आमंत्रण ....

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
22 Jun 2010 - 10:23 am

बेभान उधाणला वारा
थेंब टिपूर पावसाचे ...
अंगणी ठरेना पाऊल
परसात धुंद मोर नाचे ...

वसंत कोवळा पानोपानी
कानी सुर ते मल्हाराचे ...
अतृप्त चातक पाऊसवेडा
तया आकर्षण जलदांचे ...

गळू लागल्या उन्हपाकळ्या
भेदूनी पडदे ते ग्रिष्माचे ...
रसरसली अन् वसुंधराही
होता आगमन हे वरुणाचे ...

फुलूनी आल्या मुग्ध कळ्या
लेवूनी वसने शरदाची ...
ओघळला अलवार प्राजक्त
गुणगुणतो गाणे आनंदाचे ...

सुखे ओलावली वसुधा
नभ ओघळले पावसाचे ...
क्षितीजापार उभा रवी
घेवुनी आमंत्रण उजळायाचे...

विशाल

कविता

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

22 Jun 2010 - 2:05 pm | क्रान्ति

गळू लागल्या उन्हपाकळ्या
भेदूनी पडदे ते ग्रिष्माचे ...

सुरेख कल्पना!

क्रान्ति
अग्निसखा

शानबा५१२'s picture

22 Jun 2010 - 2:09 pm | शानबा५१२

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))