काल आम्ही संपाकांची वेदना विडंबनातून मांडली आणि ती वाचून एक श्री.रा.रा.जालकंटक आमच्याकडे तक्रार घेउन आले की तुम्ही फक्त संपादकांचीच बाजू मांडता आम्हाला पण आमची बाजू आहे आणि ती ही तुम्ही मांडली पाहिजे.. म्हटलं बरं बाबा सांग तुझी बाजू..
हळूहळू हा तापच झाले संपादन
वाचनमात्र रहावे आता कन्क्लूजन
येतो कंपू 'तो' जसा जसा हा जाली
वेगाने प्रतिसादांचे होते कर्तन.
जीव घेतला त्यांनी सगळ्या धाग्यांचा
फक्त मीच करतो नियमांचे उलंघन?
हेडफोन लावुन कानी, मी शांतपणे-
अवांतराचे रोज अता करतो टंकन.
उगाच पण हे निळे काळे झाले पाध्ये
चौपाटी जणू घेतले त्यांचे चुंबन
ड्रूपल सहा हे काय मला अधी सांगा ..
नंतर सांगा काय चालले संशोधन...
कधीच ना हा सुधारेल "केश्या" मेला
सुरूच राहिल जालावर कविता मुंडन
प्रतिक्रिया
8 Jul 2010 - 1:06 am | शिल्पा ब
हे बाकी चांगले आहे हो...दोन्ही बाजू आपणच मांडायच्या...विडंबन (?)छान.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
8 Jul 2010 - 1:13 am | छोटा डॉन
तरी सांगत होतो उगाच आमच्या केशुशेठ यांना चॅलेंज नका करु.
=)) =))
एक नंबर विडंबन, जबर्या उत्तर ...
------
छोटा डॉन
8 Jul 2010 - 1:18 am | टारझन
हा हा हा !! संपादनभार कमी व्हायला हवा बॉ तुमचा ... इकडे आनिकानिक काव्यडंबणे पडतील :)
8 Jul 2010 - 2:21 am | चतुरंग
नाण्याची दुसरी बाजूही चमकदार आहे तर! ;)
हं म्हणा मम!
(उ'पाध्ये')चतुरंग
8 Jul 2010 - 10:32 am | विजुभाऊ
पाध्ये कोण ? पाध्ये म्हणजे काय? याचा कोणी खुलासा करेल का?
8 Jul 2010 - 2:28 pm | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.
(आभारी)केशवसुमार
8 Jul 2010 - 4:04 pm | जागु
सुरूच राहिल जालावर कविता मुंडन
खंत. 8>