रविवारी सकाळी लवकर निघालो. पुणे-सोलापूर रस्त्याने जाउन आधी थेऊरच्या चिंतामणीचे दर्शन घेतले आणी परत महामार्गाला जाउन यवतच्या २ किमी अलीकडे असलेल्या टोल नाक्याच्या थोडेसे पुढे भुलेश्वर-सासवड फाट्यावरून उजवीकडे वळालो. इथून साधारण ८ किमी असलेल्या भुलेश्वराच्या मंदीरापाशी घाट चढून पोहोचलो.
भुलेश्वर हे अतिशय सुंदर कोरीव काम असलेले १३ व्या शतकातील यादवकालीन शिल्पसमृद्ध शिवमंदीर आहे. इस्लामिक आक्रमणात येथील बर्याच शिल्पांची पडझड झाली आहे. तरी जे शिल्लक आहे ते निव्वळ अप्रतिमच. मंदिराचा बाह्यभाग इस्लामिक शैलीतला वाटतो आणि अर्थात मूळ मंदिरावर नंतर तो इस्लामिक राजवटीत बांधल्याचे दिसते ते नंतरची आक्रमणे रोखण्यासाठीच बहुधा.
एका अंधार्या वाटेने आपण मंदिराच्या अंतर्भागात प्रवेश करतो आणी शिल्पांचा खजिनाच आपल्यासमोर उघड होतो. पुढे काय लिहू, प्रत्यक्ष बघाच.......
महाभारतातील धनुर्युद्ध.
गजयुद्धः भीम हत्ती उचलून फेकून देतांना..
तलवारयुद्ध..
विष्णूरूपी बाण
सिंह व हत्ती युद्ध
मंदिरावरून पाहताना
व शेवटी
प्रतिक्रिया
6 Jul 2010 - 9:58 am | अमोल केळकर
नवीन जागेची सुंदर ओळख करुन दिलीत.
धन्यवाद. फोटो छानच. शंकराची पिंड मस्त सजवली आहे :)
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
6 Jul 2010 - 10:22 am | बहुगुणी
"नवीन जागेची सुंदर ओळख करुन दिलीत."
असंच म्हणतो, फोटो सुंदरच! धन्यवाद!
6 Jul 2010 - 9:12 pm | गणपा
"नवीन जागेची सुंदर ओळख करुन दिलीत."
असेच म्हणतो.
6 Jul 2010 - 10:12 am | डोमकावळा
अप्रतिम फोटो... खूपच सुंदर...
पुन्हा एकदा भुलेश्वरला जायची दाट इच्छा होते आहे.
मागे गेलो होतो तेव्हा तिथल्या पुजार्यांशी बोलून बरीच माहिती मिळवली होती .
अधिक माहितीसाठी इथे पहा.
ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
6 Jul 2010 - 11:15 am | Dhananjay Borgaonkar
हे मंदिर म्हणजे अत्युत्तोम शिल्पकलेचा नमुना आहे.
हेमाडपंती बांधणी आहे. पण देवळातल्या भग्न मुर्ती बघितल्या की वाईट वाटतं.
6 Jul 2010 - 3:16 pm | मस्त कलंदर
सुरेख फोटो... नि आणखी एका उत्तम स्थळाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद....
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
6 Jul 2010 - 4:47 pm | जागु
खुपच सुंदर आलेत फोटो.
6 Jul 2010 - 5:01 pm | स्वाती दिनेश
छान फोटो..
स्वाती
6 Jul 2010 - 8:52 pm | अरुंधती
फोटोज फार मस्त आलेत! सुरेख स्थळ! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
7 Jul 2010 - 1:58 am | पुष्करिणी
सुंदर , सगळीच शिल्प अप्रतिम
नविन स्थळाची माहिती करून दिल्याबद्द्ल धन्यवाद
पुष्करिणी
7 Jul 2010 - 9:17 am | टारझन
ह्या शिल्पाविषयी मी पामर आणिक काय बोलणार बा ? ;)
-(शिल्पकार) छण्णीराम तासणे
7 Jul 2010 - 11:27 am | किल्लेदार
मला पण जायचे आहे. पुण्याहून साधारणतः किती किमी असेल ?
7 Jul 2010 - 12:18 pm | प्रचेतस
पुण्यापासून ५५ किमीवरच आहे हे दुर्लक्षित पण अत्यंत रम्य ठिकाण.
7 Jul 2010 - 12:23 pm | भाग्यश्री कुलकर्णी
मस्त आहे.
9 Jul 2010 - 12:50 pm | कवितानागेश
खूप सुन्दर ठिकाण आहे.
नक्की जाईन एकदा. अक्खा दिवस दिला तरच नीट बघता येइल असे वाटतय....
शंकराची पिन्डी फारच सुन्दर सजवली आहे. अनेक ठिकाणी लोक पुजेच्या नावाखाली ,धुडगुस घालून जातात शंकराच्या भोवती!
अवांतरः ( भुलवणारा-म्हणून भुलेश्वर का?)
============
माउ
29 Jan 2013 - 10:44 am | यशोधरा
पूर्ण मंदिराचा फोटो फार सुरेख आहे!
29 Jan 2013 - 2:12 pm | इनिगोय
आठव्या फोटोतली शिल्पं बघून कसंसंच झालं. 'राजा शिवछत्रपती'मधील सातशे वर्षांची काळरात्र हे प्रकरण आठवलं.
16 Jan 2015 - 10:56 pm | llपुण्याचे पेशवेll
सुंदर लेख. इतक्यातच भुलेश्वराला जाउन आलो. मजा आली पाहताना. हा लेख पाहून गेलो असतो तर कदाचित अजून रुचिने शिल्पे पाहता आली असती. सदर शिल्पांच्या मोडतोडीबद्द्ल आमच्या बाबांनी १९७० सालचा सांगितलेला किस्सा. ते आणि त्यांच्या शाखेतल्या १२-१५ जणांचा गट सायकलने पुण्याहून भुलेश्वराला गेला होता. ते पाहून परत आल्यावर मोतीबागेत गप्पा मारत असताना यवतच्या एका जेष्ठ स्वयंसेवक असे म्हटले की "हि शिल्पांची मोडतोड ही सर्वच मुसलमानांची देणगी नसून ढमढेरे, निंंबाळकर, दाभाडे अशा मातबर पेशवाई सरदारांच्या अंतस्थ बेबनावाची ही देन आहे.
विषेशतः दुर्गम मंदिरे ही ज्या प्रकारे फोडली गेली ती तिथे प्रतिस्पर्धी सरदाराची संपत्ती लपवली असेल म्हणून खणण्यासाठीच फक्त त्यातून र्हास मात्र आपल्या सांस्कृतिक ठेव्याचा झाला"