रंगात असताना विश्वचषक
आम्ही ही ओरडायचो जिवाच्या आकांताने
ते इंग्लंड/स्पेन ला सपोर्ट करायचे
अन आम्ही जर्मनीला
मॅच संपल्यावर
मिपावर सामना रंगायचा
किती गोल खाल्ले? विचारत
एकमेकांना हलकेच चिमटे काढयचो
वुझुंच्या गोंगाटात
चाहात्यांच्या साक्षीनं
मारियोच्या पासावर
ल्युकासच्या गोल्डन बूटातुन गोल बरसतात...दे दणादण दे दणादण
प्रतिक्रिया
24 Jun 2010 - 9:47 pm | प्रभो
गणपाशेठ, यू टू ???? =))
लै भारी रे...
24 Jun 2010 - 9:48 pm | मेघवेडा
क्या बात है गणपासेठ!! विडंबनांच्या मांदियाळीत आणखी एक! सर्व विडंबनांसारखंच उत्तम.. तरी काहीसं वेगळं.. शेवटच्या दोन ओळी तर अंमळ दिल खुश करून गेल्या! व्व्वा!!
24 Jun 2010 - 9:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
वृत्तात अंमळ मार खाता आहात, पण ही रेसिपीही जमली आहे! ;-)
अदिती
24 Jun 2010 - 9:51 pm | शुचि
मस्त कविता!!!
मला फिफा चं पान फार फार आवडलं.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
24 Jun 2010 - 9:52 pm | निखिल देशपांडे
हे विडंबन फिफा सदरात टाका रे!!!
लै भारी गणपा...
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
24 Jun 2010 - 9:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मालक, तिथेच आहे ते! एवढे नका उदास होऊ इटलीसाठी!
अदिती
24 Jun 2010 - 9:56 pm | निखिल देशपांडे
चालायचेच हो... ;)
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
24 Jun 2010 - 11:33 pm | बिपिन कार्यकर्ते
गण्या.... लेका लै भारी...
डॉइशलांड ! डॉइशलांड !! डॉइशलांड !!!
डॉइशलांड ! डॉइशलांड !! डॉइशलांड !!!
डॉइशलांड ! डॉइशलांड !! डॉइशलांड !!!
डॉइशलांड ! डॉइशलांड !! डॉइशलांड !!!
डॉइशलांड ! डॉइशलांड !! डॉइशलांड !!!
हा प्रतिसाद डान्रावांना समर्पित.
बिपिन कार्यकर्ते
25 Jun 2010 - 5:09 pm | अवलिया
हा हा हा लै भारी
--अवलिया
25 Jun 2010 - 5:11 pm | सहज
हे पाहीलेच नव्हते!
गणपा यु टू!!!
हा हा हा
5 Jul 2010 - 5:27 pm | भडकमकर मास्तर
मस्त कविता
5 Jul 2010 - 5:29 pm | परिकथेतील राजकुमार
च्यायला हे आमच्या चार डोळ्यातुन सुटलेच कसे ?
लै भारी हो बल्लवाचार्य + कविवर्य गणपा ;)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
5 Jul 2010 - 5:41 pm | टारझन
च्यायला इकडे माझी प्रतिक्रीया नाही ? अपमान .. घोर अपमान !
-(कॉर्पोरेशन) मनपा
5 Jul 2010 - 5:53 pm | स्वाती दिनेश
लई भारी रे...
शेवटी बघा आमची जर्मनी येते की नाही............
(डान्या वाचतोयस ना)
स्वाती
5 Jul 2010 - 5:58 pm | jaypal
एकदम आकडेबाज आणि समयोचित कविता
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/