला सांगू शकाल का?
माझा ई-मेल आय डी : sudayan2003@yahoo.com

उदय "सप्रे"