महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान्........रायरेश्वर!!!!!!!!

किल्लेदार's picture
किल्लेदार in कलादालन
3 Jul 2010 - 5:58 pm

अवघ्या महाराष्ट्रात ज्याला रायरेश्वर माहिती नाही असा माणूस विरळा. जर कोणी असेल तर तो कमनशिबिच....

मी रायरेश्वरला आजवर दोनदा गेलो. माझ्या सुदैवाने म्हणा किंवा मित्रांच्या दुर्दैवाने, दोन्ही वेळेस एकटाच होतो. या वेळेस मुक्काम करायचा ठरवला. थोडे तहान्-भूक लाडू घेउन आणि नेहमीच सोबत करणारा दोस्त्....माझा Camera.

सन्ध्याकाळी ४.३० ला बाईक ने पायथा गाठला आणि माझा फोटोग्राफीक प्रवास सुरू झाला. माझा मीच असल्यामुळे कोणी टोकणारे नव्हते. रमतगमत, नीरव शांतता पीत (क्लिक हा आवाज सोडल्यास) मी निघालो. (शिवाय गडावर महाराज आणि मावळे होतेच :)).

रात्री पुजार्‍याकडेच मुक्काम केला. गरमागरम भाकरी आणि झोपायला पलंग १००/- मधे मिळाला. रात्रीची मऊ हवा पीत आणि पिठूर चांदणे बघत शान्त झोप झाली पण थोडीच. सकाळी उजाडायच्या आत जवळ्च्या टेकाडावर Camera मांडून बसलो.

तर या फोटोग्राफीक मेडीटेशन मधे जे काही मिळाले ते असे....

गडाची वाट....

शीडी

रायरेश्वराचे देऊळ........

रम्य पहाट्........मागे केंजळगड.

स्थिरचित्र

प्रतिक्रिया

स्वतन्त्र's picture

3 Jul 2010 - 6:07 pm | स्वतन्त्र

शेवटून दुसरे छायाचित्र अप्रतिम !
गडावर गाडी कुठवर जाते कळू शकेल काय ?
:?

किल्लेदार's picture

3 Jul 2010 - 6:21 pm | किल्लेदार

वाईकडून एक गाडीरस्ता आहे तो बर्‍यापैकी वर आणतो. मी कधी गेलो नाही. मी कोर्ले गावातून पायी गेलो. पुणे-भोर आणि भोर-कोर्ले अशी एस्-टी सेवा उपल्बध आहे. स्वतःचे वाहन नेणे उत्तम....

स्वतन्त्र's picture

8 Jul 2010 - 4:37 pm | स्वतन्त्र

धन्यवाद ! आभारी आहे ! या पावसाळ्यात जाण्याचा नक्की प्रयत्न करेल !

विकास's picture

3 Jul 2010 - 6:28 pm | विकास

सुंदर छायाचित्रे! किल्ला पण प्रत्यक्ष बघायला आवडेल.

शेवटचे छायाचित्र फोटोशॉप अथवा तत्सम सॉफ्टवेअरचा वापर करून येथे दाखवले आहे का कुठल्याही संपादनाविना?

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

किल्लेदार's picture

3 Jul 2010 - 6:32 pm | किल्लेदार

ते आहे तसेच आहे.

विकास's picture

3 Jul 2010 - 6:37 pm | विकास

मग तर फारच छान!

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

chintamani1969's picture

3 Jul 2010 - 9:32 pm | chintamani1969

बऱ्याच वर्ष्याच्या आठवणी जागृत केल्या तुम्ही .मनापासून आभार

chintamani1969's picture

3 Jul 2010 - 9:36 pm | chintamani1969

बऱ्याच वर्ष्याच्या आठवणी जागृत केल्या तुम्ही .मनापासून आभार

श्रावण मोडक's picture

3 Jul 2010 - 9:40 pm | श्रावण मोडक

मस्त प्रकाशचित्रे!!!

स्पंदना's picture

4 Jul 2010 - 9:41 am | स्पंदना

नितांत सुंदर फोटोज! आभाळाचे इतके सुन्दर फोटोज मला पहिल्यांदाच पहायला मिळाले.
माहिती सुद्धा चांगली आहे.

किल्लेदार's picture

4 Jul 2010 - 4:29 pm | किल्लेदार

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद....

पुष्करिणी's picture

4 Jul 2010 - 4:42 pm | पुष्करिणी

अप्रतिम फोटो, खूप आवडले.

बर्‍याचदा गेलीय, पण तुमच्याकडचे फोटो फारच उच्च आहेत

पुष्करिणी

भडकमकर मास्तर's picture

5 Jul 2010 - 5:31 pm | भडकमकर मास्तर

असा निळा रंग आकाशाचा फोटोत क्वचित पकडता येतो.. मस्त

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Jul 2010 - 5:37 pm | बिपिन कार्यकर्ते

अप्रतिम रे किल्लेदारा !!!

बिपिन कार्यकर्ते

जागु's picture

5 Jul 2010 - 8:04 pm | जागु

अप्रतिम फोटो.

अरुंधती's picture

5 Jul 2010 - 8:58 pm | अरुंधती

अ प्र ति म! खूप छान आहेत फोटोज! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

सुनील's picture

5 Jul 2010 - 9:04 pm | सुनील

मस्त फोटो.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रभो's picture

6 Jul 2010 - 6:57 pm | प्रभो

मस्त!!

sneharani's picture

8 Jul 2010 - 4:44 pm | sneharani

मस्त फोटो आहेत.
:)

विसोबा खेचर's picture

8 Jul 2010 - 9:18 pm | विसोबा खेचर

सुंदर..

आळश्यांचा राजा's picture

8 Jul 2010 - 9:41 pm | आळश्यांचा राजा

क्लास!

आळश्यांचा राजा