???

प्रमोद देव's picture
प्रमोद देव in जे न देखे रवी...
25 Jun 2010 - 6:50 pm

कविता वाचता वाचता
कुणी तरी करतोय विडंबन
छान,मस्त,झकास वगैरे
म्हणून आम्हीही देतोय उत्तेजन
पण एकदा कहरच झाला
एकामागून एक विडंबनाच्या
गाड्या धावायला लागल्या सटासट्‌
आम्हाला भिती की एखादे वेळी
गाडीच घसरायची अचानक
त्या गुळगुळीत ’रुळा’वरून !!!

करुणमुक्तक

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jun 2010 - 7:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काळजी नसावी....! :)

-दिलीप बिरुटे
[घसरलेला]

शुचि's picture

25 Jun 2010 - 7:07 pm | शुचि

हा हा
तुम्ही बी का?

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

सहज's picture

25 Jun 2010 - 7:40 pm | सहज

घसरलीच!

सहज's picture

25 Jun 2010 - 7:40 pm | सहज

घसरलीच!

रामदास's picture

25 Jun 2010 - 7:48 pm | रामदास

आज सगळे
"आज रपट जाये तो हमे ना उठ्ठय्यो
आज फिसल जाये तो हमे ना उठ्ठय्यो" च्या तयारीनी उतरले आहेत.
पावसाची नशा आहे.

राजेश घासकडवी's picture

26 Jun 2010 - 1:52 pm | राजेश घासकडवी

"आज रपट जाये तो हमे ना उठ्ठय्यो
आज फिसल जाये तो हमे ना उठ्ठय्यो"

ती तेवढी हातगाडीवरची स्मिता पाटील दिसली असती तर. काय सुंदर अभिनयाचं प्रदर्शन केलं होतं तिने...;)

प्रमोद देव's picture

26 Jun 2010 - 1:56 pm | प्रमोद देव

अहो आम्ही हलकेच घेतलंय हो. :)

मीनल's picture

25 Jun 2010 - 9:15 pm | मीनल

फारच झाली आहेत विडंबन.
कंटाळा आला आता.
अती झाले पण हसूच आले नाही.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/

पंगा's picture

25 Jun 2010 - 9:21 pm | पंगा

अती झाले पण हसूच आले नाही.

आम्हास हसू न येण्यासाठी अती होण्याची वाट पहावी लागली नाही.

- पंडित गागाभट्ट.

टारझन's picture

25 Jun 2010 - 9:17 pm | टारझन

देवाक काळजी

बाकी मीनल शी सहमत :) प्रत्येक जण जणु ....... जाऊ दे बोललो तर म्हणतील बोलतो म्हणुन ;)

पंगा's picture

25 Jun 2010 - 9:22 pm | पंगा

जाऊ दे बोललो तर म्हणतील बोलतो म्हणुन

+१

- पंडित गागाभट्ट.

शिल्पा ब's picture

25 Jun 2010 - 10:12 pm | शिल्पा ब

सध्या आम्ही शेवटी "ळ" असलेले धागे वाचणं सोडून दिलं आहे...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

तिमा's picture

27 Jun 2010 - 6:08 pm | तिमा

'निम्मी' या नटीचा नाकाचा 'ळ' आहे असे आमच्या आईचे मत होते.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

टारझन's picture

27 Jun 2010 - 9:57 pm | टारझन

इथे माझी एक हलकी फुलकी प्रतिक्रिया होती !!
उडवली बहुदा ... उडवणार्‍याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

- टारझन कापुर
टार्‍याच्या प्रतिक्रिया म्हणजे कापुर .. कशाही असोत ... उडुन जातात :)

चिरोटा's picture

25 Jun 2010 - 10:15 pm | चिरोटा

विडंबनावरचे विडंबन आवडले.
P = NP

कानडाऊ योगेशु's picture

27 Jun 2010 - 9:29 pm | कानडाऊ योगेशु

प्र.का.टा.आ.

आनंद घारे's picture

28 Jun 2010 - 10:05 am | आनंद घारे

एकजण म्हणतो, "माझा प्रतिसाद उडवून टाकला आहे". एवढे सांगण्यासाठी दिलेला प्रतिसाद मात्र टिकवून ठेवला आहे. प्र.का.टा.आ. याचा अर्थसुद्धा "प्रतिसाद काढून टाकला आहे." असाच आहे ना? मग ते वेगळे सांगून कोणाला त्याचा काय उपयोग आहे?
अज्ञ पामराला काही उमगत नाही.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

आनंद घारे's picture

28 Jun 2010 - 10:16 am | आनंद घारे

बाकी देवकाकांशी मी सहमत आहे. माझ्या मते विडंबन वाचण्यालायक होण्यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता असावी.
१.विडंबन करणार्‍याला मूळ कविता चांगली समजली असली पाहिजे आणि ती गोष्ट विडंबनात दिसली पाहिजे
२. ती जर वृत्त किंवा छंदबद्ध असेल तर विडंबनानेही त्याचे नियम काटेकोरपणे पाळले असले पाहिजेत.
३. मूळ कवितेमधील शब्दांची आठवण होईल असे शब्द चरणांच्या सुरुवातीला किंवा अखेरीस येत राहिले पाहिजेत.
केवळ साधारणपणे मूळ कवितेच्या किंवा गाण्याच्या चालीवर दुसरे गाणे लिहिले तर ते विडंबन होत नाही, स्वतंत्र गाणे होते आणि सुमार दर्जाचे असेल तर ते वाचवतही नाही.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

कानडाऊ योगेशु's picture

28 Jun 2010 - 12:52 pm | कानडाऊ योगेशु

प्रमोद काका,
??? ह्या ठिकाणी "(पोट)शू" टाका. (ह.घ्या)

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

नितिन थत्ते's picture

28 Jun 2010 - 1:02 pm | नितिन थत्ते

अजून
णूळ, षूळ, लूळ, घूळ, छूळ, ळूळ

वगैरे राहिले आहेत.

नितिन थत्ते

राजेश घासकडवी's picture

28 Jun 2010 - 1:27 pm | राजेश घासकडवी

(वा)तुळ, (बा)भुळ, (ब)कुळ (चा)हुल, (रा)हुल

उ(ब)ळ - ब सायलेंटची विनंती...
पा(ल्हा)ळ - ल्हा सायलेंटची विनंती...
भु(र)ळ - र सायलेंटची विनंती आधीच झालेली आहे ('पियाली' द्वाए)

हे सुद्धा करून बघावेत

आंबोळी's picture

28 Jun 2010 - 2:18 pm | आंबोळी

इतके प्रकार राहिलेत बघुन मला (व्या)कूळ लिहिण्यासाठी धीर धरवत नाहिये.....

आंबोळी

अवलिया's picture

28 Jun 2010 - 2:53 pm | अवलिया

कोण देवकाका का? बर बर.

--अवलिया

सहज's picture

28 Jun 2010 - 3:00 pm | सहज

हो ना!

एवढं डोके लढवून विडंबन केले तरी प्रतिसाद १८ अन हसु न येणार्‍या काव्याला २४. हा कुठला न्याय????

अवलिया's picture

28 Jun 2010 - 3:11 pm | अवलिया

एवढं डोके लढवून विडंबन केले तरी प्रतिसाद १८ अन हसु न येणार्‍या काव्याला २४. हा कुठला न्याय????

छान ! तुम्ही पण प्रतिसादांवर काव्याचे मुल्यमापन करायला लागलांत तर ;)

किती वेळा सांगितले प्रतिसाद आणि लेखन दर्जा यांचा संबंध नाही. बघा बर एक महान लेखक किती प्रतिसाद मिळवतो लेखाला.. ४ नाहि तर ५. पण तोड आहे का त्याला? असो.

(प्रतिसाद दिला... तेवढाच देवकाकांचा टिआरपी)

(इथे काही नाही असच रंग बदलतो का पाहिले )

--अवलिया

आंबोळी's picture

28 Jun 2010 - 3:16 pm | आंबोळी

=)) =)) =)) =)) =))

अवांतरः खाटकाकडे भेजा मागणारे किती आणि मांडी मागणारे किती?

आंबोळी

II विकास II's picture

28 Jun 2010 - 3:36 pm | II विकास II

>>छान ! तुम्ही पण प्रतिसादांवर काव्याचे मुल्यमापन करायला लागलांत तर

नाना, लोकशाही आहे. कसे समजत नाही तुम्हाला?

-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.