अर्जेंटिना एक परिपूर्ण संघ!

संजय अभ्यंकर's picture
संजय अभ्यंकर in विशेष
23 Jun 2010 - 2:06 am
फिफा२०१०

२०१० चा फिफा विश्वचषक जर अर्जेंटिना जिंकू शकली नाही तर ते एक आश्चर्य ठरेल.

शिस्त, संयम आणी कलाकारी जी अर्जेंटिना ने आता पर्यंत दाखवली त्याला तोड नाही.

खेळाडूंच्या गर्दीत गोलक्षेत्राजवळ अचूक पासिंग केवळ अप्रतिम!
चेंडूवर सतत ताबा ठेवणे, आपल्याला अनूकूल परिस्थीती निर्माण झाली की हल्ला करणे.
उगाच ताकतीचे प्रयोग न करता, अचुकता व नजाकतीचे SILKY Passing, सारे केवळ पहात रहावे असे.

लायोनेल मेस्सी स्वतः गोल न करता सतत समन्वयाचे (provider) काम करतो हे सर्व संघांच्या फॉरवर्डसनी शिकावे असे स्कील.

माझ्या अर्जेंटीनाला शुभेच्छा!

प्रतिक्रिया

शुचि's picture

23 Jun 2010 - 2:14 am | शुचि

पण फक्त २ दाच जिंकलाय ना तो संघ? १९७८ आणि १९८६ मधे? खरं आहे का ते? मग कसा जिंकेल?
अवघड दिसतय. :?

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

हाच खेळ कायम ठेवला व ब्राझीलच्या काका सारखे brawl, मेस्सी, वेरॉन वगैरेंनी केले नाहीत तर शक्य आहे.

आणी किती संघ दोनदा जिंकले आहेत?

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

Nile's picture

23 Jun 2010 - 2:34 am | Nile

ते सोडा, तिथे आख्खा नविन विभाग सुरु केला आहे. तुमचे प्रतिसाद तिथे चिकटवा उगाच धागे कशाला काढता?

-Nile

संजय अभ्यंकर's picture

23 Jun 2010 - 2:44 am | संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

Nile's picture

23 Jun 2010 - 2:48 am | Nile

अहो काका याला प्रतिसाद म्हणतात. याविषयावरील धागे कसे आहेत ते पहा बरं जरा.

-Nile

संजय अभ्यंकर's picture

23 Jun 2010 - 2:42 am | संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

छोटा डॉन's picture

23 Jun 2010 - 3:03 pm | छोटा डॉन

श्री. संयज अभ्यंकर,

आपला धागा पाहुन आनंद झाला.
आपल्याला ह्या विभागात रुची आहे हे पाहुन मी आपल्याला "अर्जेंटिना संघ" ह्यावर सविस्तर वेगळा लेख लिहावा अशी विनंती करतो.
आपला हा लेख आल्यास आम्हाला आनंद होईल व ह्या निमित्ताने संस्थळाच्या 'फिफा विभागात' अजुन एका लेखकाची भर पडेल ...

सध्या आम्ही पुढच्या फेरीच्या सामन्यांसाठी अजुन काही नवी सदरे, नवे प्रकार आणि नवी माहिती सदस्यांसमोर आणण्याच्या प्रयत्नात आहोत.
तेव्हा आपण अर्जेंटिनाचा लेख लिहलात तर आम्हाला दुसरे काम पाहण्यास मदत होईल व त्या निमित्ताने ह्या विभागात 'सहभाग' घेणार्‍यांची संख्याही वाढेल.

आपल्या लेखाची वाट पहात आहे ...

------
छोटा डॉन

संजय अभ्यंकर's picture

23 Jun 2010 - 4:53 pm | संजय अभ्यंकर

मला ह्या विभागात रूची जरूर आहे.
परंतु आपल्याप्रमाणे एखाद्या संघवर सविस्तर लेख लिहिण्या एवढा मी तज्ञ नाही.

ह्या विशचषकातले विविध संघांतिल सामने पाहून मला अर्जेंटिनात जे वेगळेपण जाणवले ते लिहिले.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/