माफी असावी http://www.misalpav.com/node/12795
पहिला पाऊस
आमची पहिली भेट
ती रांगेत बसलेली
मी तिच्या तीन डबे मागं
तिचा तो क्लासिक डबा
आणि माझा फुटका कॅन
अचानक ओळख निघणं
रांगेत दोन डबे पुढं जाणं
तिचं ते प्लॅस्टिक पिशवी फड्फडणं
अन् माझं त्या आवाजानं तडफडणं
माझ्याबी कार्डावरचं राकेल घेवुन,
मलाच निरोप देणं
यावेळी, तिचा तो ज्वलनशील चेहरा
आणि माझं विझलेलं हास्य