डोणे दार - आहुपे घाट

अप्पा जोगळेकर's picture
अप्पा जोगळेकर in कलादालन
29 Jun 2010 - 4:14 pm

गेल्या वीकेन्ड्ला तिरंगी घाटात गेलो होतो. त्यावेळी यतिन नामजोशी याने काढलेले काही अप्रतिम फोटो टाकत आहे.
बाकी तिरंगी घाटाबद्दल बोलण्यासारखे कमी आणि अनुभवण्यासारखेच अधिक आहे. नजर ठरत नाही असे उंच उंच कातळकडे, प्रचंड दमछाक करणारी खडी चढण आणि मढ्ची रामवाडी (कोकण) ते डोणे गाव (घाटमाथा) अशी चार्-साडेचार तासांची शरीराचा, मनाचा कस पाहणारी चाल. गेल्या महिन्यात वल्लींकडून या रुट्ची माहिती घेतली होती. त्यांचे आभार.

Disclaimer -
हे फोटो अतिशय सुंदर आहेत, अप्रतिम आहेत, लाजवाब आहेत. सगळेच्या सगळे फोटो यतिन नामजोशी याने काढलेले आहेत. मी काढलेले नाहीत. तरी कृपया या गोष्टीची आवर्जून नोंद घ्यावी अशी विनंती . कोणाचाही गैरसमज होऊ नये.

<

प्रवास

प्रतिक्रिया

अप्पा जोगळेकर's picture

29 Jun 2010 - 4:18 pm | अप्पा जोगळेकर

फोटो का दिसत नाहीत ? काहीतरी घोटाळा झालाय.

Dipankar's picture

29 Jun 2010 - 4:31 pm | Dipankar

अप्प्या हा घे एक नामजोश्याने काढलेला फोटो

आंबोळी's picture

29 Jun 2010 - 4:37 pm | आंबोळी

आंबोळी

आंबोळी's picture

29 Jun 2010 - 4:38 pm | आंबोळी

आंबोळी

विसुनाना's picture

29 Jun 2010 - 4:42 pm | विसुनाना

अप्पा, स्लाईड शोची लिंक देऊ नका..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Jun 2010 - 5:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला हा पण आवडला:

अदिती

रंगोजी's picture

2 Jul 2010 - 11:50 am | रंगोजी

अतिशय सुंदर!!

Dipankar's picture

29 Jun 2010 - 4:47 pm | Dipankar

अप्पा इमेज वर राईट क्लिक कर कॉपी लिंक लोकेशन आणी ती लिंक वापर

सुनील's picture

29 Jun 2010 - 6:43 pm | सुनील

फोटो मस्तच आहेत पण जरा अधिक माहिती द्या ना! हे ठिकाण कुठे आहे, कसे जायचे इ.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

जागु's picture

29 Jun 2010 - 9:31 pm | जागु

छानच.

संदीप चित्रे's picture

29 Jun 2010 - 11:21 pm | संदीप चित्रे

हे ठिकाण कुठे आहे? कसं जायचं?
यतिन नामजोशी कोण? इतके भन्नाट फोटो कसे घेतले?
प्रश्न प्रश्न आहेत नुसते !
जरा डिटेलवार लिहाल का?
----------
पाण्यात उभं राहून तोंड धुतानाचा आणि अर्ध्या प्रतिबिंबाचा हे दोन्ही फोटो खूप आवडले. शिवाय ते एकटं झाड आणि कंच हिरवाईचे फोटोही खास. खरंतर सगळेच फोटो उच्च !

अप्पा जोगळेकर's picture

30 Jun 2010 - 10:04 am | अप्पा जोगळेकर

यतिन नामजोशी हा डोंबिवलीतला एक प्रसिद्ध रॉक क्लाईंबर आणि छायाचित्रकार आहे. आणि माझा मित्रदेखील आहे.

Dipankar's picture

30 Jun 2010 - 10:25 am | Dipankar

आणी प्रत्येक ट्रेक साठीचा आपला फुकट वाटाड्या

अप्पा जोगळेकर's picture

30 Jun 2010 - 12:48 pm | अप्पा जोगळेकर

हुशार आहेस तू दिप्या. हे 'विशेषण' मी विसरलोच.

वाहीदा's picture

29 Jun 2010 - 11:52 pm | वाहीदा

अप्पा फोटो मोठे करुन टाका ना.. कित्ती लहान आहेत कसे करायचे ते कोणा सदस्याला तरी विचारा ना
अन हे यतिन नामजोशी कोण ?
फोटो छान असूनही मजा येत नाही कारण की ते खुप लहान आहेत :-(
~ वाहीदा

केशवराव's picture

30 Jun 2010 - 1:53 am | केशवराव

हे ठिकाण कुठे आहे ? फोटो मात्र छानच !!!

अमोल केळकर's picture

30 Jun 2010 - 9:23 am | अमोल केळकर

हे ठिकाण कोकणात कुठेशी आहे ? :)

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

अप्पा जोगळेकर's picture

30 Jun 2010 - 9:28 am | अप्पा जोगळेकर

मुरबाडहून धसई येथे जावे, तेथून मढ्ची रामवाडी येथून चढाई सुरू करावी. हा रुट आपल्याला घाटावर डोणे गावात घेऊन जातो. गावात पोचलो की डाव्या हाताला हातवीज, दुर्गवाडी गावाकडे रस्ता जातो. येथून दुर्ग, ढाकोबाला जाता येते. मला वाटतं याच रस्त्यावर खुटेदारची घाटवाट खाली कोकणात रामवाडीमध्येच उतरते. तर उजव्या हाताला आहुपे गावाकडे जाणारा डांबरी रस्ता आहे. आम्ही दुर्ग ढाकोबाला गेलोच नाही. डोणे गावातून आहुपे गावात गेलो आणि दुसर्‍या दिवशी आहुपे घाटाने उतरलो. आहुपे गावातून धमधम्या, सिद्धगडला ही रस्ता जातो. म्हणजे एखाद्याने मनात आणलं तर सिद्धगड, धमधम्या, आहुपे गाव, डोणे गाव, हातवीज, दुर्ग, ढाकोबा आणि दार्‍या घाटातून खाली कोकणात पळू या गावी उतरु शकतो. पण तीन- चार दिवस लागतील. पण एक्दम धमाल रुट आहे.

सहज's picture

30 Jun 2010 - 12:28 pm | सहज

आवडले.

लवकरच हेही साखळीपत्रात उतरणार बघा!

स्मिता चावरे's picture

30 Jun 2010 - 1:03 pm | स्मिता चावरे

अप्रतिम फोटो....

सुप्रिया's picture

30 Jun 2010 - 1:17 pm | सुप्रिया

सगळेच फोटो सुरेख आहेत.

शरदिनी's picture

30 Jun 2010 - 2:07 pm | शरदिनी

सुरेख फोटो..
पहिला अप्रतिम...

ते हिरव्या पानाला आलेल्या बुडबुड्यांचे फोटो सुद्धा छान

जागु's picture

30 Jun 2010 - 2:25 pm | जागु

जबरदस्त.

jaypal's picture

30 Jun 2010 - 5:36 pm | jaypal

अप्रतिम फोटो आहेत xxvx
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात

आशिष सुर्वे's picture

30 Jun 2010 - 11:51 pm | आशिष सुर्वे

जल्ला कालीफोरनिया झक्कत गेलं की ओ आम्च्या कोकनापुढं!

काय फोटू हायत वो!
डोलं भरूनशान पावलं!!
======================
कोकणी फणस

आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/

नंदन's picture

1 Jul 2010 - 12:15 am | नंदन

सगळेच फोटो क्लास - खासकरून पहिला.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

पुष्करिणी's picture

1 Jul 2010 - 12:19 am | पुष्करिणी

सगळेच फोटो अप्रतिम आहेत, पहिला खूप आवडला..

पुष्करिणी

प्रचेतस's picture

1 Jul 2010 - 9:10 am | प्रचेतस

अप्पासाहेब, अतिशय सुरेख फोटो पण त्याबरोबरच ट्रेकचे सखोल वर्णनही टाका.
पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि पावसाळा संपताना अतिशय स्वच्छ हवेमुळे आकाशाची निळाई आणि भूमीची हिरवाई सुंदर रंगसंगती साधते त्याचे प्रत्यंतर तुमच्या फोटोंत येतच आहे.
सुरेख असा हा २ घाटांचा ऑफबीट ट्रेक केल्याबद्दल तुमचे खास अभिनंदन.

अप्पा जोगळेकर's picture

1 Jul 2010 - 9:31 am | अप्पा जोगळेकर

सर्व प्रतिक्रियांबद्द्ल मी यतिनच्या वतीने तुम्हा सगळ्यांचे आभार मानत आहे.

त्याचे प्रत्यंतर तुमच्या फोटोंत येतच आहे.

हे सगळेच फोटो अतिशय सुंदर आहेत, अप्रतिम आहेत, लाजवाब आहेत. हे सगळेच्या सगळे फोटो यतिन नामजोशी याने काढलेले आहेत. मी काढलेले नाहीत. तरी कृपया या गोष्टीची आवर्जून नोंद घ्यावी अशी विनंती . कोणाचाही गैरसमज होऊ नये.

विमुक्त's picture

1 Jul 2010 - 1:23 pm | विमुक्त

सुंदर!!!

simplyatin's picture

5 Jul 2010 - 9:45 pm | simplyatin

Namaskar mitraho,

Appa ani dipya,

photo upload kelya baddal ani disclaimer baddal vishesh abhar..

ani aplya saglyanche pratikriyan baddal pan...

Appa ne mhantlya pramane me kahi Prasiddha wagre Climber nahiye(appa ha tujha mothepana ahe..) 7-8 ch sulke jhalet..ani je lok prasiddha mhanavtat tyanche 70-80 jhalele astat..

Bhatkaychi prachand avad ahe. ani ase samvichari sathidar milat rahtil hich asha..

apla,
yatin namjoshi.