माझी प्रीत आहे

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जे न देखे रवी...
1 Apr 2008 - 3:26 pm

हार माझी या घडीला , पण उद्याची जीत आहे
कौतुकाचा मी भुकेला, आसवांना पीत आहे !

संपले जरी सूर कंठी , जिद्द आहे गायची
दाटल्या कंठात माझ्या अन उद्याचे गीत आहे !

जा, सुखाने झोप तू , माझाच हा वनवास आहे
सवय नाही भोगण्याची-त्या "सुखाला" भीत आहे !

जिंकला जो या पटावर तो सिकंदर खास आहे
"हारलो का?" हे पहाणे , जिंकण्याची रीत आहे !

काय तुम्ही मागुती या जीवनाच्या नाचता?
मुक्ती जे देहास देई, "मरण" माझी प्रीत आहे !

गझल

प्रतिक्रिया

मीनल's picture

1 Apr 2008 - 5:26 pm | मीनल

optimistic विचार आहेत.
पॉ़झिटिव्ह थिंकिंग!

प्राजु's picture

1 Apr 2008 - 7:33 pm | प्राजु

म्हणते..

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

प्राजु's picture

1 Apr 2008 - 7:33 pm | प्राजु

म्हणते..

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

स्वाती राजेश's picture

1 Apr 2008 - 10:24 pm | स्वाती राजेश

कविता चांगली आहे.
हार माझी या घडीला , पण उद्याची जीत आहे
खरच पॉझिटीव्ह थिंकींग