अरे अरे रिक्षावाल्या
अरे अरे रिक्षावाल्या तू चाललास कुणीकडे
जायचे आहे मला तिकडे, तू नेतोस भलतीकडे ||धृ||
संध्याकाळची वेळ झाली, नाही मिळेना वाहन
थांबून थांबून कंटाळले, उरले नाही त्राण
शेवटचा उपाय म्हणूनी बोलावली तुझी रिक्षा
का उगाच लांबून नेतो, मला माहीत आहे रस्ता
असं कसं करतोस, भलत्याच भागात आणले मला इकडे
जायचे आहे मला तिकडे तू नेतोस भलतीकडे ||१||
लांब माझे घर आहे, रिक्षा ने की घराजवळ
मिटरने जे काही होईल तेच पैसे मी देईल
नकोस मागू जादा भाडं, नेहमीच करते मी रिक्षा
काहीबाही बोललास तर करीन तुला शिक्षा
आरेरावी केलीस तर जाईन मी हवालदाराकडे
जायचे आहे मला तिकडे, तू नेतोस भलतीकडे ||२||
अरे अरे रिक्षावाल्या तू चाललास कुणीकडे
जायचे आहे मला तिकडे तू नेतोस भलतीकडे
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२२/०६/२०१०
प्रतिक्रिया
22 Jun 2010 - 6:31 am | शिल्पा ब
संपूर्ण कविता हृदयाला भिडली...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
22 Jun 2010 - 9:20 am | शानबा५१२
दोन full stop जास्त झालेत बघा.
फुगलचा फतवा विसरु नका म्हणजे झाल! :D
__________________________________
पाष्या कवितेत एखादा घटनाक्रम आला पाहीजे.म्हण्जे समजतय का काय बोलतोय ते?
22 Jun 2010 - 9:34 am | पाषाणभेद
उस्तरून सांगा म्हणजे मला समजेल.
बाकी कवितेत क्रम तर आलेला आहेच.
22 Jun 2010 - 9:41 am | शानबा५१२
म्हणजे एखादी घटना,जी कुठुन तरी सुरु होउन कुठेतरी संपते.
इथे आता ती बाइ घरी पोहचे पयंत लिहल असत तर............एक पुर्ण काहीतरी झाल असत.कवितामधेच संपल्यासारखी वाटत.
बस झाल माझ्यासारख्याने कवितेबद्दल न बोललेल बर!
22 Jun 2010 - 10:24 am | Dipankar
एक वेळ बॉस प्रसन्न होईल रिक्षावाले प्रसन्न होण्या साठी कठोर तपश्चर्या करवी लागते
22 Jun 2010 - 10:27 am | अमोल केळकर
का उगाच लांबून नेतो, मला माहीत आहे रस्ता - हे खासच "
अवांतर : बाकी ही कविता कुण्या एका शहराबाबत जास्त चांगली लागू होत आहे असे कां बरं वाटतय ? ;)
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
22 Jun 2010 - 6:31 pm | उमराणी सरकार
कॉल सेंटर मधून यूके शिफ्ट करून घरी जाणार्या तरूणीकडून या कवितेची प्रेरणा मिळाल्यासारखे वाटते.
------
उमराणी सरकार