ब्राझिल वर्ल्डकपच्या बाहेर पडल्यामुळे तसेही या मॅच मधे फारसे लक्ष नव्हतेच...
तसेही मॅच घाना आणि उरुग्वे यांचा मध्ये होती...
घाना आफ्रिकेतला उरलेला शेवटचा स्पर्धक देश... मॅचचे पहिले ९० मिनिट आणि एक्स्ट्रॉ टाईम चे २९ मिनिट चांगले झालेच.. दोन्ही संघ आक्रमक होतेच आणि शेवटच्या काही मिनिटांत तर घाना सतत उरूग्वेच्या हाफमध्येच होता. पण खरा थरार घडला तो सामना संपायला काही सेकंद बाकी असताना... घानाला एक फ्री कीक देण्यात आली. स्टीव्हन अॅपीया ने केलेला प्रयत्न उरूग्वेच्या सोरेझने अडवला , पण तो हाताने. आणि अगदी मॅचच्या शेवटच्या सेकंदाला घानाला एक पेनल्टी कीक आणि सोरेझला रेड कार्ड मिळाले.
असीमोल ग्यान, घानाचा सर्वोत्कृष्ट स्ट्रायकर ही पेनल्टी घ्यायला उभा राहिला आणि घानाच्या बाजूने मैदानात विजयाचा जल्लोष सुरू झाला. सार्या आफ्रिकेच्या आशा खांद्यावर घेऊन ग्यानने ही कीक घेतली पण हाय रे दुर्दैवा.. बॉल साईडबारला जाऊन भिडला.. आणि रेड कार्ड घेऊन बाहेर जाणार्या सोरेझने आणि अर्थातच उरूग्वेच्या सर्व समर्थकांनी जल्लोष केला..
सामना अर्थातच पेनल्टी शूट आऊट मध्ये गेला आणि एक सुवर्णसंधी गमावल्यानंतर जे होते तेच झाले... घानाने सामना गमावला.. ग्यान हिरो टू झिरो झाला.. त्याचबरोबर धिस टाईम फॉर आफ्रिका असे गाणे म्हणत आफ्रिकेतला एखादा संघ जिंकावा ही आशा संपुष्टात आली.
प्रतिक्रिया
3 Jul 2010 - 3:22 am | टारझन
अरेरे ...घाणा चा अगदी क्राईम माष्टर गोगो झाली की ... हाथ को आया मुहं ना लगा =))
असो , "छोटा घाणा" च्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत :)
3 Jul 2010 - 4:10 am | मेघवेडा
आम्ही एका पब मध्ये बसून बघत होतो.. सगळीकडे नुसता जल्लोष! काही नायजेरियन्सचा ग्रुप होता तो अर्थातच घानाला सपोर्ट करत होता. त्यांच्या शेजारीच एक गोर्यांचा ग्रुप होता तो उरुग्वेला सपोर्ट करत होता. बराच वेळ यांच्यात खुन्नस चालली होती. एकमेकांना चिडवत होते डिवचत होते, पण सगळं गमतीत.. सुआरेझ ने हाताने चेंडू अडवलेला बघून काळ्यांनी अगदी थयथयाटच सुरु केला. "धिस इस फकिन हिलेरियस.. हा हा हा" वगैरे कमेंट्स पास झाल्या!
काही क्षणांनंतर ग्यानची पेनल्टी किक मिस झालेली बघून ते गोरे अ क्ष र शः लोळले पबमध्ये.. आणि "धिस इस व्हॉट यू कॉल हिलेरियस यू मंकीज्" अशा कमेंटने परतफेड केली त्यांनी..
=)) =))
आणि आम्ही अर्थातच त्या चुकलेल्या पेनल्टीचा, त्या एकूण विनोदी वातावरणाचा लुत्फ घेत होतो!
पण खरंच.. जबरदस्त झाली मॅच! आपण तर बाबा सुआरेझच्या बाजूने. त्याने जे केलं ते संघाच्या भल्यासाठी. रिस्क घेतली बापड्यानं. कठीण समयी ग्यान उरुग्वेच्या मदतीला धावून आला! :P
3 Jul 2010 - 4:22 am | Nile
सहमत. अश्यावेळी बॉल वाचवण्याचा नादात काय पण होउ शकते.
-Nile
3 Jul 2010 - 9:27 am | अप्पा जोगळेकर
सुआरेझच्या प्रसंगावधानाचं कौतुक वाटलं. एवीतेवी तो गोल होणारच होता. त्याऐवजी हाताने बॉल अडवून त्याने एक चान्स घेतला आणि असामोह ग्यानने ती संधी वाया घालवली.
3 Jul 2010 - 4:22 am | योगी९००
आम्ही पण ओपन थेटर मध्ये बघत होतो. बरेच काळे आणि गोरे घाना ला सपोर्ट करत होते. अतिरिक्त वेळेत तर जामच धमाल आली.
पेनल्टी शुटाऊट मध्ये तर सगळेच दोन्ही टीमला सपोर्ट करत होते..गोल झाला तरी किंवा नाही झाला तरी आरडा ओरडा चालू होआली.खुप मजा आली.
घाना साठी वाईट वाटले...हाथ को आया मुहं ना लगा...मात्र आधिच्या मॅचमध्ये ब्राझिल हरल्यावर खुपच आनंद झाला..
आता उद्याच्या प्रतिक्षेत..अर्जेटिना वि. जर्मनी आणि स्पेन वि. पराग्वे..
खादाडमाऊ
3 Jul 2010 - 6:41 am | सहज
बिच्चारी घाना! पण पेनल्टी हुकणे म्हणजे स्वताहून हरणे...
काल हॉलंड ४-१ जिंकू शकले असते, असाच खेळ केला तर हरतील पुढची मॅच.
3 Jul 2010 - 9:36 am | ऋषिकेश
बिचारी घाना!!
यंदा एक तरी आफ्रिकन/आशियायी देश निदान सेमीजला असावेत असं वाटत होतं.. असो :(
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर
3 Jul 2010 - 6:41 pm | मेघवेडा
आज अर्जेंटीनाचंही काहीसं या लेखाच्या शीर्षकाला साजेसं होणार आहे!
L)
4 Jul 2010 - 1:04 am | भडकमकर मास्तर
बिचारा ग्यान..
हीरो टु झीरो हे अगदी खरं...
तो हातानं अडवणारा सोरेझभौ लै हुश्शार ठरला...
एक शंका... त्याला रेड कार्ड का दिले? गोल वाचवताना चुकून हात लागला तर पेनल्टी हे योग्य पण एकदम रेड कार्ड?
या रेड कार्डाचे इतके वैयक्तिक मत-मतांतरं असणारे नियम असतात का?
4 Jul 2010 - 5:36 pm | वेताळ
जर खेळाडुने अडवला तर त्याला रेड कार्ड व प्रतिस्पर्धी टीमला फ्री किक असा नियम आहे.
बाकी जाणकार अधिक माहिती देतील.
ग्यान ला फ्री किक नको होती त्याला तो गोल म्हणुन पंचांकडुन निर्णय हवा होता.
वेताळ
4 Jul 2010 - 6:49 pm | टारझन
आत्ताच आम्हाला कळलेल्या म्हाईती नुसार "हँड ऑफ गॉड गोल" करुन रडिचा डाव खेळुन वर्ल्डकप जिंकलेल्या आर्जेंटिणा च्या दिएगो म्याराडॉना विषयी आमच्या मनात द्वेष उत्पन्न झाला आह. आणि तो आमच्या नजरेत "हिरो टू झिरो" झाला आहे. :)
- विक्सेगो सॅरिडोना