निवडुंग........

निरन्जन वहालेकर's picture
निरन्जन वहालेकर in जे न देखे रवी...
8 Jul 2010 - 2:46 pm

निवडुंग

अपेक्षिले प्रेम फुलांचे
वैर त्या सवे होते भाली,
दूर सारले जरी काट्यांना
प्रीति त्यांची नित्य लाभली

प्रेम बहरले मग काट्यासंगे,
रुतवण हवी हवीशी जाहली.
निवडुंगा सम जाहले जीवन,
नाजूक नाती विरून गेली

फुलाचे बाग सुकतात कधीकधी
निवडुंग फुले सदैव फुलती.
गुलाब काटेरी फांदीवरचे,
कुंतलांना नित्य सजवती.

निवडुंग जाहला म्हणुनी तयासि,
आस फुलाची गैर नसे.
काटेरी झाडावरहि त्याच्या,
धवल फुलांत टवटवी वसे.

निरंजन वहाळेकर

मुक्तक

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

9 Jul 2010 - 6:37 pm | पाषाणभेद

व्वा! एकदम अलख निरन्जन!
काट्यातील फुलाची वेदना आवडली.

The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही