रस्ता
--------------------------------------------
जो तो म्हणुन गेला,वाटेत भेटणारा..
रस्त्यात गाव नाही..रस्ता लुबाडणारा ..
पाऊल टाकणे हा, उपचार फक्त ठरला..
रस्ता मला मिळाला,मजलाच टाळणारा..
दिसता कधी कुठेही पाऊलवाट छोटी..
रस्ता उगाच बनतो..छीचोर वागणारा..
रस्त्यात साथ मिळता,हातात हात येता..
रस्ता बनुन जातो, भलता लुभावणारा..
रस्त्यास थांब म्हणता..गर्रकन वळुन गेला..
रस्ता कधीच नव्हता कोठेच थांबणारा..
------------योगेश जोशी
प्रतिक्रिया
1 Jul 2010 - 2:51 am | पाषाणभेद
रस्त्यास थांब म्हणता..गर्रकन वळुन गेला..
रस्ता कधीच नव्हता कोठेच थांबणारा..
हे उदाहरणार्थ बाकी मस्त. एकदम बेडूकच.
![The universal symbol for diabetes](http://www.diabetesbluecircle.org/img/UNR.png)
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
1 Jul 2010 - 4:10 pm | अमोल केळकर
सुंदर
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा